TVS मोटर कंपनीने जगातील पहिली CNG स्कूटर – TVS Jupiter CNG सादर करून “ग्रीन मोबिलिटी”च्या दिशेने एक महत्त्वाचा सुरुवात केली आहे , भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये या स्कूटरची झलक पहिल्यांदाच पाहायला मिळाली आणि लगेचच ही स्कूटर चर्चेचा विषय बनली आहे.
हे पाऊल उचलण्या मागे कंपनी चा फोकस पर्यावरण पूरकआणि इको-फ्रेंडली वाहतुक हा आहे – TVS मोटर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात, “भारतासारख्या विकसनशील देशात स्वच्छ, सुलभ आणि स्वस्त वाहतूक ही सध्याच्या आणी पुढच्या काळाची गरज आहे. TVS Jupiter CNG स्कूटर हे या दिशेने पहिले महत्वपूर्ण पायरी आहे.”
ही स्कूटर केवळ एक नवीन टेकनॉलॉजि तर आहेच पण त्याहून महत्वाचे पर्यावरण , इंधन बचत आणि ग्राहकांच्या आर्थिक बचतीच्या दृष्टीने एक मोठी सुरवात मानली जात आहे.ही स्कूटर म्हणजे जगातील पहिली CNG-संचालित स्कूटर आहे.
TVS Jupiter CNG स्कूटर – खास वैशिष्ट्ये
1️⃣ CNG तंत्रज्ञानाची वापरलेली पहिली दुचाकी
ही जगातील पहिली CNG गॅस वर चालणारी स्कूटर असून, यामध्ये पारंपरिक पेट्रोलऐवजी पर्यावरणपूरक CNG इंधनाचा वापर केला जातो. ही स्कूटर TVS च्या नाविन्यपूर्ण विचारसरणीचे उत्तम उदाहरण आहे.
2️⃣ उच्च मायलेज – 84 किमी/किग्रॅ CNG
TVS कंपनी च्या माहितीनुसार, ही स्कूटर १ किलो CNG मध्ये सुमारे ८५ किमी पर्यंत मायलेज देते. पेट्रोल वर चालणाऱ्या स्कूटर्सच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे.
3️⃣ ड्युअल फ्युएल सिस्टम
ही स्कूटर CNG व पेट्रोल कोणत्याही इंधन वापरले जाऊ शकते (CNG + पेट्रोल). दोन्ही मिळून 226 किमी जाऊ शकते
ड्युअल फ्युएल सिस्टममुळे (CNG + पेट्रोल), वापरकर्त्यांना अधिक लवचिकता आणि दीर्घ श्रेणी मिळते. CNG संपल्यास, स्कूटर पेट्रोलवर चालू शकते, हे एक सुरक्षित आणि स्मार्ट फीचर आहे.
4️⃣ CNG टाकी डिझाईन
सर्वप्रथम, Jupiter 125 च्या अंडर-सीट स्टोरेजच्या जागी एक 1.4 किलोग्रॅम CNG टाकी बसवण्यात आली आहे. ह्या टाकीला एक प्लास्टिक पॅनेल द्वारा कव्हर केले गेले आहे, ज्यामुळे डिझाईन आकर्षक आणि प्रभावी दिसते. पॅनेलमध्ये एक प्रेशर गेज आणि फिलर नॉझल आहे, ज्यामुळे ग्राहकांना CNG भरताना सुलभता आणि सुरक्षा मिळते.
इंजिन व पॉवरट्रेन – स्थिरता आणि शक्ती
- TVS Jupiter CNG मध्ये 124.8cc सिंगल-सिलिंडर इंजन दिला आहे. या इंजनची क्षमता 7.2PS पॉवर आणि 9.4Nm टॉर्क आहे.
- ही पावर आणि टॉर्क जरी Jupiter 125 च्या पेट्रोल वर्शनपेक्षा थोडी कमी असली (8.15PS आणि 10.5Nm), तरीही CNG वेरिएंटने 80 किमी प्रति तास चा टॉप स्पीड मिळवला आहे, ज्यामुळे शहरी रस्त्यावर आरामदायक आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
- सर्वसाधारणतः, या स्कूटरमध्ये स्टाइल आणि कार्यक्षमता यांचा उत्तम संगम दिसतो, ज्यामुळे ती eco-conscious ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.
Jupiter CNG तांत्रिक वैशिष्ट्ये
(Technical Specifications)
✅ इंधन प्रणाली
TVS Jupiter CNG मध्ये ड्युअल फ्युएल प्रणाली आहे, म्हणजेच ही स्कूटर CNG आणि पेट्रोल दोन्हीवर चालते.
✅ CNG टाकी क्षमता
या स्कूटरमध्ये 1.4 किलोग्रॅम क्षमतेची CNG टाकी अंडरसीट भागात बसवलेली आहे.
✅ पेट्रोल टाकी क्षमता
या स्कूटरमध्ये 2 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी दिलेली असून ती फ्लोअरबोर्डमध्ये स्थित आहे.
✅ इंधन कार्यक्षमता
TVS नुसार, ही स्कूटर एका किलो CNG मध्ये सुमारे 84 किमी मायलेज देते आणि पेट्रोलसह एकूण श्रेणी 226 किमीपर्यंत जाते.
✅ इंजिन
ही स्कूटर 124.8cc क्षमतेच्या सिंगल-सिलिंडर इंजिनसह येते, जे उत्तम कार्यक्षमता आणि स्थिरता प्रदान करते.
✅ फीचर्स
स्कूटरमध्ये आधुनिक LED हेडलॅम्प, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, साइड स्टँड इंडिकेटर आणि IntelliGO स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासारखी स्मार्ट फीचर्स दिली गेली आहेत.
🌏 पर्यावरणपूरक स्कूटर – हरित भविष्यासाठी पाऊल
CNG स्कूटरचा एक प्रमुख फायदा म्हणजे कमी कार्बन उत्सर्जन. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, TVS ची ही पुढाकार स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीकडे मोठे पाऊल आहे.
ग्राहकांसाठी फायदे
(User Benefits)
- मायलेज व बचत: पेट्रोलच्या तुलनेत 40-50% इंधन खर्च कमी
- लो मेंटेनन्स: CNG इंजिनमध्ये कमी घर्षण आणि जळनामुळे मेंटेनन्स कमी
- हरित पर्याय: पर्यावरणाला कमी हानीकारक
- इंधन उपलब्धतेचा पर्याय: CNG उपलब्ध नसेल तरी पेट्रोल वापरता येते
CNG स्कूटर कधी येणार बाजारात?
सध्या ही स्कूटर फक्त संकल्पना स्वरूपात सादर करण्यात आली आहे. व्यावसायिक उत्पादनाबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही, मात्र सूत्रांनुसार पुढील काही महिन्यांत TVS ही स्कूटर उत्पादनात आणू शकते.
अंदाजे किंमत: ₹85,000 ते ₹90,000 (एक्स-शोरूम)
प्राथमिक शहरे: मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये सुरुवात होण्याची शक्यता
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. TVS Jupiter CNG स्कूटरचे मायलेज किती आहे?
➡️ सुमारे 84 किमी प्रति किलो CNG, एकूण श्रेणी 226 किमी.
Q2. ही स्कूटर कधी बाजारात उपलब्ध होणार?
➡️ अद्याप निश्चित तारीख नाही, पण 2025 च्या उत्तरार्धात अपेक्षित आहे.
Q3. ही स्कूटर सुरक्षित आहे का?
➡️ होय, स्कूटरमध्ये BIS प्रमाणित सुरक्षितता यंत्रणा वापरली आहे.
Q4. ही स्कूटर कुठे उपलब्ध होईल?
➡️ सुरुवातीला मेट्रो आणि Tier-1 शहरांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
READ MORE