“भारतीय बँकिंगमध्ये जपानची मोठी गुंतवणूक – २०% हिस्सा घेतला”

भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जपानमधील Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC) या अग्रगण्य बँकेने भारतातील एका नामांकित बँकेत तब्बल १३,४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

जपानची SMBC बँक भारतात करणार १३४८३ कोटींची गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक करार

यामध्ये SMBC बँक सुमारे २०% हिस्सा खरेदी करणार असून, हा करार भारतीय बँकिंग इतिहासातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणुकींपैकी एक मानला जात आहे. या सौद्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्रात विदेशी बँकांचा वाढत इंटरेस्ट , विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास, आणि भारताच्या आर्थिक स्थैर्याची झलक स्पष्टपणे दिसून येते.

 

जपानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या फायनान्शियल ग्रुप SMFG बद्दल माहिती

  • SMBC (Sumitomo Mitsui Banking Corporation) ही जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी फायनान्शियल संस्था आहे , ही Sumitomo Mitsui Financial Group (SMFG) ची पूर्ण मालकीची बँक आहे.
  • 2024 अखेर, SMFG कडे $2 ट्रिलियनहून अधिक संपत्ती असल्याची नोंद आहे. हा ग्रुप जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यरत असून, भारतामध्ये देखील त्यांची मजबूत उपस्थिती आहे. भारतीय आर्थिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवण्यामध्ये SMBC महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
  • त्यांची मजबूत आर्थिक पार्श्वभूमी आणि जागतिक अनुभवामुळे भारतीय बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण होईल . ही भारतीय शेअर मार्केट आणि भारतीय बँकिंग सेक्टर साठी महत्वाची गोष्ट आहे

 

जपानच्या सुमितोमो कंपनीने YES बँकेमध्ये घेतला २०% हिस्सा – १३,४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक

जपानमधील नामांकित बँक Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC) हिने भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक YES Bank मध्ये तब्बल २०% हिस्सा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही डील १३,४८३ कोटी रुपयांची असून, ती भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक मानली जात आहे.

SMBC ने प्रति शेअर ₹21.50 या दराने YES Bank चे शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. याच दिवशी YES Bank चे शेअर्स सुमारे 9.77% नी वाढून ₹20 च्या आसपास पोहोचले, जे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्ससाठी एक आशादायक संकेत होता.

ही गुंतवणूक भारताच्या बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवते. यामुळे भारतातील शेअर बाजारात स्थैर्य आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये होणारी ही वाढ शेअर मार्केट इन्व्हेस्टर्ससाठी आणि ट्रेडर्ससाठी एक सकारात्मक कल मानला जात आहे. YES Bank मध्ये SMBC सारख्या मजबूत बँकेचा सहभाग मिळाल्यामुळे, बँकेच्या भांडवलाची स्थिती सुधारेल आणि भविष्यातील वाढीसाठी एक नवा मार्ग मोकळा होईल.

SMBC चा अनुभव, तंत्रज्ञान, आणि जागतिक नेटवर्क YES Bank ला बिझनेस वाढवण्यास मदत करू शकतो. यामुळे भविष्यात बँकेचे नफ्यातील आकडे सुधारतील

SMBC ने प्रति शेअर ₹21.50 या दराने खरेदी केली असून, याच दिवशी YES Bank चे शेअर्स 9.77% नी वधारून ₹20 पर्यंत पोहोचले.

YES बँकेतील 20% हिस्सा SMBC ने कोणाकडून खरेदी केला? – संपूर्ण माहिती

जपानच्या Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC) ने YES बँकेत 20% हिस्सा खरेदी करण्यासाठी सुमारे ₹13,483 कोटींची मोठी गुंतवणूक केली आहे. हे शेअर्स सेकंडरी मार्केट डील द्वारे विविध भारतीय बँकांकडून खरेदी करण्यात आले आहेत.

SBI कडून सर्वात मोठा हिस्सा विक्री

SMBC ने सर्वाधिक 13.19% हिस्सा भारतीय स्टेट बँक (SBI) कडून खरेदी केला आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे ₹8,889 कोटी इतकी आहे.

उर्वरित 6.81% हिस्सा SMBC ने खालील प्रमुख बँकांकडून खरेदी केला आहे

Axis Bank , Bandhan Bank , Federal Bank , HDFC Bank , ICICI Bank , IDFC First Bank , Kotak Mahindra Bank या व्यवहाराच्या पूर्णतेनंतरही SBI कडे YES बँकेमध्ये 10% पेक्षा जास्त हिस्सा शिल्लक राहणार आहे, म्हणजेच SBI ची भूमिका अजूनही महत्त्वाची राहणार आहे.

SMBC सारख्या मजबूत आंतरराष्ट्रीय बँकेची भागीदारी ही शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत आहे. आणी येस बँकेच्या भविष्याबद्दल विश्वास निर्माण करते.

yes bank good news
yes bank good news

YES बँकेची स्थिती

मार्च 2020 मध्ये YES बँक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर काही मर्यादा घातल्या. त्या वेळी ग्राहकांना फक्त ₹50,000 पर्यंतच पैसे काढण्याची परवानगी होती.

RBI ने YES बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. या संकटातून बँकेला बाहेर काढण्यासाठी, SBI आणि आणखी सात बँकांनी RBI च्या “पुनर्रचना योजने” अंतर्गत YES बँकेत गुंतवणूक केली होती.

YES बँकेने डिसेंबर 2024 मध्ये ₹612 कोटींचा नफा नोंदवत आपली आर्थिक स्थिती बळकट केली असून, तिच्या ठेवींचा आधारही ₹2.84 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे.

या मजबूत आर्थिक कामगिरीमुळे आता FIIs (Foreign Institutional Investors) आणि DIIs (Domestic Institutional Investors) सुद्धा YES बँकेत  भविष्यात गुंतवणूक करतील .

READ MORE 

 

 

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मुडीत दाणीच्या लग्नात अंबानी कुटुंबाची उपस्थिती मीडियावर चर्चेचा विषय मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी