ही बातमी चर्चेचा विषय आहे , लाखो ग्राहकांच्या मोठा धक्का , महाराष्ट्रभरात १० मेपासून पेट्रोल पंपांवर UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड तसेच डिजिटल पेमेंट्स पेमेंट स्वीकारणे थांबवण्याची शक्यता आहे. ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स फेडरेशन अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, “जोपर्यंत सरकार सायबर फसवणुकीपासून संरक्षण देणारी ठोस यंत्रणा तयार करत नाही, तोपर्यंत डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही.
पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट्स बंद कोणी घेतला हा निर्णय ?
पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट्स थांबवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन आणि नाशिक पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन यांनी घेतला आहे. या निर्णयाला ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डिलर्स फेडरेशननेही आपला पाठिंबा दर्शवला आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत सरकार सायबर फसवणुकीपासून संरक्षण करणारी ठोस आणि विश्वासार्ह यंत्रणा सरकार उभी करत नाही, तोपर्यंत पेट्रोल पंपांवर UPI, डेबिट-क्रेडिट कार्ड डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत. नाशिक असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनीही हे पाऊल योग्य असल्याचा दुजोरा दिला
डिजिटल पेमेंट बंदीचा ग्राहकांवर परिणाम: कॅशलेस पेमेंट (Cashless Payments) व्यवहारांना धक्का
पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट्स थांबवण्याच्या निर्णयामुळे लाखो ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः ते ग्राहक जे UPI, डेबिट कार्ड किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून कॅशलेस पेमेंट करतात, त्यांना आता अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत, अनेकजण आता पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी रोख रक्कम सोबत बाळगण्यास भाग पाडले जातील. यामुळे वेळेचा अपव्यय, व्यवहारातील असुविधा आणि काही वेळा इंधन घेण्यास असमर्थता अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
सरकार सध्या डिजिटल पेमेंट चे प्रमाण वाढवण्यासाठी पर्यन्त करीत आहे , त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना देखील या निर्णयामुळे तात्पुरता झटका बसू शकतो. त्यामुळे ग्राहकांच्या सुविधांसाठी आणि सुरक्षित व्यवहारांसाठी त्वरित उपाययोजना करणे अति आवश्यक आहे.
सायबर फसवणुकीमुळे पेट्रोल पंप असोसिएशन्सचा मोठा निर्णय: डिजिटल पेमेंट बंद
विदर्भ आणि नाशिकमधील पेट्रोल पंप चालकांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे डिजिटल पेमेंट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक पंपचालकांनी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. ग्राहक बनवाट डेबिट/क्रेडिट कार्ड्स किंवा फेक नेट बँकिंगचा वापर करून इंधन खरेदी करतात आणि नंतर बँकांकडून परतावा मागतात, त्यामुळे पंप चालकांना थेट नुकसान सहन करावं लागतं. काही प्रकरणांमध्ये बँक खाती गोठवल्याचंही समोर आलं आहे. नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले की, “सुरक्षितता यंत्रणा तयार होईपर्यंत आम्ही डिजिटल व्यवहार थांबवत आहोत.” असोसिएशन्सचा हा निर्णय चालकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सायबर फसवणुकीपासून बचावासाठी आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सायबर फसवणुकी मुळे नाशिकमधील पंपचालक आर्थिक नुकसानीत
नाशिकमधील पेट्रोल पंप चालक सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले की, अनेक पंपचालकांनी आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
फसवणूक करणारे ग्राहक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून इंधन घेतात आणि नंतर ते पैसे बँकेमार्फत परत घेतात. या प्रकारामुळे पंप चालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे असोसिएशनने ठोस सुरक्षा व्यवस्था तयार होईपर्यंत डिजिटल व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर राज्यांतील पेट्रोल पंपांवर सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ
सध्या विदर्भ आणि नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवरील सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली, तरी भारतातील इतर राज्यांमध्ये असे प्रकार घडण्याची दाट शक्यता , डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे आणी हा पर्याय ग्राहक आणि विक्रेता दोघांसाठी वेळेची बचत करणारा आणि कमी गुंतागुंतीचा आहे , याचाच सायबर गुन्हेगार विविध आयडिया वापरून फसवणूक करत आहेत.
बनावट युपीआय व्यवहार, हॅक केलेली कार्ड्स आणि फेक ट्रान्झॅक्शन या प्रकारच्या पद्धती वापरून सायबर गुन्हेगार पेट्रोल पंपांवर फसवणूक करत आहेत , जर योग्य सायबर सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, तर इंधन व्यवसायाशी संबंधित अनेक पंप चालकांना भविष्यात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे सर्व राज्यांतील पेट्रोल पंप चालकांनी वेळेत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
READ MORE