भारतात बनलेले Zoho Mail सुरक्षित ईमेल प्लॅटफॉर्म ,Gmail ला देणार जबरदस्त टक्कर
Updated: 12 ऑक्टोबर 2025 | Author: Manoj Shinde | Category: marathi Tech News India
Zoho Mail म्हणजे काय?
Zoho Mail काय आहे ?
- भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात स्वदेशी उत्पादनांची क्रांती सुरू झाली आहे, आणि त्याच लाटेत Zoho Mail हे ईमेल सेवा क्षेत्रात एक मजबूत स्वदेशी पर्याय म्हणून पुढे येत आहे.
- चेन्नई ला सुरु झालेली सॉफ्टवेअर कंपनी Zoho Corporation यांनी हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे , हे सुविधा खासकरून व्यवसायिक, स्टार्टअप्स आणि प्रोफेशनल वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे असे कंपनी चे म्हणणे आहे.
- Zoho Mail हे एक Secure, Ad-Free, आणि Privacy-Focused ई-मेल सर्विस आहे जी Gmail, Outlook,yahoo सारख्या आंतरराष्ट्रीय सेवांना टक्कर देत आहे.
Zoho ने डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीवर जास्त भर दिला आहे.
- Zoho Mail ची सर्वात खास बाब म्हणजे त्यांची Data Privacy Policy यामुळे सर्वात जास्त चर्चेत आहेत.
- ईमेल डेटा भारतातील लोकल सर्व्हर्स वर स्टोअर केला जात आहे .
मेल सुरक्षित ठेवण्यासाठी End-to-End Encryption आणि Two-Factor Authentication (2FA) या दोन गोष्टींचा उपयोग केला जात आहे - कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जात नाहीत, त्यामुळे यूजर्स ना एक चांगला आणि प्रोफेशनल अनुभव मिळतो
- Zoho च्या मोठया अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “कंपनी कधीही वापरकर्त्यांचा डेटा विकत नाही किंवा त्याचा जाहिरातींसाठी वापर करणार नाही.”
आपल्या व्यवसायांसाठी खास – Custom Domain Email दिला जातो
Zoho Mail वापरकर्त्यांना स्वतःच्या डोमेनसह ईमेल आयडी तयार करण्याची सुविधा देते. म्हणजेच आपल्या कंपनी च्या नावाने तुम्ही ई-मेल आई डी बनऊ शकता . उदा. info@marathibatmya.com
यामुळे कंपनीला एक प्रोफेशनल इमेज मिळते आणि टीम ईमेल्सचे व्यवस्थापन सोपे होते.
यात Admin Control Panel, User Management, आणि Spam Filtering System सारख्या सुविधाही दिल्या आहेत.
Zoho Mail चे आधुनिक फीचर्स
या मध्ये खालील आधुनिक सुविधा आहेत दिल्या गेल्या आहेत .
- Zoho Calendar व Tasks Integration
- Offline Mail Access
- Zoho Workplace Suite सोबत पूर्णपणे जोडलेले
- Android आणि iOS App Support
- Zoho Cliq आणि Zoho Meeting सारख्या टूल्ससोबत थेट इंटिग्रेशन
यामुळे हे फक्त ईमेल अॅप नाही तर एक संपूर्ण बिझनेस कम्युनिकेशन सोल्यूशन बनते.
Zoho Mail चे 2025 मध्ये उपलब्ध प्लॅन्स
- Free Plan – ₹0 प्रति युजर/महिना , Storage: 5GB/User , वापर: Personal / Small Team
- Mail Lite – ₹59 प्रति युजर/महिना , Storage: 15GB/User , वापर: Small Business
- Mail Premium – ₹159 प्रति युजर/महिना , Storage: 50GB/User , वापर: Large Teams
- Workplace Suite – ₹99 पासून प्रति युजर/महिना , Features: Multiple Zoho Apps , वापर: Enterprise Users
विशेष वैशिष्ट्य:
Zoho Mail चे फ्री व्हर्जन देखील Gmail पेक्षा अधिक Secure आणि Ad-Free आहे. त्यामुळे भारतीय वापरकर्त्यांची पसंती झोहो मेलकडे वाढत आहे.
Zoho Mail vs Google mail ची तुलना
- कोणत्या देशाचे आहे : Zoho Mail भारतीय कंपनी Zoho Corporation कडून आहे, तर Gmail अमेरिकन कंपनी Google LLC कडून आहे.
- जाहिराती : Zoho Mail मध्ये जाहिराती नाहीत, पण Gmail च्या फ्री व्हर्जनमध्ये जाहिराती दिसतात.
- डेटा लोकेशन (Data Location) : Zoho Mail चे सर्व्हर भारतात आहेत, तर Gmail चे डेटा Google Cloud (US) वर साठवले जातात.
- सेक्युरिटी : Zoho Mail मध्ये End-to-End Encryption आणि 2FA आहे, तर Gmail मध्ये फक्त End-to-End Encryption आहे.
- बॅकअप : Zoho Mail डेटा Zoho Cloud वर बॅकअप केला जातो, तर Gmail डेटा Google Drive मध्ये साठवला जातो.
- वापरण्यासाठी लागणारी किंमत : Zoho Mail ची किंमत ₹59 पासून सुरू होते, तर Gmail ची किंमत ₹136 पासून सुरू होते.
- विशेष बाजू: भारतीय सर्व्हर्स आणि लोकल डेटा स्टोरेजमुळे Zoho Mail भारतीय कायद्यांनुसार अधिक सुरक्षित आहे, ही Gmail पेक्षा मोठी जमेची बाजू आहे.
भारतीयांनी का वापरले पाहिजे काय फायदे मिळतील
- झोहो मेल भारतीय वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन केले गेले आहे .
- कोणत्याही जाहिरातीशिवाय ( Ad-Free) ईमेल वापरण्याचा अनुभव.
- अनेक भारतीय राज्यातील भाषा मध्ये उपलब्ध .
- छोट्या व्यवसाय धारकांना सुद्धा परवडणारे प्लॅन.
- Meetings, CRM, Docs आणि इतर Zoho Apps सोबत अगदी सहज जोडले जाते .
कुठे उपलब्ध आहे?
Zoho Mail हे दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे:
🔹 Google Play Store , Apple App Store
🔹 अधिकृत वेबसाइट: https://www.zoho.com/mail
निष्कर्ष
- भारतात पहिल्यांदाच Gmail सारख्या विदेशी ईमेल च्या बरोबरीचे आणि स्वदेशी प्लॅटफॉर्म तयार झाला आहे तसेच जर तुम्ही सुरक्षित आणि प्रायव्हसी-केंद्रित ईमेल सोल्यूशन शोधत असाल, तर Zoho Mail हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- या मध्ये असणारे आधुनिक फीचर्स, परवडणारे लो-प्राईस प्लॅन्स आणि डेटा प्रायव्हसी यामुळे हे ईमेल सेवा क्षेत्रात भारताचे अभिमानास्पद उत्तर ठरत आहे.
FAQ – Zoho Mail
1️⃣ Zoho Mail मोफत वापरता येतो का?
होय, Free Plan मध्ये 5 Users आणि प्रत्येकी 5GB Storage मिळते.
2️⃣ Zoho Mail मध्ये Gmail मधील ईमेल इम्पोर्ट करता येतात का?
होय, Zoho Migration Tool वापरून सर्व मेल सहज इम्पोर्ट करता येतात.
3️⃣ डेटा भारतात स्टोअर केला जातो का?
होय, भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातील लोकल सर्व्हर्सवर ठेवला जातो.
4️⃣ Zoho Mail कुठल्या भाषांमध्ये उपलब्ध आहे?
मराठीसह अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा समर्थित आहेत.
5️⃣ Zoho Mail कोणासाठी योग्य आहे?
फ्रीलान्सर, स्टार्टअप, आणि बिझनेस टीम्ससाठी हे एक उत्तम, सुरक्षित आणि परवडणारे ईमेल प्लॅटफॉर्म आहे.





