आधार लिंक नवीन नियम रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंगसाठी – एजंटसाठी टाइम लिमिट लागू

रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू – आधार लिंकिंग बंधनकारक, एजंटवर वेळेची मर्यादा

रेल्वेचे तात्काळ तिकीट बुक करताना बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल की तुम्ही किती फास्ट प्रोसेस केली तरी काही मिनिटात Ticket Not Avilable असा मेसेज बघायला मिळतो  याचा अर्थ की तिकीट संपलेले आहेत.

टिकीट बुकिंग साठी दलालांकडून अनेकवेळा बनावट आयडी बनवून ऑनलाईन तिकीट बुक करत असल्याची तक्रार सातत्याने समोर येत होत त्यामुळे तात्काळ तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अडचणींचा  सामना करावा लागत होता, प्रवाशांनी सातत्याने आवाज उठवल्यामुळे अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी नवे बदल जाहीर केले आहेत 

भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये सातत्याने होणाऱ्या गैरप्रकारांमुळे सामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचे नियम बदल जाहीर केले आहेत, जे येत्या 1 जुलै 2025 पासून लागू होतील.

रेल्वे तत्काळ तिकीट मिळवणे होणार सोपे

प्रवाशांनी अनेक वेळा तक्रार केली होती की तत्काळ तिकिटं काही सेकंदातच संपतात. कितीही जलद प्रक्रिया केली तरी “Ticket Not Available” असा संदेश दिसतो.

यामागील एक मोठं कारण म्हणजे दलाल व एजंटकडून अनेक बनावट आयडी वापरून मोठ्या प्रमाणात तिकिटं बुक केली जात होती. हे तिकिटं मग सामान्य प्रवाशांना अधिक दराने विकली जात होती.

रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय

सातत्याने तक्रारी मिळाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी यात हस्तक्षेप करत मोठे बदल जाहीर केले आहेत. या बदलांमुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सोपी सेवा मिळणार आहे.

रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम पुढीलप्रमाणे

1. आधार लिंकिंग अनिवार्य

1 जुलै 2025 पासून IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवरून ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक असेल.
15 जुलै 2025 पासून ही प्रक्रिया आणखी सक्तीची होणार असून, आधार आधारित OTP प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणतेही तिकीट बुक होणार नाही.

2. एजंटसाठी वेळेची मर्यादा

तिकीट एजंट हे जास्त प्रमाणात तिकिटं बुक करत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे आता IRCTC ने एजंटसाठी बुकिंग वेळांवर मर्यादा आणली आहे, आता TICKET WINDOW  ओपन झाल्यावर पहिले 30 मिनिट एजंट लातिकीट बुक करता येणार नाही त्यावेळेस सामान्य नागरिकच टिकीट बुक करू शकतात

 तिकीट एजंट साठी वेळ बदलली

  • AC तिकीट बुकिंगसाठी: सकाळी 10:00 ते 10:30 या वेळेत एजंट बुकिंग करू शकणार नाहीत.
  • विना AC तिकीट बुकिंगसाठी: सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत एजंट बुकिंग करू शकणार नाहीत.
    या वेळेत सामान्य नागरिकांनाच बुकिंग करता येईल.

3. IRCTC प्रोफाईलशी आधार कसा लिंक करावा?

तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचे असल्यास खालील पद्धतीने आधार लिंक करणे आवश्यक आहे:

  • IRCTC च्या वेबसाइटवर लॉगिन करा.
  • My Account’ मध्ये जाऊन ‘Link Your Aadhaar’ वर क्लिक करा.
  • तुमचे आधार क्रमांक व नाव भरा आणि सबमिट करा.
  • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा.

 

वेटिंग तिकीट कन्फर्मेशन आता लवकर मिळणार

याआधी ट्रेन सुटण्याच्या फक्त 4 तास आधी चार्ट तयार होत असे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झालंय की नाही हे वेळेवर कळत नसे. आता नवीन नियमानुसार ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच चार्ट तयार केला जाईल, त्यामुळे प्रवाशांना कन्फर्मेशनची माहिती वेळेत मिळेल.

नवीन बदलांमुळे होणारे फायदे

  • दलालांवर नियंत्रण येईल.
  • तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
  • सामान्य नागरिकांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.
  • बनावट आयडी व गैरप्रकारांना आळा बसेल.
  • आधार OTP प्रमाणीकरणामुळे सुरक्षा वाढेल.

 

निष्कर्ष:

भारतीय रेल्वेने घेतलेला हा निर्णय निश्चितच प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. एजंट आणि दलालांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होणार असून प्रवाशांनी त्यांच्या IRCTC खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही.

 

FAQ- तात्काळ तिकीट बुकिंग संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

1. IRCTC वरून तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे का?

होय, 1 जुलै 2025 पासून IRCTC वरून तात्काळ किंवा कोणतेही तिकीट ऑनलाईन बुक करताना आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.
15 जुलैपासून OTP प्रमाणीकरणा शिवाय तिकीट बुक होणार नाही.

2.तिकीट एजंट आता कोणत्या वेळेस बुकिंग करू शकणार नाहीत?

AC तिकीटासाठी: सकाळी 10:00 ते 10:30 आणी  Non-AC तिकीटासाठी: सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत एजंट बुकिंग करू शकणार नाहीत.

3.आधार कार्ड IRCTC प्रोफाईलशी कसे लिंक करावे?

IRCTC वेबसाइट वर किंवा मोबाईल अँप लॉगिन करा → ‘My Account’ मध्ये जा → ‘Link Your Aadhaar’ वर क्लिक करा → आधार क्रमांक व नाव भरून OTP टाकून सबमिट करा.

READ MORE 

 

🔔 रेल्वे तिकीट बुकिंगचे नवीन नियम, ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या सरकारी बदलांची माहिती हवी आहे का?

📲 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये आजच सामील व्हा आणि अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवा!

👇 जॉइन करा आता
👉 WhatsApp ग्रुप जॉइन करा

 

Leave a Comment

2025 मधील 3 मोठ्या सरकारी भरत्या – CME , NHAI आणि SSC संपूर्ण माहिती ५० रुपयांत अनुभव घ्या शिवसृष्टीचा इतिहास – शिवप्रेमींना खास संधी! ISRO व भारतीय लष्कर भरती 2025: अर्ज कसे कराल? Jio 5G Smartphone: 100MP कॅमेरासह जबरदस्त बजेट फोन भारतात लाँच होणार MHADA फ्लॅट लॉटरी पुणे 2025: ऑनलाईन नोंदणी, पात्रता संपूर्ण माहिती Reliance Power ब्रेकआउटनंतर 52 आठवड्यांच्या उच्चांकीवर
शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स