पुणे, मे २०२५ – महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मुंबई आणि पुणे शहरांमध्ये खासगी वाहनांच्या कारपूलिंग ला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.ही कार मालक आणी सहप्रवासी दोघांसाठी आनंदाची बातमी आहे ,
२९ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णया वाहतूक कोंडी, इंधन खर्च, आणि प्रदूषण कमी होण्याच्या अपेक्षे ने घेण्यात आला आहे .
मुंबई आणि पुणे शहरांमध्ये कारपूलिंगला कायदेशीर परवानगी
- करपुलिंग ला मान्यता देण्याच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे. खर्चात आणि वेळेची बचत, तसेच पर्यावरणपूरक प्रवासाची संधी यामुळे नागरिक उत्साही आहेत. मात्र पारंपरिक टॅक्सी व रिक्षा चालक संघटनांकडून याला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- प्रत्येक प्रवासाचे सुरवातीचे व शेवटचे ठिकाण नमूद करणे आवश्यक आहे. सेवा पुरवणाऱ्या अॅप कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणासाठी २४x७ हेल्पलाईन उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्र हे खासगी वाहनांच्या कारपूलिंगला कायदेशीर परवानगी देणारे अग्रगण्य राज्य ठरले आहे.
कारपूलिंग म्हणजे काय?
कारपूलिंग म्हणजे सहप्रवास किंवा एकत्र प्रवास, ज्यामध्ये एकाच दिशेने जाणारे अनेक लोक एकाच गाडीने प्रवास करतात. हे नियोजन ऑफिस, कॉलेज किंवा लांबच्या प्रवासासाठी केले जाते. यामुळे इंधनाची बचत होते, ट्रॅफिक कमी होतो आणि प्रवासाचा खर्च वाटून घेतला जातो.
“कारपूलिंगचे फायदे: तुमचं खिशालाही आणि पर्यावरणालाही दिलासा”
1. वाहतूक कोंडी कमी होणे
जेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या वाहनांमध्ये प्रवास करतात, तेव्हा रस्त्यावरची वाहने वाढतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. पण कारपूलिंगमुळे ४-५ लोक एकाच गाडीत बसतात, त्यामुळे वाहनांची संख्या कमी होते आणि रस्त्यावरचा ताण हलका होतो. परिणामी वाहतूक सुरळीत चालते.
2. इंधन खर्च कमी होणे
जर चार लोक वेगवेगळ्या गाड्यांमध्ये प्रवास करत असतील, तर चार गाड्यांचे इंधन लागते. पण तेच जर एकाच गाडीतून गेले, तर फक्त एका गाडीचा इंधन खर्च होतो. यामुळे एकूण इंधनाची बचत होते आणि आर्थिकदृष्ट्या सर्व प्रवाशांना फायद्याचे ठरते.
3. प्रदूषण कमी होणे
प्रत्येक गाडी प्रदूषक वायू (जसे की कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड्स) हवेत सोडते. अधिक गाड्या म्हणजे अधिक प्रदूषण. पण कारपूलिंग केल्यास गाड्यांची संख्या कमी होते आणि त्यामुळे हवेत सोडले जाणारे प्रदूषणही कमी होते. पर्यावरणाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे.
थोडक्यात,कारपूलिंगमुळे शहरातली वाहतूक अधिक सुकर, खर्च अधिक कमी आणि हवा अधिक शुद्ध होण्यास मदत होते.
कारपूलिंग साठी सरकारकडून मंजूर अॅप्सचा वापर अनिवार्य
हा कारपूलिंग उपक्रम फक्त सरकारने अधिकृत मान्यता दिलेल्या मोबाईल अॅप्स किंवा वेबसाइट्सच्या माध्यमातूनच करता येणार आहे. अद्याप अंतिम यादी जाहीर झालेली नसली तरी Shride, Quick Ride, BlaBlaCar आणि RYDE या अॅप्सना मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
कारपूलिंग ट्रिपसाठी मर्यादा आणि भाडे नियमन
- प्रत्येक खासगी वाहनचालक आठवड्यात जास्तीत जास्त १४ ट्रिप करू शकेल. यामुळे कारपूलिंगचा उद्देश फक्त शेअरिंग पुरता मर्यादित राहील.
- प्रवासासाठी घेतले जाणारे भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) ठरवणार आहे. हे भाडे टॅक्सीपेक्षा अधिक असू शकणार नाही. इंधन, टोल, विमा आणि गाडीच्या देखभाल खर्चाचा विचार करून दर निश्चित केले जातील.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी
महिला प्रवाशांसाठी पुढील उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत:
- चालक व प्रवाशांची पोलीस पडताळणी
- महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय
- सर्व प्रवाशांना प्रवास विमा संरक्षण
- घर व कार्यालयाचा पत्ता अॅपवर नोंदवणे बंधनकारक

स्क्वेअर रूट डे-१०० वर्षात फक्त ९ वेळा येणारा हा खास दिवस