पुण्यात एपीएमसी आंबा महोत्सवात उत्साह; ३१ मेपर्यंत चालणार, हापूससह विविध प्रकारांचे आंबे थेट विक्रीत
पुणेकरांसाठी खुशखबर: चार ठिकाणी आंबा महोत्सव सुरू
पुणे, २९ एप्रिल २०२५ – पुण्यातील आंबा प्रेमींसाठी खुशखबर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे आयोजित केलेला ‘आंबा महोत्सव २०२५’ पुण्यातील चार प्रमुख ठिकाणी सध्या जोरात सुरू आहे.
मार्केट यार्ड, गांधी भवन-कोथरूड, मागरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी महोत्सव भरवण्यात आला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत महोत्सवात सुमारे 40,000 डझन आंब्यांची विक्री झाली आहे. यामुळे अंदाजे 3.5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या ठिकाणची खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची संधी मिळत आहे , त्यामुळे विश्वासार्हता आणि दर्जा याची काळजी करण्याचे काहीच कारण नाही
GI टॅग असलेले हापूस आंबे दर्जेदार उत्पादने मिळण्याची खात्री
महोत्सवात मुख्य आकर्षण ठरत आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून आलेले GI (Geographical Indication) प्रमाणित हापूस आंबे. GI टॅग म्हणजे ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ जो विशिष्ट भागात पिकणाऱ्या उत्पादन ओळखीचं अधिकृत प्रमाणपत्र असतं हे महाराष्ट्र सरकार कडून दिले जाते
महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेले आंबे GI आणि UID टॅगसह विकले जात आहेत. या टॅग्समुळे खरेदीदारांना दर्जेदार आणि प्रमाणित उत्पादने मिळण्याची खात्री मिळते. यामुळे ग्राहकांना समाधानकारक खरेदीचा अनुभव येतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते.
यासोबतच केसर, पायरी, बिटकी आणि महाराष्ट्रातील इतर भागांतून आलेले स्थानिक आंबेही उपलब्ध आहेत. पूर्वी काही व्यापारी इतर राज्यातील आंबे ‘कोंकणी हापूस’ म्हणून विकत असत, मात्र आता GI प्रमाणपत्रामुळे खरी ओळख मिळवली गेली आहे. या नियमामुळे ग्राहकांची फसवणूक टळत आहे आणि दर्जेदार आंब्यांना ओळख मिळते आहे.
१२० स्टॉल्समध्ये थेट शेतकरी-विक्रीचा उपक्रम
या महोत्सवात पूर्ण पुण्या मध्ये जवळ जवळ १२० स्टॉल्स आहेत. त्यापैकी मार्केट यार्डमध्ये ६० स्टॉल्स, तर कोथरूड, हडपसर आणि खराडी येथे प्रत्येकी २० स्टॉल्स आहेत.
या सर्व स्टॉल्सवर सुमारे १५० आंबा उत्पादक आपले उत्पादन थेट ग्राहकांना विकत आहेत. यामुळे मधल्या दलालांची गरज टळली असून, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो आहे आणि ग्राहकांना सुद्धा कमीत कमी दारात मिळत आहे .
दर आणि उपलब्ध वजन श्रेणी – कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार येथे 170 ग्रॅम ते 300 ग्रॅम वजनाचे आंबे विक्रीसाठी आहेत. या आंब्यांचे दर ₹500 ते ₹900 प्रति डझन दरम्यान आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्या बजेटनुसार निवड करू शकतात.
चव आणि सेंद्रियतेच मिलन – या ठिकाणच्या आंब्याची खास गोष्ट म्हणजे सर्व उत्पादन सेंद्रिय खतावर पिकवलेले आहेत , त्यामुळे हा महोत्सव पुणेकरांसाठी एक सेंद्रिय आणि स्वादिष्ट अनुभव ठरत आहे. आंब्यांचा सीजन म्हणजेच ‘आंबा महोत्सव’ केवळ फळ खरेदीचा नव्हे, तर आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीला दाद देण्याचा एक सुंदर उपक्रम आहे.
आपण या महोत्सवाला भेट दिली का?
- जर तुम्ही आंब्यांचे खरे प्रेमी असाल, तर पुण्यात भरलेला एपीएमसीचा आंबा महोत्सव तुमच्यासाठी एक खास पर्वणी आहे.
- थेट शेतकऱ्यांकडून GI प्रमाणित हापूस, केसर, पायरी यांसारखे दर्जेदार आंबे खरेदी करण्याची संधी कुठे मिळणार?
- येथे फसवणुकीचा धोका नाही, दरही योग्य आणि चव तर अफलातून! आम्ही तिथे गेलो, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रत्येक आंब्यातून त्यांच्या मेहनतीची चव अनुभवली.
- तुम्ही अजूनही या महोत्सवाला भेट दिली नसेल, तर लवकरात लवकर भेट द्या. ३१ मेपूर्वी ही संधी सोडू नका – एकदा चव घेतली, की दरवर्षी याल, हे नक्की!
READ MORE
पुणे बाजारात हापूस आंबे दाखल एक डझन साठी ₹,७०० ते ₹२,००० दर
अक्षय तृतीया 2025: 30 एप्रिलला साजरी होणारा शुभ दिवस, जाणून घ्या महत्त्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त