पुणे महानगरपालिकेकडून शैक्षणिक अर्थसहाय्य योजना 2025 : पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
पुणे महानगरपालिका दरवर्षी विविध शैक्षणिक व सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देत असते. या वर्षी सुद्धा शैक्षणिक अर्थसहाय्य योजना जाहीर झाल्या असून 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
विशेष करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिका ही योजना राबवत आहे. याचा फायदा गरजू विध्यार्थ्यांना होईल
महानगरपालिके कडून कोणत्या योजना उपलब्ध आहेत ते जाणून घेऊ ?
1) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
या योजनेचा लाभ फक्त पुण्यातील रहिवासी आणी 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- खुला प्रवर्ग: किमान 80% गुण आवश्यक
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी: किमान 70% गुण आवश्यक (गुण मार्च 2025 च्या परीक्षेनुसार मोजले जातील)
2) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी)
12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- खुला प्रवर्ग: किमान 80% गुण
- मागासवर्गीय प्रवर्ग: किमान 70% गुण
पात्रता अटी (Eligibility Criteria)
PMC च्या शिष्यवृत्ती योजनांसाठी खालील अटी लागू आहेत:
- विद्यार्थ्यांचा निवास पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असावा.
- 10वी किंवा 12वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
विशेष प्रवर्गांसाठी वेगवेगळ्या पात्रता:
- दिव्यांग विद्यार्थी (40%+ अपंगत्व): किमान 55% गुण
- कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पातील पालकांची मुले: किमान 65% गुण
- अंध विद्यार्थी: 10वी / 12वी उत्तीर्ण असणे पुरेसे
ही योजना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकडे वळण्यासाठी मोठी मदत ठरत आहे. अनेक विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांत या शिष्यवृत्तीद्वारे महाविद्यालयीन फी, पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च भागवता आले आहेत.
सहाय्य रक्कम (Scholarship Amount)
- 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी: ₹15,000
- 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी: ₹25,000
ही आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे पारदर्शकता आणि वेगवान प्रक्रिया सुनिश्चित केली जाते.
अर्ज करण्याचा कालावधी
१ ऑगस्ट २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५
या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका आणि प्रवेशाची पावती तयार ठेवावी.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
विद्यार्थ्यांनी खालील अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा:
👉 https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/
शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी PMC ची ही स्कॉलरशिप योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, या योजनेचा लाभ घेऊन उज्ज्वल शिक्षणाची दिशा ठरवू शकतात.
ही संधी नक्कीच गमावू नका, आणी तुमच्या माहितीत असणाऱ्या लोकांपर्यंत सुद्धा पोहचवा, निर्धारित कालावधीत अर्ज करा आणि पुढील शिक्षणासाठी सक्षम पाऊल टाका!
FAQ –
1) पुणे महानगरपालिकेची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी PMC हद्दीत किती काळ राहणे आवश्यक आहे?
बहुतेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्याचा स्थायी पत्ता PMC हद्दीत असणे आवश्यक आहे आणि निवासाचा पुरावा सादर करावा लागतो.
2) या योजनेत केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्तीसोबतही अर्ज करता येतो का?
होय, ही योजना स्वतंत्र आहे. विद्यार्थी पात्र असल्यास इतर शिष्यवृत्तीसोबतही लाभ घेऊ शकतात, मात्र PMC ची नियमावली लागू राहते.
3) अर्ज करताना कोणती कागदपत्रे सर्वात महत्त्वाची आहेत?
10वी/12वी गुणपत्रिका, अॅडमिशन प्रूफ, निवास पुरावा, बँक खाते तपशील आणि आवश्यक असल्यास जातीचा किंवा अपंगत्वाचा दाखला.





