जुलै महिना 2025: दिनविशेष सण, व्रत, धार्मिक आणि सामाजिक दिवसांची यादी आणि काय करावे?
जुलै महिना हा वर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. विशेषतः महाराष्ट्रात या महिन्यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक कार्यक्रम होतात. या महिन्यात श्रावण सुरू होतो, ज्यामध्ये उपवास, व्रत, वारी आणि शिवभक्तीचे आयोजन केले जाते. चला तर मग जाणून घेऊया – जुलै महिन्यात कोणते खास दिवस येत आहेत आणि आपण त्या दिवशी काय करू शकतो.
1 जुलै – महाराष्ट्र कृषीदिन
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी कृषीदिन साजरा केला जातो.
काय करावे?
- स्थानिक शेतकऱ्यांना भेट द्या.
- सेंद्रिय शेती किंवा घरच्या अंगणात रोप लावा.
- कृषीप्रदर्शन किंवा शेतकरी मेळ्यांमध्ये सहभागी व्हा.
6 जुलै – आषाढी एकादशी / पंढरपूर वारी
विठ्ठल-रखुमाईची आषाढी वारी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध यात्रा आहे.
काय करावे?
- पंढरपूर वारीतील भाविकांसोबत सहभागी व्हा किंवा ऑनलाइन दर्शन घ्या.
- उपवास ठेवा आणि “हरी विठ्ठल” जप करा.
- गरीबांना अन्नदान करा.
पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी-देवशयनी एकादशी 2025 ला विठ्ठलनामाच्या गजरात वारीचा विसरमरणीय सोहळा
पंढरपूर | 6 जुलै 2025 – रविवारच्या शुभ दिवशी, आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीचा महापर्व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरकडे चालत आले आणि विठ्ठल-रखुमाईच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा असलेली ही आषाढी वारी – टाळ-मृदंगाच्या नादात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत, भक्तांची ओसंडून वाहणारी लाट पंढरपूरात आज एकवटली. भाविकांच्या मनात नितांत भक्ती, चेहऱ्यावर आनंद, आणि विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ – हे दृश्य पाहून पंढरपूर आज खऱ्या अर्थाने ‘भक्तीरसात न्हालं’ म्हणावं लागेल.
राज्यस्तरीय मुख्य पूजा यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी पूजा अर्पण करत राज्यातील सर्व जनतेसाठी मंगलकामना व्यक्त केली. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
हे सुद्धा वाचा- “पुण्यात स्वस्तात बाईक भाड्याने घ्या – प्रवास करा तुमच्या स्टाईलने!”
10 जुलै – गुरुपौर्णिमा – गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
काय करावे?
- आपल्या शाळेतील, कॉलेजमधील किंवा अध्यात्मिक गुरूंना भेट द्या.
- त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहा.
- वाचन, ध्यान, सत्संग यासाठी वेळ द्या.
11 जुलै – श्रावण महिन्याची सुरुवात – श्रावण हा शिवभक्तांचा महिना आहे. उपवास, अभिषेक आणि पूजा यामध्ये हा महिना व्यतीत केला जातो.
काय करावे?
- श्रावणी सोमवारला उपवास ठेवा.
- शिवमंदिरात जलाभिषेक करा.
- सात्विक आहार आणि सत्कर्म करा.
14 जुलै – गणेश संकष्टि चतुर्थी -गणेश पूजा
काय करावे?
- उपवास ठेवा.
- मनोभावाने आरती करा आणी आपल्या घरचे वातारण आनंदित बनवा

14 जुलै – कारक संक्रांती – सूर्याचा कर्क राशीत प्रवेश. शुभ कार्यांना प्रारंभ करण्याचा दिवस.
काय करावे?
- नवीन कामांची सुरुवात करा.
- संकल्प घ्या, जसे की निसर्ग संवर्धन, संयम, सेवाभाव.
21 जुलै – कामिका एकादशी – विष्णू उपासकांसाठी महत्त्वाचा उपवास.
काय करावे?
- उपवास ठेवा.
- विष्णू सहस्रनाम वाचा.
- वडीलधाऱ्या लोकांना सेवा द्या.
24 जुलै – हरीयाली अमावस्या – पर्यावरण स्नेही अमावस्या.
काय करावे?
- झाडे लावा.
- प्लास्टिक वापर टाळा.
- हरित दिन म्हणून साजरा करा.
29 जुलै – नागपंचमी – या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.
काय करावे?
- नागपूजन करा.
- स्त्रिया व्रत करतात, घरात साखरेचे नाग काढून पूजा करतात.
- सर्पसंवर्धनासाठी जनजागृती करा.
जुलै महिना दिनविशेष
- कृषीदिन – शेतकऱ्यांचा सन्मान आणि वृक्षारोपण करा
- आषाढी एकादशी – उपवास ठेवून विठ्ठलभक्तीत रममाण व्हा
- गुरुपौर्णिमा – गुरूंना वंदन करून सत्संगात सहभागी व्हा
- श्रावण सुरू – शिवपूजा आणि सोमवारचे उपवास पाळा
- कारक संक्रांती – सूर्याचा कर्क राशीत प्रवेश. शुभ कार्यांना प्रारंभ करण्याचा दिवस.
- एकादशी – विष्णूची पूजा आणि उपवास करा
- अमावस्या – वृक्षारोपण करून हरित दिन साजरा करा
- नागपंचमी – नागपूजन करून जनजागृती करा
हे सुद्धा वाचा- “महाराष्ट्रात सी-प्लेन सेवा कोणत्या ठिकाणी सुरू होणार?
सामान्य विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1.जुलै महिन्यात कोणते धार्मिक दिवस आहेत?
– आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी, नागपंचमी, हरीयाली अमावस्या.
2.श्रावण महिन्याची सुरुवात कधी आहे?
– 11 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतो.
3.नागपंचमीला काय करतात?
– नागदेवतेची पूजा केली जाते, विशेषतः साखरेचे नाग तयार करून स्त्रिया व्रत करतात.
4. देवशयनी एकादशीचे महत्त्व काय आहे?
– या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो.
जुलै महिना केवळ सणांचा नव्हे तर आत्मशुद्धी, पर्यावरणप्रेम, आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा महिना आहे. प्रत्येक दिवस आपल्या जीवनात काहीतरी चांगले बदल घडवू शकतो – फक्त त्याचा उपयोग करायची गरज आहे!
✍️ शेअर करा, आणि अशाच अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा