महाराष्ट्र राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी डिप्लोमा इंजीनियरिंग च्या प्रथम वर्षासाठी आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू केलेली आहे ही नोंदणी ही नोंदणी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज दोन्ही साठी लागू आहे
समुर्ण महाराष्ट्रात राज्यात प्रथम वर्षाच्या पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी आजपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रम हे उद्योग व नोकरीसाठी अत्यंत उपयुक्त व व्यावहारिक शिक्षणाचे माध्यम आहे.
यावर्षी विद्यार्थ्यांच्या सोयी साठी ही स्कूटनी ऑनलाईन स्कुटनी आणी फिजिकल स्कूटनी म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी असे दोन पर्याय ठेवलेले आहेत
महाराष्ट्रात डिप्लोमा इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे
डिप्लोमा प्रथम वर्ष ऍडमिशन साठी पात्रता
- उमेदवार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी दहावी म्हणजेच एसएससी परीक्षा किमान 35 टक्के गुणां सह उत्तीर्ण झालेला असावा
- महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळू शकतो
पहिली पद्धत – ई-स्क्रुटिनी म्हणजेच ऑनलाईन ऍडमिशन ची सविस्तर माहिती
- उमेदवार स्वतःचा अर्ज ऑनलाईन आणी आवश्यक कागदपत्रे ऍडमिशन वेबसाईटवर अपलोड करू शकतो
- यासाठी कोणत्याही संस्थेमध्ये किंवा फॅसिलेशन सेंटर ला भेट देण्याची गरज नाही
- अर्ज सबमिट केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन होईल अर्ज बरोबर असल्यास ऑनलाईन कन्फर्मेशन मिळेल आणी जर काही
- काही त्रुटी असल्यास अर्ज उमेदवाराकडे परत पाठवून दुरुस्ती नंतर पुन्हा सादर करावा लागेल.
दुसरी पद्धत – फिजिकल स्कूटनी मोड म्हणजे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष भेट
- विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करून बुक केलेल्या स्लॉट प्रमाणे जवळच्या फॅसिलेशन सेंटर ला भेट द्यावी लागेल
- फॅशन सेंटरमध्ये स्कॅनिंग अपलोड आणि सादरीकरणाची सुविधा मोफत आहे प्रत्यक्ष पडताळणी झाल्यावर कन्फर्मेशन देण्यात येईल
Diploma Engieering ऑनलाईन ऍडमिशन साठी महत्त्वाच्या तारखा
- नोंदणी व कागदपत्र अपलोडची सुरुवात: २० मे २०२५
- नोंदणी व अर्ज पुष्टीची अंतिम तारीख: १६ जून २०२५
- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्धी: १८ जून २०२५
- हरकती व दुरुस्त्या सादर करण्याची मुदत: १९ ते २१ जून २०२५
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी: २३ जून २०२५
16 जून नंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त संस्था स्तरावरील किंवा CAP नंतरच्या रिक्त जागांसाठी विचार केला जाईल.
ऍडमिशन साठीअर्ज शुल्क:
- सर्वसामान्य प्रवर्ग (Maharashtra/OMS/J&K/Ladakh): ₹४००/-
- महाराष्ट्रातील आरक्षित प्रवर्ग (SC/ST/VJ/NT/OBC/SBC/EWS): ₹३००/-
- शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरावे लागेल.
- एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- पडताळणी न झालेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- OBC/NT/EWS प्रवर्गातील उमेदवारांनी 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेला Non-Creamy Layer/ EWS प्रमाणपत्र अनिवार्यपणे सादर करावा.
- चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यास संबंधित दावे फेटाळले जातील.
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना सामान्य प्रवर्ग म्हणून विचारात घेण्यात येईल आणि ₹१०० अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
2025 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
- महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर भरावा, गुण DTE प्रणालीद्वारे स्वयंचलितरित्या घेतले जातील.
- CBSE/ICSE बोर्डाचे विद्यार्थी निकाल लागल्यावर आपली माहिती अद्ययावत करावी.
- २०२५ पूर्वी उत्तीर्ण झालेल्यांनी स्वतः गुणपत्रक व कागदपत्रे अपलोड करावी.
मोबाईल अॅप उपलब्ध:
- विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी “DTE Diploma Admission” हे मोबाईल अॅप Android व iOS वरून डाउनलोड करू शकतात.
CAP फेरीसंदर्भातील पुढील माहिती:
- २३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर CAP Round (Seat Allotment, Option Form, Reporting इ.) संदर्भातील तपशील अधिकृत संकेतस्थळावर https://poly25.dtemaharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध होईल.
कोणत्याही तांत्रिक अडचणी साठी संपर्क व मदत
विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, दस्तऐवज पडताळणी, शुल्क भरती, किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन आवश्यक असल्यास मदत घेता येईल
📞 संपर्क क्रमांक:
तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे हेल्पलाइन क्रमांक ०२२-६८५९७४१०, ०२२-६८५९७४४६५, ०२२-६८५९७४४७५, आणि ०२२-६८५९७४४९२ या वेळेत सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत उपलब्ध असतील. सोमवार ते शनिवार या कालावधीत विद्यार्थी थेट कॉल करून आवश्यक माहिती विचारू शकतात.
ई-मेल:
अर्जासंबंधी कोणताही प्रश्न असल्यास विद्यार्थी desk10@dtemaharashtra.gov.in या अधिकृत ईमेलवर आपली चौकशी पाठवू शकतात.
FC (Facilitation Centers) व विभागीय कार्यालये:
राज्यभरात विविध सहाय्यता केंद्रे (Facilitation Centers – FCs) स्थापन करण्यात आली आहेत जिथे विद्यार्थ्यांना फिजिकल स्क्रुटिनी मोड अंतर्गत अर्ज, कागदपत्र स्कॅनिंग आणि पडताळणीची मोफत सुविधा दिली जाते.
FC केंद्रांची संपूर्ण यादी व विभागीय कार्यालयांची माहिती, त्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि कार्यकाळ तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://poly25.dtemaharashtra.gov.in या ठिकाणी पाहता येईल.
READ MORE
- पुण्यात 11वी चे ऍडमिशन सुरू फॉर्म कसा भरायचा – संपूर्ण माहिती | कॉमर्स,आर्ट,सायन्स ११ वी च्या ऍडमीशन ची प्रोसेस- कशी करणार ?
- 12 वी नंतर इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया (MHT-CET) – संपूर्ण मार्गदर्शन
- 10वी आणि 12वी नंतर क्रीडा क्षेत्रात करिअर – अभ्यासक्रम, पात्रता आणि संस्था 2025