Pune Road Accident: बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात; दोन भावांचा जागीच मृत्यू

बंडगार्डन मेट्रोखाली काळ्या पोलो कारचा भीषण अपघात – दोन भावांचा जागीच मृत्यू

पुणे │ बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण Pune Road Accident मध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात रविवारी पहाटे सुमारे 4.30 वाजता घडला. काळ्या रंगाच्या पोलो कारने (MH 14 DT 8292) मेट्रो स्टेशनच्या खांबाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गाडीचा चक्काचूर झाला आहे.

मृत तरुणांची नावे यश प्रसाद भंडारी (वय 23, रा. थेरगाव, पिंपरी चिंचवड) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय 23, रा. पिंपरीगाव, पुणे) अशी आहेत. दोघेही सख्या चुलत भाऊ असल्याने त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  तर जखमी तरुणाचे नाव खुशवंत टेकवाणी असून तो बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीसाचा अपघाताच्या कारणाचा अंदाज

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दारूच्या नशेत गाडी चालवली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण अपघातग्रस्त कारच्या आत दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी सांगितले की, “पहाटे पाचच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली काळ्या कलर ची
पोलो कार खांबावर आदळली.

या अपघातात ड्राइवर आणी एक  जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी आहे. मृतांची ओळख पटली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवले असून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर चालकालने दारू पिऊन गाडी चालवली की नाही याची माहिती मिळेल


पुने अपघात बातमीचे  महत्वाचे मुद्दे

  • घटना : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली पहाटे 5 वाजता
  • वाहन : काळी पोलो कार (MH 14 DT 8292)
  • मृत : दोन सख्या चुलत भाऊ – यश भंडारी आणि ऋत्विक भंडारी
  • जखमी : खुशवंत टेकवाणी (बीड)
  • संशय : दारूच्या नशेत गाडी चालवली असावी
  • तपास : कोरेगाव पार्क पोलिसांकडून सुरू

FAQ

1. अपघात नेमका कुठे झाला?
→ बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली, पुणे शहरात हा भीषण Pune Road Accident घडला.

2. या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला?
→ दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.

3. पोलिस तपासात काय समोर आले?
→ प्राथमिक तपासानुसार, अपघाताच्या वेळी गाडीतील व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ABP माझा यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील हा व्हिडिओ पहा:




पुण्यात पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली झालेल्या एका भीषण अपघाताने सर्वांना हादरवले आहे. काळ्या रंगाच्या पोलो कारचा ताबा सुटल्याने गाडी थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन धडकली, आणि या अपघातात दोन सख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

ही घटना रविवारी पहाटे साधारण साडेचारच्या सुमारास घडली. पोलो कार (MH 14 DT 8292) इतक्या जोरात धडकली की गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चुराडा झाला. मृत तरुणांची नावे यश प्रसाद भंडारी (23, रा. थेरगाव) आणि ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (23, रा. पिंपरीगाव) अशी आहेत. हे दोघे सख्या चुलत भाऊ असल्याने त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जखमी खुशवंत टेकवाणी हा बीड जिल्ह्याचा असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अपघातावेळी दारूच्या नशेत वाहन चालवले गेले असावे, असा संशय आहे. कारण गाडीच्या आत रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. कोरेगाव पार्क पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी सांगितले की, पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ससून रुग्णालयात हलवले. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर चालकाने दारू पिऊन गाडी चालवली की नाही, हे स्पष्ट होईल.

Leave a Comment