Samsung Galaxy S25 Edge – जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन! | Samsung Galaxy S25 Edge- eSIM आधारित स्मार्टफोन

सॅमसंगचा नवा “Beyond Slim” स्मार्ट फोन का आहे सगळ्यात वेगळा ?

नवी दिल्ली: लवकरच स्मार्टफोन ही प्रकार जुना होणार आहे आणी स्मार्ट फोन पेक्षा बरंच काही वेगळ असलेला मार्केट मध्ये येईल असे फेसबुक चे मालक मार्क जुकेबर्ग म्हटले होते आणि हे खरंच घडतंय , बाजारात नव्या क्रांतीची सुरुवात होत आहे. Samsung उद्या, 13 मे रोजी, आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge लॉन्च करणार आहे. बाकी स्मार्टफोन पेक्षा यात काय वेगळं आहे जाणून घ्या .

या स्मार्टफोनला “जगातील सर्वात पातळ Android फोन” असा मान मिळणार आहे. Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये जानेवारीत या फोनची झलक दाखवण्यात आली होती, आणि आता अखेर हा फोन अधिकृतपणे जगासमोर येणार आहे.


Samsung Galaxy S25 Edge कधी आणि कुठे होणार लाँच?

Samsung Galaxy S25 Edge चा ग्लोबल लाँच इव्हेंट भारतात उद्या सकाळी 5:30 वाजता होणार आहे. या फोनसाठी सॅमसंगने “Beyond Slim” हा टॅगलाइन दिला आहे, जो याच्या डिझाइनवर भर देतो. Galaxy S25 Edge ची लाँचिंग वेळ अशी ठेवण्यात आली आहे की तो Apple iPhone 17 Slim च्या अगोदरच बाजारात येईल.

कॅमेरा सेटअप: प्रीमियम गुणवत्ता, कॉम्पॅक्ट साइजमध्ये

सर्वात मोठी आकर्षण म्हणजे, Galaxy S25 Edge मध्ये Galaxy S25 Ultra चा प्रगत कॅमेरा सिस्टिम वापरण्यात आला आहे. अपेक्षित आहे की या फोनमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स असे ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. हे सर्व एक पातळ आणि हलक्या डिझाइनमध्ये असणार आहे, ज्यामुळे याला एक प्रीमियम लूक मिळेल.

Galaxy S25 Edge डिस्प्ले आणि प्रोसेसर

Galaxy S25 Edge मध्ये फ्लॅट OLED डिस्प्ले असणार आहे. फोन चा प्रोसेसर, यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाईल, जो याला सुपरफास्ट परफॉर्मन्स देण्यासाठी मदत करतो .

स्टोरेज आणि RAM –

हा फोन 16GB RAM सह येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग अतिशय सोपे होईल. तसेच, 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते, जे यूजर्स साठी भरपूर फोटो, व्हिडिओ आणि अ‍ॅप्स साठवण्यासाठी मदत करेल.


बॅटरी आणि चार्जिंग

Galaxy S25 Edge मध्ये पॉवर फुल बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये वायर्ड आणि वायरलेस फास्ट चार्जिंग ची सुविधा दिली जाईल, ज्यामुळे चार्जिंगसाठी वेळ कमी लागेल आणि चार्जिंग जास्त वेळ टिकेल.


खास वैशिष्ट्य: सिम कार्ड स्लॉट नसेल!

हा फोन एका खास आणि नव्या तंत्रज्ञानासह येतो – यामध्ये पारंपरिक सिम कार्ड घालण्यासाठी जागा (slot) नसेल. म्हणजेच, आपण जसं सध्या सिम कार्ड घालतो, तसं या फोनमध्ये शक्यच नसेल.

याऐवजी, हा फोन फक्त eSIM वापरेल.
eSIM म्हणजे Electronic SIM – जी थेट फोनच्या सिस्टममध्ये असते. यामध्ये कोणतेही प्लास्टिक सिम घालायची गरज नसते. फक्त मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडरकडून QR कोड किंवा प्रोफाइल अ‍ॅक्टिवेट केलं की सिम सुरू होते.

हे तंत्रज्ञान भविष्यातील मोबाईल्समध्ये अधिक सामान्य होणार आहे, कारण:

  • फोन अधिक पातळ आणि वॉटरप्रूफ बनवता येतो
  • सिम बदलताना कार्ड घालण्याची किंवा काढण्याची झंझट राहत नाही
  • एकाच फोनमध्ये अनेक eSIM प्रोफाइल ठेवता येतात

थोडक्यात, सिम कार्ड न घालता मोबाईल वापरण्याचा नवा आणि सोपा मार्ग म्हणजे eSIM!


निष्कर्ष – Samsung Galaxy S25 Edge हा स्मार्टफोन पेक्षा वेगळा असेल , फक्त पातळ डिझाइनसाठीच नाही तर कॅमेरा , पॉवरफुल प्रोसेसर, eSIM आणि फीचर्ससाठी चर्चेत आहे. हे मॉडेल Android स्मार्टफोनसाठी मध्ये एक नवीन लेवल तयार करेल , यात शंका नाही. आता बघायचं की लाँच नंतर ग्राहकांना
हा फोन पसंद येतोय कि नाही .

तुमचं काय मत आहे या नवीन फोन बद्दल ( Galaxy S25 Edge) खाली कमेंटमध्ये नक्की सांगा!

READ MORE

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स