दहावी किंवा बारावीच्या परीक्षेनंतर बहुतेक विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसारख्या पारंपरिक क्षेत्राकडे वळतात. मात्र आधुनिक काळात करिअरसाठी विविध “ऑफबीट” मार्ग देखील खुल्या झाले आहेत. हे मार्ग पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून थोडे हटके असले तरी, योग्य कौशल्य आणि माहितीच्या आधारे यामध्येही यशस्वी भवितव्य घडवता येते.
चला जाणून घेऊया अशाच काही वेगळ्या आणि रोमांचक करिअर पर्यायांबद्दल जे बारावीनंतर निवडता येऊ शकतात.
मरीन इंजिनिअरिंग
मरीन इंजिनिअरिंग हा कोर्स समुद्री जहाजे, पनडुब्ब्या, क्रूझ आणि टँकर यांचे डिझाईन, निर्मिती, देखभाल व संचालन यासंबंधी तांत्रिक ज्ञान देतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांना जहाजातील यंत्रसामग्री, विद्युत प्रणाली व सुरक्षा यांची चांगली समज असावी लागते.
शिक्षण:
१२वी विज्ञान शाखेतून (PCM) किमान 60% गुण आणि इंग्रजीत 50% गुण आवश्यक. नंतर बी.ई., बी.टेक मरीन इंजिनिअरिंग, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी कोर्सेस उपलब्ध
प्रवेश परीक्षा:
IMU CET, JEE Main, GATE, TNEA Counseling, AP EAMCET.
प्रमुख कॉलेजेस:
- टोलानी मरीन इंस्टिट्यूट, पुणे
- IMU कोलकाता
- समुंद्रा मरीन स्टडीज, पुणे
- BP मरीन अकॅडमी, मुंबई
कोर्स फी: ₹6 लाख ते ₹15 लाख दरम्यान
करिअर संधी:
शिप इंजिनिअर, पोर्ट इंजिनिअर, डिझाईन इंजिनिअर, मेंटेनन्स इंजिनिअर, नेव्हल आर्किटेक्ट इ.
नोकरीचे क्षेत्र:
शिपिंग कंपन्या, शिपयार्ड, मरीन कंसल्टन्सी, भारतीय नौदल, तटरक्षक दल
सरासरी पगार: ₹6 लाख प्रतिवर्ष
2. मास मीडिया – माध्यमांच्या जगात करिअर
कोर्सचे नाव: बारावीनंतर बी.एम.एम. (Bachelor of Mass Media) – ३ वर्षांचा पदवी कोर्स.
पात्रता:
- १२वी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतून), काही महाविद्यालयांमध्ये किमान ५०% गुणांची अट लागू शकते.
- काही संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत आवश्यक असते.
प्रवेश प्रक्रिया:
- काही महाविद्यालये थेट प्रवेश देतात, तर काही ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतली जाते.
- काही संस्थांमध्ये मुलाखतीद्वारे निवड केली जाते.
महत्वाचे विषय: पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क (PR), रेडिओ आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन, डिजिटल मीडिया, फिल्म स्टडीज, मीडिया कायदे, आणि समाजशास्त्र.
संधी:
न्यूज चॅनल, न्यूज पोर्टल, कंटेंट मार्केटिंग, जाहिरात एजन्सी, यूट्यूब मॅनेजमेंट, सोशल मीडिया ऑपरेशन्स यामध्ये नोकरीच्या संधी मिळतात.
3. संशोधन – वैज्ञानिक विचारांची वाट
संशोधन हे क्षेत्र विज्ञानाची आवड आणि सखोल ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. नविन तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, पर्यावरण किंवा शेती यावर संशोधन करण्याची संधी मिळते.
शिक्षण:
१२ वी विज्ञान (PCM किंवा PCB) नंतर बी.एस्सी., एम.एस्सी. आणि पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेऊन रिसर्च क्षेत्रात प्रवेश करता येतो.
संधी:
शासकीय संस्था, प्रायव्हेट संशोधन संस्था, फार्मा कंपन्या, संरक्षण संशोधन संस्था अशा अनेक ठिकाणी संधी उपलब्ध असतात.
फाइन आर्ट्स
फाइन आर्ट्स हे क्षेत्र रचनात्मकतेला वाव देणारे आहे. चित्रकला, शिल्पकला, अॅनिमेशन, इन्टिरिअर डिझाईन अशा विविध माध्यमातून स्वतःची कला मांडता येते.
शिक्षण:
१२ वी नंतर ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स’ हा कोर्स केला जातो. अनेक खासगी आणि सरकारी कला महाविद्यालये उपलब्ध आहेत.
संधी:
डिझाईन स्टुडिओ, जाहिरात कंपन्या, अॅनिमेशन स्टुडिओ, इन्टिरिअर डिझाईन फर्म्स इत्यादी क्षेत्रात करिअर करता येते.
सायकोथेरपिस्ट
समाजात वाढती मानसिक अस्वस्थता लक्षात घेता सायकोथेरपी ही अत्यंत गरजेची आणि समर्पक सेवा ठरत आहे. विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांना या सेवा दिल्या जातात.
शिक्षण:
१२ वी नंतर बी.एस्सी. इन सायकोलॉजी आणि त्यानंतर एम.एस्सी. इन सायकोथेरपी किंवा समतुल्य कोर्सेस.
संधी:
शाळा, महाविद्यालये, मानसिक आरोग्य केंद्र, खासगी सल्लागार सेवा, रुग्णालये येथे करिअर करता येते.
बायोटेक्नोलॉजी-औषधनिर्मिती आणि शेती
निवडणूक किंवा त्याच्याशी संबंधित मिळणाऱ्या जैविक उत्पादन तयार करणे किंवा प्रक्रिया सुधारणा.
करिअरच्या संधी:
औषध कंपन्या, संशोधन संस्था, अॅग्रिकल्चर बायोटेक सेंटर, शिक्षण संस्था, बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था.
शिक्षण:
१२ वी नंतर बी.एस्सी., बी.टेक. बायोटेक्नोलॉजी, प्रवेशासाठी सीईटी/जेईई किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा देणे आवश्यक.
डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स
- कोर्सेस: B.Sc. in Data Science, B.Sc. in AI/ML.
- पात्रता: १२वी विज्ञान पूर्ण केलेली असावी
बायोटेक्नोलॉजी आणि पर्यावरण विज्ञान
- कोर्सेस: B.Sc. in Biotechnology, B.Sc. in Environmental Science.
- पात्रता: १२वी विज्ञान पूर्ण केलेली असावी.
READ MORE
2025 मध्ये आयटीआयचे सर्वाधिक ट्रेंडिंग कोर्सेस – कोणता कोर्स निवडाल?
पुण्यात ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनचे उद्घाटन – भारतातील विमानचालन क्षेत्रासाठी नवी दिशा
भारती एअरटेलच्या तिमाही निकालात जबरदस्त उसळी – एरटेल शेअर चे टार्गेट 2000 आणी पुढे