7 मे मॉक ड्रिल पाहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारची मोठ पाऊल

पुणे शहरात 7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलचे संपूर्ण तपशील (Pune Mock Drill Details – 7 May)

देशभरात सुरू असलेल्या आपत्कालीन परिस्थितींच्या तयारीसाठीची राष्ट्रीय मॉक ड्रिल 7 मे रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. पुणे शहर आणि परिसरात खालील ठिकाणी ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे:

मॉक ड्रिलच्या आयोजनामागील मुख्य कारण

“पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.”

मॉक ड्रिलचे उद्दिष्टे

  • हवाई हल्ला, बॉम्बस्फोट किंवा इतर दहशतवादी घटनांमध्ये नागरिकांचे जीवन वाचवण्याचे प्रशिक्षण
  • बंकर, खंदक स्वच्छता, आणि सायरन सिस्टीम तपासणी
  • आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय
  • जनतेत जागरूकता निर्माण करणे व प्रत्यक्ष संकटात योग्य कृती करण्याचा सराव

पुण्यातील मॉक ड्रिल प्रमुख ठिकाणे

1.Council Hall, पुणे शहर

  • जिल्हा प्रशासन आणि नागरी सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीखाली सराव होणार.
  • हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतर कसे करावे याचे प्रात्यक्षिक.

2.पंचायत समिती कार्यालय, मुळशी तालुका

  • ग्रामीण भागातील प्रशासन आणि नागरिकांसाठी आपत्कालीन प्रशिक्षण.
  • वीज खंडित परिस्थिती आणि सुरक्षित स्थळांवर स्थलांतर याचे मार्गदर्शन.

3.नगर परिषद कार्यालय, तळेगाव

  • स्थानिक नागरीक व शालेय विद्यार्थ्यांसाठी सायरन, बंकर साफसफाई, ब्लॅकआउट सराव.
  • अग्निशमन आणि पोलीस यंत्रणांचा समावेश.

काय अपेक्षित आहे मॉक ड्रिलमध्ये?

  • सायंकाळी 4 वाजता हवाई हल्ल्याचा सायरन वाजवला जाईल.
  • नागरिकांनी बंकर किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सराव करावा लागेल.
  • 30 मिनिटांनंतर दुसरा सायरन वाजून सरावाचा शेवट दर्शविला जाईल.
  • प्रशिक्षित यंत्रणा (पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन टीम) घटनास्थळी दाखल होऊन कृती दाखवतील.

मॉक ड्रिल नागरिकांसाठी सूचना

  • कृपया घाबरू नका – हा फक्त सरावाचा भाग आहे
  • पोलिसांचे, प्रशासनाचे निर्देश पाळा
  • शक्य असल्यास 4 ते 4:30 या वेळेत रस्त्यावर गर्दी टाळा
  • शाळा, कॉलेज, कार्यालये आणि रहिवासी सोसायट्यांमध्येही हा सराव होऊ शकतो

 

READ MORE

“मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये होणार उद्घाटन”

“Mothers Day 2025: आईसाठी खास स्वस्त आणि सुंदर गिफ्ट्स”

WAVES 2025: मुंबईत भारताचं जागतिक मनोरंजन केंद्र बनण्याचं मोठं पाऊल

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स