OnlyMeter वेबसाइट उपयुक्त आहे का? फायदे, वापर आणि तोटे जाणून घ्या

पुण्यामध्ये बरेच लोक प्रवास करत असतात , मग तो नोकरीवर जाण्या येण्यासाठी असेल  किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी असेल ,ओला उबेर आल्यापासून  प्रवासाचे गणित थोडे बदलले आहे ,तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकता.

परंतु कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी किती भाडे असले पाहिजे हे नक्की नव्हते त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे भाडे आकारले जात होते ,यालाच पर्याय म्हणून आता  कॅब आणि रिक्षामध्ये  मीटर प्रमाणे भाडे आकारले जात आहे यासाठी ओन्ली मीटर ( OnlyMeter.in )ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. 

ही वेबसाईट ओव्हरचार्जिंग थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे,  त्यामुळे तुम्हाला या वेबसाईट बद्दल माहिती असणे आवश्यक आहे,  या वेबसाइट वरून आकारल्या जाणाऱ्या भांड्यामधे सुध्दा प्रवाशाकडून तक्रारी आल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया या वेबसाईट बद्दल सविस्तर माहिती. 

OnlyMeter.in वेबसाईट म्हणजे काय?

  • ठराविक अंतर जाण्यासाठी वेगवेगळे भाडे द्यावे लागत होते त्यामुळे ही वेबसाईट बनवण्यात आली आहे,  या वेबसाईटचा उपयोग तुम्ही भाडे किती दिले पाहिजे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरू शकता 
  • या वेबसाईटचा उपयोग ड्रायव्हर आणि प्रवासी दोघेही करू शकतात.
  •  या वेबसाईटचा उद्देश भाड्याचे प्रमाण निश्चित करणे व जास्तीचे भाडे आकारणे टाळणे हा आहे.

ओन्ली मीटर वेबसाईट कशी वापरावी

  •  तुम्ही वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Cab Fare  आणि Auto Fare  तुम्ही ज्या वाहनाने प्रवेश करत आहे  तो पर्याय निवडावा 
  •  तुमची प्रवासाचे अंतर किलोमीटर मध्ये किती आहे हे त्या ठिकाणी मला भरावे लागेल ते तुम्ही गुगल मॅप वरून सुद्धा बघू शकता
  •  किलोमीटर टाकल्यावरती  तुम्हाला भाड्याचा तपशील लगेच समोर येईल आणि तेवढेच भाडे तुम्हाला द्यावे लागेल

 

 आता पुणेकरांना प्रवासाच्या वेळी ‘OnlyMeter.in’ या वेबसाईटच्या माध्यमातून कॅब व रिक्षाच्या  भाड्याचे कॅल्क्युलेशन सहजपणे करता येते.  रिक्षाचे आणि कॅपचे भाडे कसे आकारले जाणार आहे याचे एक उदाहरण खाली दिलेले आहे

कॅबसाठी भाडे कसे ठरते? (Cab Fare Breakdown)

  • प्रवासाचे उदाहरण: 20 किलोमीटर (AC कॅब)
  • एकूण भाडे: ₹500

ब्रेकडाउन:

  1. बेस फेअर: ₹37 (1.5 किलोमीटरसाठी)
  2. उर्वरित 18.5 किलोमीटरसाठी ₹25 प्रति किलोमीटर

रिक्षासाठी भाडे कसे ठरते? (Auto Fare Breakdown)

  • प्रवासाचे उदाहरण: 20 किलोमीटर
  • प्रतीक्षा वेळ: 5 मिनिटे
  • एकूण भाडे: ₹349 ते ₹365

ब्रेकडाउन:

  1. बेस फेअर: ₹25 (1.5 किलोमीटरसाठी)
  2. उर्वरित अंतरासाठी ₹17 प्रति किलोमीटर
  3. प्रतीक्षा शुल्क: ₹9

या प्रकारे OnlyMeter वेबसाईट पारदर्शक आणि निश्चित भाड्याची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देते. ही माहिती ‘OnlyMeter.in’ वेबसाईटवर भाडे तपासण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून ओव्हरचार्जिंग टाळता येईल आणि पारदर्शक व्यवहार होईल.

वेबसाईट कोणी तयार केली आहे?

OnlyMeter.in ही वेबसाईट प्रणय पाटील यांनी विकसित केली आहे. त्यांनी ही वेबसाईट Baghtoy Rickshawala या उपक्रमाच्या सहयोगाने तयार केली असून, यामागचा उद्देश म्हणजे पुण्यात कॅब व रिक्षाच्या भाड्यांमध्ये पारदर्शकता आणणे व ओव्हरचार्जिंग थांबवणे.

प्रणय पाटील हे सध्या Tata Consultancy Services (TCS), पुणे येथे Full Stack Developer म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण Government College of Engineering, अमरावती येथून पूर्ण केले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना कॅब किंवा रिक्षासाठी योग्य आणि मिटरप्रमाणे भाडे तपासता येते, जे ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

ओन्ली मीटर वेबसाईट वापरल्यामुळे प्रवाशांसाठी फायदे

  •  कॅप किंवा ऑटो ड्रायव्हर सह प्रवाशांनाही ही माहिती उपलब्ध असल्यामुळे  ड्रायव्हर आणि प्रवासी  त्यांच्यामध्ये   वाद होणार  नाहीत
  •  यामुळे प्रवाशांना  ओवरचार्जिंगची भीती नसणार आहे
  •  प्रवाशांना अंदाजित भाडे आधीच समजल्यामुळे संभ्रम निर्माण होणार नाहीत
  • शहरातील सर्वसामान्यांना मिटरप्रमाणे सेवा मिळण्यास मदत होते

पुण्यात प्रवाशांना रिक्षा आणि कॅब सेवेमध्ये पारदर्शकता व योग्य भाडे मिळावे यासाठी  OnlyMeter.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

 

ओन्ली मीटर वेबसाईट ला RTO ची अधिकृत मान्यता नाही, प्रवाशांनी घ्यावी सावधगिरी

OnlyMeter.in या वेबसाईटवर प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे अंतर (किलोमीटरमध्ये) आणि प्रतीक्षा वेळ (मिनिटांमध्ये) टाकून अंदाजे भाडे सहजपणे तपासता येते. ही प्रणाली चालक व प्रवासी दोघांसाठी उपलब्ध आहे आणि भाड्याची पारदर्शकता ठेवण्याचा यामागे उद्देश आहे.

मात्र, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ने या वेबसाईटला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे काही चालक या वेबसाईटचा गैरवापर करून अधिक भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी भाडे देताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

अ‍ॅपमध्ये दर्शविलेले भाडे आणि प्रत्यक्ष मागितले जाणारे भाडे यात फरक वाटल्यास, प्रवाशांनी स्क्रीनशॉट, वाहन क्रमांक आणि इतर पुराव्यांसह RTO कडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून योग्य कारवाई होऊ शकेल.

 

READ MORE 

डिप्लोमा नंतर अधिकारी बनण्याची संधी – MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)

50 रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार पुण्यातील शिवसृष्टी

पुण्यात 11वी चे ऍडमिशन सुरू फॉर्म कसा भरायचा – संपूर्ण माहिती

 

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स