Nitin Gadkari यांनी घोषित केलेली फास्टॅग वार्षिक पास योजना 15 ऑगस्टपासून लागू. ₹3,000 मध्ये 200 ट्रिप्सची सुविधा.
फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून खासगी वाहनधारकांना याचा मोठा फायदा होणार.
हा पास ₹3,000 मध्ये मिळणार असून 200 टोल ट्रिप्स किंवा 1 वर्ष, यापैकी जे आधी संपेल.
ही योजना केवळ खासगी कार, जीप, व्हॅन यांसाठी आहे. व्यावसायिक वाहनांसाठी पास मान्य नाही.
हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझांवर लागू राहणार आहे.
राज्य महामार्ग व स्थानिक टोल प्लाझांवर नेहमीप्रमाणे टोल दर आकारले जातील, सवलत लागू नाही.
वापरकर्त्यांनी नवीन फास्टॅग घेण्याची गरज नाही. विद्यमान फास्टॅगवरच पास सक्रिय केला जाईल.
Learn more
पासची अॅक्टिव्हेशन लिंक राजमार्ग यात्रा अॅप, NHAI व MoRTH वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
या योजनेमुळे दरवर्षी सुमारे ₹7,000 पर्यंत टोल बचत होऊ शकते, वेळ आणि इंधन देखील वाचते.
Learn more