महाराष्ट्र ITI प्रवेश 2025: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, अंतिम तारीख 29 मे

महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही प्रक्रिया दिनांक 15 मे 2025 पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून 29 मे 2025 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. या प्रक्रियेअंतर्गत संपूर्ण प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती करणे आणि शुल्क भरणे हे सर्व टप्पे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.

ITI मध्ये प्रवेश घ्यायचा आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र राज्यात सध्या  एकूण 993 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कार्यरत आहेत. त्यामध्ये 419 शासकीय574 खाजगी संस्था आहेत. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण 83 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे:

अभियांत्रिकी (Engineering) गटात

1 वर्ष कालावधीचे 18 अभ्यासक्रम

2 वर्ष कालावधीचे 14 अभ्यासक्रम

बिगर अभियांत्रिकी (Non-Engineering) गटात

1 वर्ष कालावधीचे 28 अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देणे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये थेट रोजगार मिळवता यावा यासाठी 70% प्रात्यक्षिक आणि 30% सैद्धांतिक प्रशिक्षण दिले जाते. या प्रात्यक्षिक शिक्षणामुळे विद्यार्थी वास्तविक कामाच्या वातावरणाशी सुसंगत होतात.

 

प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती – टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन

या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी करावी. नोंदणीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करावी:

टप्पा 1: उमेदवार नोंदणी (Candidate Registration)

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर admission.dvet.gov.in जाऊन स्वतःची नोंदणी करावी. नोंदणी करताना वैयक्तिक माहिती, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादीची नोंद आवश्यक आहे.

टप्पा 2: प्रवेश अर्ज सादर करणे (Application Submission)

नोंदणी पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरावा. या टप्प्यात शैक्षणिक माहिती, इच्छित आयटीआय संस्था आणि अभ्यासक्रम निवडणे, तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अपेक्षित आहे.

टप्पा 3: अर्जाची खात्री व पुष्टी (Application Confirmation)

भरलेला प्रवेश अर्ज, संबंधित सुविधा केंद्रामार्फत किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ‘कन्फर्म’ करणे गरजेचे आहे. नोंदणीची खात्री न झाल्यास उमेदवाराचे नाव पुढील प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही.

टप्पा 4: जागा वाटप (Allotment)

ज्या उमेदवारांचे अर्ज कन्फर्म झाले आहेत, त्यांना गुणवत्ता यादी आणि त्यांच्या पसंतीनुसार आयटीआय संस्था व अभ्यासक्रम वाटप केला जाईल. वाटपानंतर उमेदवारांनी लॉगिन करून दिलेला पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे.

टप्पा 5: संस्थेत प्रवेश (Admission to Institute)

ऑफर स्वीकारल्यानंतर संबंधित संस्थेत दिलेल्या वेळेत जाऊन मूळ कागदपत्रांसह अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

 

अर्ज शुल्क आणि सवलती

अर्ज भरण्याकरिता खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाईल:

  • सामान्य प्रवर्गासाठी – ₹150
  • अनुसूचित जाती/जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी – ₹100
  • इतर राज्यातील उमेदवारांसाठी – ₹300

सर्व शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. शुल्क भरण्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि सूचना

  • प्रवेश प्रक्रियेची सुरूवात: 15 मे 2025
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 29 मे 2025
  • ऑनलाईन अर्ज व नोंदणीसाठी संकेतस्थळ: https://admission.dvet.gov.in

 

ITI Admission Brochure 2025 PDF डाउनलोड करा

ITI प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ITI Admission Brochure 2025 हा पीडीएफ डाउनलोड करा. यामध्ये कोर्सेसची यादी, पात्रता अट, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा ब्रोशर सहज डाउनलोड करू शकता.  PDF मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा! 👇

WhatsApp Logo Horizontal transparent PNG - StickPNG

👉 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि PDF डाउनलोड करा

 

उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन

ही प्रवेश प्रक्रिया DVET (Directorate of Vocational Education and Training), महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे राबवली जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रवेश प्रक्रियेबाबत काही अडचण असल्यास, स्थानिक शासकीय आयटीआयमध्ये संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआय अभ्यासक्रम हे एक उत्कृष्ट पर्याय आहेत. कमी कालावधीत कौशल्य आधारित शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून आपले भविष्यातील व्यावसायिक मार्ग निश्चित करावा.

 

ट्रेंडिंग ITI कोर्सेस 2025: जास्त मागणी असलेले कोर्स आणि करिअर संधी

आईटीआई (Industrial Training Institute) मध्ये आजच्या काळात काही ट्रेंडिंग कोर्सेस खूपच मागणीचे आहेत, जे विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी देतात.

  • Electrician, Fitter, Welder, Diesel Mechanic, CNC Programming and Machining, Automobile Engineering Technician,
  • Refrigeration and Air Conditioning Technician, Draftsman Mechanical, Computer Hardware & Networking, Fashion
  • Designing and Clothing Construction, Tool and Die Maker, Interior Decoration & Designing,

हे कोर्सेस उद्योगाच्या वाढत्या गरजेनुसार खूप महत्त्वाचे ठरत आहेत. यामधील कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी उत्पादन, देखभाल, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल आणि आयटी सेक्टरमध्ये उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवू शकतात. त्यामुळे हे कोर्सेस आजच्या तरुणांसाठी करिअरचा चांगला पर्याय ठरत आहेत.

READ MORE 

  1. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांसाठी अकरावी प्रवेश ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु
  2. पुण्यात ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनचे उद्घाटन – भारतातील विमानचालन क्षेत्रासाठी नवी दिशा
  3. “दहावी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडाल? इथे आहे संपूर्ण मार्गदर्शक!”

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी पुण्यात 2025 मध्ये HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?