जेजुरी मोरगाव रोड वर भीषण अपघात: 8 जणांचा जागीच मृत्यू

सासवड जवळील जेजुरीत भीषण अपघात: 8 जणांचा जागीच मृत्यू, 5 जखमी 

जेजुरी – 18 जून 2025: पुणे जिल्ह्यातील सासवड पासून पुढे जाणारा रस्ता जेजुरी-मोरगाव या रोडवर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. हा अपघात कार आणी टेम्पो अश्या दोन वाहनांचा झाला आहे , भरधाव वेगात असलेल्या कारने उभ्या असलेल्या मालवाहक पिकअप टेम्पोला जबर धडक दिली , ही धडक एवढ्या जोरात होती कि धडक झाल्यामुळे एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची सविस्तर माहिती:

ही दुर्घटना श्रीराम ढाबा, किर्लोस्कर कंपनीजवळ, जेजुरी-मोरगाव रस्त्यावर घडली. जेजुरीहून बारामतीकडे निघालेली कार वेगात असताना, रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोवर आदळली. या धडकेनंतर कारची टेम्पो शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या कारवर धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, काही सेकंदांतच आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची नावं (प्राथमिक माहिती)

  • सोमनाथ रामचंद्र वायसे – नाझरे कप, ता. पुरंदर
  • रामु संजीवन यादव – नाझरे कप, ता. पुरंदर
  • अजय कुमार चव्हाण – उत्तरप्रदेश
  • अजित अशोक जाधव – कांजळे, ता. भोर
  • किरण भारत राऊत – पवारवाडी, ता. इंदापूर
  • अक्षय शंकर राऊत – झारगडवाडी, ता. इंदापूर
  • अश्विनी शंकर ऐसार – नागनसूर हेद्रे, सोलापूर
  • (एक मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही)

 

अपघातात जखमींची माहिती

या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

पोलीस तपास सुरू:

अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण

या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली. अपघात इतका भीषण होता की आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. मृतदेहांची अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले, तर काही जणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

घटनेनंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे रस्त्यावर अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळ वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.


महत्वाचे मुद्दे:

  • अपघाताची वेळ: १८ जून २०२५, सायंकाळी ७:३०
  • स्थळ: श्रीराम ढाब्याजवळ, जेजुरी-मोरगाव रोड
  • वाहनं: कार आणि पिकअप टेम्पो
  • मृतांचा आकडा: ८ जण जागीच मृत
  • जखमी: ५ जण गंभीर

 

निष्कर्ष:

या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित यंत्रणांकडून जखमींवर उपचार सुरू असून मृतांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. नागरिकांनी रस्त्यावर सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा. पावसामुळे पुढील रस्ता किंवा उभे असलेले वाहन स्पष्टपणे दिसत नाही. विशेषतः ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर स्ट्रीट लाईटची सोय नसल्याने अंधारात दृश्यता आणखी कमी होते.

अशा परिस्थितीत वाहन चालवताना विशेष दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन शक्यतो हळूगतीने आणि सावधपणे चालवावे, तसेच आवश्यक असल्यास थांबून परिस्थिती समजून पुढे जावे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासाचे योग्य नियोजन आणि काळजीपूर्वक वाहनचालक व प्रवाशांनी कृती करणे गरजेचे आहे.

 

READ MORE

ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा संपूर्ण मार्ग व मुक्काम सविस्तर माहिती

तळेगाव दाभाडे पूल दुर्घटना: इंद्रायणी नदीत अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती – पुणे

ईरान-इज़राइल तनाव से सोने में उछाल | ₹1 लाख के पार पहुँचा भारतीय बाजार में सोना

 

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, हवामान अपडेट्स, आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला आजच जॉइन करा!

✅ विश्वासार्ह माहिती
✅ वेगवान अपडेट्स
✅ स्थानिक बातम्यांवर लक्ष केंद्रित

👉 WhatsApp ग्रुप जॉइन करा

सूचना / Disclaimer:

या बातमीत दिलेली प्राथमिक माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ (Maharashtra Times) या विश्वासार्ह माध्यमातून घेतलेली आहे. दिलेली माहिती जनहितार्थ आणि अपडेट्ससाठी प्रस्तुत केली जात आहे.

भुशी डॅम ओव्हरफ्लो: परंतु पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर जमाव बंदी लागू

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स