स्वारगेट जवळ वृद्ध नागरिकाचा बंगल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न- पोलिसांकडे तक्रार

पुण्यातील वृद्ध नागरिकाचा बंगला कब्जा करण्याचा प्रयत्न; स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील गुलटेकडी परिसरात एका 81 वर्षीय वृद्ध नागरिकाच्या मालकीचा बंगला जबरदस्ती ने बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची निंदनीय आणी धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या प्रकरणाचा स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

 काय घडले घटनेचा तपशील

पुणेकर सुभाषचंद्र गोपाळराव अरोळे (वय 81) हे गुलटेकडी येतील टीएमव्ही कॉलनी येथे बरयाच वर्षांपासून राहतात. त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या बंगल्याचे लोखंडी एन्ट्री गेट आणि भिंती तोडून जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. या घटने नंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना कळवले व पुणे पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने पुढील धोका टळला.

आरोपी व कारवाई

माहिती अनुसार देवेश जैन, संजय  आणि जयेश फळपगार या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आरोपींनी बेकायदेशीररीत्या मालमत्ता हस्तगत करण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

swarget police station

पुण्यातील वाढते प्रॉपर्टी वाद

अलीकडच्या काळात पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण भागात अशाप्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत , त्यामध्ये जास्तकरून ज्येष्ठ नागरिकांच्या मालकीच्या घरांवर बेकायदेशीर कब्जा किंवा फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

त्यामुळे अशा नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे कायदेशीर कागदपत्त्रांची वेळोवेळी तपासणी करून,योग्य नोंदणी ठेवणे आणि आपल्या नातलगांना माहिती देणे आवश्यक आहे. अशी घटना घडल्यास तात्काळ पुढे येऊन तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.


❓ FAQ

प्र.१: अशा प्रकारच्या घटनेत नागरिकांनी काय करावे?
👉 नागरिकांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार द्यावी आणि घटनास्थळाचे फोटो, व्हिडिओ पुरावे जतन करावेत.

प्र.२: वृद्ध नागरिक आपल्या मालमत्तेचे संरक्षण कसे करू शकतात?
👉 मालमत्तेची नियमित नोंदणी व दस्तऐवज सुरक्षित ठेवा, शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती द्या, तसेच CCTV बसवणे उपयुक्त ठरेल.

प्र.३: प्रॉपर्टीवर जबरदस्ती कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्यास कोणती कायदेशीर कारवाई होते?
👉 अशा गुन्ह्यांवर भारतीय दंड संहिता कलम 441 (अनधिकृत प्रवेश) आणि 447 (अतिक्रमण) अंतर्गत कारवाई होते. दोषींना दंड व तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

Leave a Comment