पुण्यात 7 नंतर पेट्रोल पंप बंद? वाढत्या हल्ल्यांवर मोठा निर्णय; पोलिसांचा तत्काळ प्रतिसाद

 ब्रेकिंग न्यूज: पुण्यात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद? कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांनंतर मोठा निर्णय

Petrol pumps closed after 7 pm in Pune?

पुणे—शहरात संध्याकाळनंतर पेट्रोल पंप बंद राहणार की सुरू राहणार, याबाबत मोठी चर्चा रंगत आहे. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रात्री वाढणाऱ्या मारामारी, हल्ले आणि वादामुळे महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांत फातिमा नगर, पुलगेट, सिंहगड रोड, येरवडा या भागांमध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर विनाकारण वाद घालत हल्ला करण्याचे प्रकार घडले. अनेक कर्मचाऱ्यांना जखमीही व्हावे लागले.

या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना रात्री पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. “रात्री सुरक्षा मिळाली तरच पंप सुरू ठेवू,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.

मात्र, महत्त्वाची अपडेट अशी की पुणे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, आणि त्यामुळे पंप संध्याकाळी 7 नंतरही सुरू राहण्याची शक्यता अधिक आहे. मागील आठवड्यात तीन ते चार हल्ल्यांनंतर असोसिएशनकडून हा कठोर निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, राज्यभरातील पेट्रोल पंप सुरक्षेवर चर्चा होणार आहे.

पंप कर्मचारी व ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून, पुणेकरांच्या दैनंदिन वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

येथील परिस्थितीवर आता उपाय निघालेले आहेत, त्यामुळे पुणेकरांनी अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही. पोलिसांकडून तत्काळ संरक्षण देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. तरीही, अशा कोणत्याही घटना दिसल्यास नागरिकांनी स्वतः पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. पुण्यात अनेकजण तीन शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहिल्यास त्यांना मोठा त्रास होऊ शकतो.

 

 

Leave a Comment