पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात मे महिन्यातच दमदार हजेरी

मान्सून 2025

1962 नंतर पहिल्यांदाच:

पुण्यात यंदा मे महिन्यात मान्सून दाखल, 1962 नंतरचा विक्रम मोडला. 35 वर्षांतील ही ऐतिहासिक नोंद.

14 दिवस आधी मान्सून:

दरवर्षी जूनमध्ये येणारा मान्सून यंदा 14 दिवस आधी, मे अखेरीसच पुण्यात दमदार पावसासह दाखल.

27 मे रोजी सुरुवात:

2025 मध्ये 27 मे रोजी पुण्यात मान्सूनची सुरुवात झाली, हवामान खात्याच्या नोंदीनुसार विक्रमी वेळेआधी आगमन.

सलग चार दिवस पाऊस:

पुणे शहर व परिसरात सलग चार दिवस मुसळधार पाऊस, सूर्यदर्शन नाही, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.

वाहतुकीवर मोठा परिणाम:

खडकवासला व सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बसेस बंद पडल्या, शहरात तब्बल पाच तास ट्रॅफिक जाम.

घरात शिरले ओढ्याचे पाणी:

पावसामुळे पुण्यात काही ठिकाणी ओढ्याचे पाणी घरात शिरले, रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

लोणावळ्यात विक्रमी पाऊस:

लोणावळ्यात 231 मिमी पावसाची नोंद झाली, जो पुणे जिल्ह्यात सर्वाधिक असून रेकॉर्डब्रेक ठरला आहे.

शेतीचं मोठं नुकसान:

बारामती, इंदापूर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले.

117% सरासरीपेक्षा जास्त पाऊस:

हवामान खात्याचा अंदाज – यंदा भारतात 117% सरासरीपेक्षा जास्त पावसाचे प्रमाण अपेक्षित असल्याने सतर्कता आवश्यक.