Reliance Power शेअर्स मध्ये भयंकर तेजी – ब्रेकआउटनंतर लक्ष्य ₹101 पर्यंत?

Reliance Power Chart Analysis 2025 – अनिल अंबानी ग्रुप शेअर्समध्ये तेजी, स्टॉकने गाठला 52-हफ्त्यांचा उच्चांक

मंगळवार च्या ट्रेडिंग सेशन मध्ये Reliance Power चा शेअर तब्बल 12% ने वधारत आणी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
सध्या शेअर ₹71.24 वर बंद झाला असून, चालू वर्षात 68% आणि गेल्या वर्षभरात तब्बल 174% शेअर्स ची किमंत वाढली आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीने Q4 FY25 मध्ये ₹125.57 कोटी चा एकत्रित नफा जाहीर केला आहे, जो मागील वर्षीच्या ₹397.56 कोटींच्या तोट्याच्या तुलनेत मोठा टर्नअराऊंड मानला जातो. ही मोठी झेप मानली जात आहे .

यातच कंपनीचे ऍग्रेसिव्ह रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स, दीर्घकालीन PPA आणि कंपनीवर असणाऱ्या कर्जात मोठी घट या कारणांमुळे या स्टॉकचा पुढचा आउटलुक अधिक मजबूत झालेला दिसतोय .

रिलायन्स पॉवर चार्ट अनालिसिस अनुसार

सध्या शेअरचा चालू बाजार भाव (CMP) ₹71.24 आहे.
शेअरने अलीकडेच ₹55.22 च्या पातळीवरून यशस्वी ब्रेकआउट दिला आहे, जो एक महत्त्वाचा शॉर्ट-टर्म ब्रेकआउट स्तर मानला जातो.
पुढील प्रथम टार्गेट व प्रमुख रेसिस्टन्स झोन ₹75.84 ते ₹80.46 दरम्यान आहे.
लाँग-टर्म साठी, ₹101 हा दुसरा संभाव्य टार्गेट म्हणून पाहिला जात आहे.
खालील बाजूला, शेअरला ₹37.83 आणि ₹35.39 या पातळीवर मजबूत आधार (Strong Support Levels) मिळतो.

Reliance Power Chart Analysis 2025
Reliance Power Chart Analysis 2025

 

रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये महत्त्वाचे पॉइंट्स: सखोल विश्लेषण

1. यशस्वी ब्रेकआउट (Successful Breakout):

हा स्टॉक ₹55 च्या महत्त्वाच्या रेजिस्टन्स स्तरावरून ब्रेकआउट देऊन वरच्या दिशेने वेगाने वाढला आहे. हा ब्रेकआउट फसवणूक करणारा नसून खरा ब्रेकआउट असल्याचे किंमतीतील तेजी आणि व्हॉल्यूम दर्शवते. अशा प्रकारचा ब्रेकआउट ट्रेडर्ससाठी नवीन अपट्रेंड सुरू होण्याची पहिली पुष्टी असतो.


2. शॉर्ट टर्म टार्गेट पार (Short-Term Target Achieved)

ब्रेकआउटनंतर पहिला लघुकालीन टार्गेट ₹55.22 होता, जो अगदी काही दिवसांत गाठला गेला आहे. हे दर्शवते की खरेदीदारांचा दबाव वाढत आहे आणि स्टॉकमधील सकारात्मक गती कायम आहे.


3. पुढील प्रमुख रेसिस्टन्स झोन (Major Resistance Zone Ahead)

स्टॉक आता एका महत्त्वाच्या रेजिस्टन्स झोनच्या जवळ पोहोचला आहे जो ₹75.84 ते ₹80.46 दरम्यान आहे. ही रेंज ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक वेळा विक्रीचे स्थान राहिले आहे, त्यामुळे या भागात किंमत अडखळू शकते. येथे प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन सावध राहणे गरजेचे आहे.


4. 52 आठवड्यांचा उच्चांक (52-Week High)

स्टॉकने 10 जून 2025 रोजी ₹72.23 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. हा आकडा तांत्रिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा टप्पा असून यामुळे स्टॉकमध्ये ट्रेडिंग कम्युनिटीचा विश्वास वाढला आहे.


5. व्हॉल्यूमद्वारे ब्रेकआउटची पुष्टी (Strong Volume Confirmation)

ब्रेकआउटसाठी फक्त किंमत पुरेशी नसते, त्याला व्हॉल्यूमचा पाठिंबाही असावा लागतो. या स्टॉकमध्ये ब्रेकआउट दरम्यान लक्षणीय व्हॉल्यूम आढळून आला, जो खरेदीदारांचा जोर स्पष्टपणे दर्शवतो. व्हॉल्यूम बेस ब्रेकआउट्स अधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह मानले जातात.


6. मजबूत मूलभूत स्थिती (Positive Fundamentals)

Q4 FY25 मध्ये कंपनीने चांगला नफा नोंदवला आहे. यासोबतच रिन्यूएबल एनर्जी संबंधित प्रोजेक्ट्समधील सहभागामुळे कंपनीचा दीर्घकालीन आउटलुक देखील सकारात्मक आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मिळालेला ब्रेकआउट मूलभूतदृष्ट्याही समर्थित आहे.


7. लॉन्ग टर्म व्हिजन (Long-Term View)

चार्ट्स आणि प्रोजेक्शन्सनुसार, स्टॉक पुढील काही महिन्यांमध्ये ₹101 चा टप्पा गाठू शकतो, असे संकेत देत आहे. यासाठी मात्र बाजारातील समग्र परिस्थिती अनुकूल असावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी असू शकते.


8. सपोर्ट झोन्स (Support Zones)

₹37 ते ₹32 चा रेंज हा मजबूत सपोर्ट झोन आहे. याआधी या स्तरांवर स्टॉकने बरेच वेळा सपोर्ट घेतला आहे. जर स्टॉकमध्ये नफा बुकिंगमुळे घसरण झाली, तर हा झोन पुन्हा एकदा रिव्हर्सल पॉइंट ठरू शकतो.


9. जोखमीचे व्यवस्थापन (Risk Management Tip)

सध्याच्या किंमतीवर नवीन एंट्री घेणे धोकादायक ठरू शकते, कारण स्टॉक 52-वीक हायच्या जवळ आहे आणि मोठ्या रेजिस्टन्स झोनमध्ये प्रवेश करत आहे. अशावेळी ट्रेडर्सनी थांबून संभाव्य करेक्शनची वाट पाहणे अधिक सुरक्षित ठरेल. त्यानंतरच योग्य सपोर्ट लेव्हलवर एंट्री घेणे फायदेशीर ठरू शकते.


 निष्कर्ष:
स्टॉकमध्ये ब्रेकआउट, चांगली व्हॉल्यूम पुष्टी, सकारात्मक फंडामेंटल्स आणि टार्गेट्सचे स्पष्ट निर्देश मिळत असून, हे सर्व घटक एकत्रितपणे दीर्घकालीन वाढीची शक्यता दर्शवत आहेत. मात्र, योग्य वेळ आणि रेसिस्टन्स स्तरांवर सतर्क राहणे आवश्यक आहे.

Reliance Power ने दीर्घकालीन कर्ज कमी करून, पुन्हा नफ्यात परत येण्याची सुरुवात केली आहे. रिन्यूएबल एनर्जीमध्ये तेजीने काम करत असल्याने, सरकारच्या ग्रीन एनर्जी व्हिजनमध्ये ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

चार्टनुसार, ₹75-₹80 मध्ये काही प्रॉफिट बुकिंग होऊ शकते, पण या झोनचा ब्रेकआउट झाल्यास ₹101 पर्यंत रॅली होण्याची शक्यता आहे.

FAQ – Reliance Power Chart Analysis 2025

Q1. Reliance Power चा सध्याचा शेअर प्राईस किती आहे?
Ans: 10 जून 2025 रोजी Reliance Power चा शेअर ₹71.24 वर बंद झाला आहे, जो सध्याचा बाजार भाव (CMP) आहे.

Q2. Reliance Power साठी पुढील टार्गेट काय आहे?
Ans: पहिला टार्गेट ₹75.84 ते ₹80.46 या रेंजमध्ये आहे, तर दीर्घकालीन टार्गेट ₹101 पर्यंतचा आहे.

Q3. Reliance Power चा ब्रेकआउट कोणत्या पातळीवर झाला?
Ans: या स्टॉकने ₹55.22 च्या पातळीवरून यशस्वी ब्रेकआउट दिला आहे, ज्यामुळे शेअरमध्ये वेगाने वाढ झाली आहे.

Q4. Reliance Power ने 52 आठवड्यांचा उच्चांक कधी गाठला?
Ans: 10 जून 2025 रोजी Reliance Power चा शेअर ₹72.23 वर जाऊन 52-हफ्त्यांचा उच्चांक गाठला.

 

READ MORE

Ambuja Cement Share Chart Analysis: जानिए 2025 से 2028 तक के टारगेट्स

दिवा-कोपर स्थानकदरम्यान लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू – मुंबई लोकलमधील गर्दीने घेतले बळी

सुझलॉन एनर्जी शेअर नवीन व्यवस्थापन, कर्जमुक्ती योजना आणि FII,DII होल्डिंग वाढत आहे

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स