PMPML बस ब्रेक फेल: 6 वाहनांना धडकली, 4 जण जखमी!

ब्रेकिंग न्यूज (मराठी): पुणे : PMPML बसचे ब्रेक फेल; कोथरुडमध्ये भीषण अपघात, ३ जण जखमी

पुणे – कोथरुडमध्ये नेहमीच गजबजलेल्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. PMPML ची एक बस (MH12 KQ0683) ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटून थेट अनेक वाहनांवर आदळली. या अपघातात ३ जण जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. संबंधित बस चांदणी चौकातून कोथरूड डेपोच्या दिशेने जात होती. भुसारी कॉलनीजवळ थोडासा उतार असलेल्या रस्त्यावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले.

PMPML बसचे ब्रेक फेल: भीषण अपघात

चालकाने कितीही प्रयत्न केला तरी बस थांबवता आली नाही. काही सेकंदांत बसने दोन रिक्षा, एक चारचाकी आणि तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. काही वाहने तर बसबरोबर रस्त्यावर फरफटत गेली.

घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहतुकीचा ओघ अधिक होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याने जात असलेले काही पादचारी थोडक्यात बचावले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने कोणताही जीवितहानीचा प्रकार समोर आलेला नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे आणि जखमींना मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेमुळे PMPML च्या बसांच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रवाशांची आणि नागरिकांची सुरक्षितता या प्राथमिक गरजांपैकी एक आहे, आणि अशा अपघातांनी ती गंभीरपणे धोक्यात येते.

पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. नागरिकांनी वाहन चालवताना अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 सरकार आणि PMPML प्रशासनाचे दुर्लक्ष ?

कोथरुड PMPML बस अपघात प्रकरणात गंभीर प्रश्न: बस क्रमांकावरून उघड होतंय की या बसेस १२ ते १५ वर्ष जुन्या 

मंगळवारी कोथरुडमध्ये घडलेल्या PMPML बस अपघातानंतर एक गंभीर बाब समोर आली आहे – या बसचा क्रमांक (MH12 KQ0683) पाहता ती अंदाजे १२ ते १५ वर्ष जुनी असल्याचे लक्षात येते. इतक्या जुन्या बस आजही रस्त्यावर धावतात हे चिंतेचे आणि धक्कादायक आहे. यावरून स्पष्ट होते की PMPML चा कारभार अक्षरशः भगवंताच्या भरोशावर चालतोय.

या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण हे संकट आणखी मोठंही असू शकलं असतं. अशा जुन्या बसेसचा ‘फिटनेस चेक’ नेमका कसा आणि किती प्रामाणिकपणे केला जातो? यांचे प्रमाणपत्र, ब्रेक सिस्टमची तपासणी, ड्रायव्हर ट्रेनिंग – या सगळ्यांवर सरकारने आणि PMPML प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

जर ब्रेक फेल होणं इतकं सहज शक्य असेल, तर उद्या आणखी मोठा अपघात टळेल कशावरून? हजारो नागरिक PMPML वर दररोज प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जुन्या बसेस त्वरित तपासाव्यात, अनफिट बसेस हटवाव्यात आणि नियमित देखरेखीची सक्ती केली जावी.

हा विषय केवळ अपघातापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत – अन्यथा “प्रवासी सुरक्षित आहेत” ही भावना केवळ भ्रम बनून राहील.

आपणही आपले मत नक्की मांडा – सुरक्षित प्रवास ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

👉 या घटनेवरील विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

 

READ MORE 

टीव्हीएस कंपनीने बनवली जगातील पहिली CNG स्कूटर | मायलेज, वैशिष्ट्ये आणि लाँच अपडेट 2025

“१०वी-१२वी चा निकाल जाहीर होतोय! तारीख, लिंक आणि पुरवणी परीक्षा – सर्व माहिती इथेच!”

“मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये होणार उद्घाटन”

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स