५० रुपयांत अनुभव घ्या शिवसृष्टीचा इतिहास  पुण्यातील शिवप्रेमींना खास संधी!

अभय भुतडा फाउंडेशनकडून ५१ लाखांची देणगी देण्यात आली असून शिवप्रेमींना फक्त ५० रुपयांत प्रवेश मिळणार आहे.

मुलांसाठी खास घोषणा; १५ मे ते १५ जून दरम्यान शिवसृष्टी फक्त ५० रुपयांत अनुभवता येणार.

मूळ तिकीट प्रौढांसाठी ६००, मुलांसाठी ३०० रुपये; आता सर्वांसाठी एकसमान दर ५० रुपये ठेवण्यात आला.

शिवसृष्टी ही एशियातील सर्वात मोठी ऐतिहासिक थीम पार्क आहे, बाबासाहेब पुरंदरे यांची संकल्पना आहे.

वातानुकुलीत हॉल्स, थीम गॅलऱ्या, थिएटर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराजांचा इतिहास जिवंत केला आहे.

टाईम मशीन थिएटरमध्ये ३६ मिनिटांचा शो असून, १०० प्रेक्षक एकत्र पाहू शकतात, विशेष ३६० अंशाचा अनुभव मिळतो.

दुर्गवैभव, रणांगण, श्रीमंत योगी, सिंहासनाधीश्वर अशी दालने शिवरायांचा इतिहास चित्ररूपात मांडतात. ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे, मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातो.

शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसह प्रेरणादायी ऐतिहासिक अनुभव घेण्यासाठी ही उत्तम संधी आहे.