टेक कंपन्यांमध्ये मोठी कपात! Microsoft, Google, IBM सह अनेक दिग्गज कंपन्यांनी 2025 मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना धक्का , AI आणि आर्थिक स्थितीमुळे निर्णय
तारीख: जून 2025
स्रोत: NDTV.com
▪️ 2025 मध्ये Microsoft, Google आणि IBM ने किती नोकर्या कमी केल्या?
▪️ टेक कंपन्या 2025 मध्ये AI मुळे कर्मचाऱ्यांना का काढत आहेत?
2025 मध्ये टेक कंपन्यांची मोठी नोकरकपात, हजारो कर्मचारी बेरोजगार!
2025 हे वर्ष IT क्षेत्रासाठी मोठ्या उलथापालथीचं ठरत आहे. Microsoft, Google, IBM, Amazon यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.
ही पावले मुख्यतः आर्थिक अस्थिरता, AI चा वाढता वापर, आणि रोल्सचं पुनर्रचना यामुळे उचलण्यात आली आहेत.Layoffs.fyi या वेबसाईटनुसार, 130 पेक्षा जास्त कंपन्यांमधून 61,000 हून अधिक IT कर्मचारी कामावरून कमी करण्यात आले आहेत.
बिल गेट्स च्या Microsoft ने 6,000 कर्मचारी कमी केले
Microsoft ची एकूण कर्मचारी संख्या जून 2024 पर्यंत 2.28 लाख होती. Microsoft ने व्यवस्थापनातील पदे कमी करताना इंजिनिअर लोकांकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेत 6,000 पदे कमी केली आहेत. कंपनीने या आधी मे महिन्यात एक फेरी केली होती, आता पुन्हा विक्री विभागात (Sales Division) मोठी कपात होणार आहे.
हे सुद्धा वाचा – AI आणि Machine Learning मध्ये मध्ये करिअर करायचंय? – संपूर्ण माहिती
Google ने Android, Pixel, Chrome टीममधून कर्मचारी कमी केले
Google ने Android, Pixel, Chrome यांसारख्या महत्त्वाच्या युनिटमधून शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ही कपात कंपनीने स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रमा नुसार केली आहे.
IBM ने AI च्या वापरामुळे HR विभागातील 8,000 पदे कमी केली
IBM कंपनीने Human Resources विभागात 8,000 नोकर्या कमी केल्या आहेत. या पदांवरील जबाबदाऱ्या आता AI प्रणालीकडे सोपवण्यात आल्या आहेत. यामुळे HR व्यवस्थापनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असं IBM ने स्पष्ट केलं.
Amazon ने Devices & Services Division मधून 100 नोकर्या काढल्या
Amazon ने आपल्या डिव्हायसेस आणि सर्व्हिसेस युनिटमधून सुमारे 100 कर्मचारी कामावरून कमी केले आहेत. ही कपात कंपनीच्या ऑपरेशनल रियलायन्मेंटचा एक भाग आहे.
Bumble ने 30% कर्मचारी कमी करत 40 मिलियन डॉलर्सची बचत केली
ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म Bumble ने 240 कर्मचाऱ्यांना (जगभरातील workforce चं सुमारे 30%) काढलं आहे. कंपनीने सांगितलं की, $40 मिलियन इतकी वार्षिक बचत या निर्णयामुळे होईल, जी नवीन उत्पादन विकास आणि टेक्नोलॉजीमध्ये गुंतवली जाणार आहे.
निष्कर्ष – 2025 मध्ये टेक इंडस्ट्रीवर AI, मंदी आणि खर्च बचतीचा मोठा प्रभाव दिसून येतो आहे. पारंपरिक नोकर्या कमी होत असून, तांत्रिक कुशलता आणि AI सह स्पर्धात्मक कौशल्ये आवश्यक ठरत आहेत. अशा बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी कंपन्या सतत पुन्हा रचना करत आहेत.
हे सुद्धा वाचा – McDonald’s बॉयकॉट 2025: 24 जूनपासून सुरू होणार मोठं जनआंदोलन
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. Microsoft ने 2025 मध्ये किती कर्मचारी कमी केले?
Microsoft ने सुमारे 6,000 कर्मचारी कमी केले, विशेषतः विक्री आणि प्रशासन विभागातून.
Q2. Google ने कोणत्या युनिटमधून कर्मचारी कमी केले?
Google ने Android, Pixel, Chrome टीममधून कर्मचाऱ्यांना काढले.
Q3. IBM मध्ये AI मुळे कोणते विभाग प्रभावित झाले?
IBM ने मुख्यतः HR विभागातील 8,000 नोकर्या AI मुळे कमी केल्या.
Q4. Bumble कंपनीने किती नोकर्या कमी केल्या आणि का?
Bumble ने 240 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत $40 मिलियन बचतीचा निर्णय घेतला.
✍️ लेख NDTV.com च्या रिपोर्टच्या आधारे तयार केला आहे
तुम्ही IT, Tech, Layoffs आणि AI यासंबंधित बातम्या वेळेवर मिळवू इच्छिता का?
💥 आमच्या फ्री WhatsApp ग्रुप मध्ये आजच सहभागी व्हा आणि मिळवा रोजच्या अपडेट्स थेट मोबाईलवर!
लेटेस्ट टेक न्यूज, नोकरकपातीची ताजी माहिती,AI आणि IT इंडस्ट्री ट्रेंड्स
माहिती शेअर करा आणि इतरांनाही जोडा!