देशातील पहिली महापालिका शेअर बाजारात: पिंपरी चिंचवडने महापालिकेने उभारले २०० कोटी
पिंपरी चिंचवड, १५ जून २०२५ – भारतात पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेने शेअर बाजारात पदार्पण केले आहे आणि ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे जी कॅपिटल मार्केटमधून निधी उभारण्यास यशस्वी ठरली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे शेअर बाजारात यशस्वी लिस्टिंग
शेअर बाजारात उतरलेली पिंपरी चिंचवड महापालिका , महापालिकेने हरित कर्जरोखे (Green Bonds) जारी करत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये आपले लिस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केले.
या लिस्टिंगचा भव्य कार्यक्रम BSE च्या आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, आणि BSE चे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम राममूर्ती उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महापालिकांनी आत्मनिर्भर बनणे अत्यावश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने ही दिशा धरून देशात पहिलीच कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी महापालिका होण्याचा बहुमान मिळवला आहे. हे निश्चितच महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे.”
हरित कर्जरोखां मधून २०० कोटींचा निधी
महापालिकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्लॅटफॉर्मवर खाजगी गुंतवणूकदारांसाठी हरित कर्जरोखे इशू केले होते. यातून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून २० कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळाले आहे.
गुंतवणूकदारांकडून या हरित कर्जरोख्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कर्जरोखे शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर काहीच मिनिटांत लोकांनी जवळपास १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या कर्जरोख्यांची मुदत ५ वर्षांची असून, गुंतवणूकदारांना ७.८५ टक्के व्याज दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निधीचा वापर कुठे होणार?
या निधीतून पिंपरी चिंचवड शहरातील दोन मोठ्या हरित प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे:
- निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प
- गवळी माता ते इंद्रायणी नगर चौकादरम्यानचा टेल पुरस्कार विकास प्रकल्प
ही दोन्ही कामे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित असणार आहेत. यामुळे वाहतुकीची सोय, प्रदूषण नियंत्रण आणि शहराचा समतोल विकास साधता येणार आहे.
शेअर मार्केट मध्ये लिस्टिंग प्रक्रिया किचकट
शेअर बाजारात कर्जरोखे लिस्टिंग करण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असते. विविध कॉर्पोरेट अटी व शर्ती पूर्ण करणे, सविस्तर दस्तावेज सादर करणे, नियामक मंजुरी मिळवणे या गोष्टींचा समावेश असतो. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेली.

पिंपरी चिंचवड: एक आर्थिक सक्षम शहर
पिंपरी चिंचवड महापालिका ही महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या महापालिकांपैकी एक आहे. औद्योगिकदृष्ट्या मजबूत पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणावर असलेला एमआयडीसी परिसर आणि कर संकलनात आघाडीवर असल्यामुळे ही महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते.
आयकर वसुली, मालमत्ता कर आणि विविध परवाने यांमधून मोठा महसूल मिळवणाऱ्या महापालिकांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश होतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि लघुउद्योग येथे कार्यरत असल्यामुळे शहराचा विकास दरही अधिक आहे.
आता शेअर बाजारातून निधी उभारण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे ही महापालिका आधुनिक आर्थिक व्यवस्थेत प्रवेश करणारी देशातील पहिली महापालिका ठरली आहे. ही वाटचाल पिंपरी चिंचवडच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
निष्कर्ष – पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा ऐतिहासिक निर्णय इतर महापालिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा, आर्थिक स्वावलंबन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे महापालिकेची पुढील वाटचाल निश्चितच अधिक भक्कम होणार आहे.
FAQ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)
1. पिंपरी चिंचवड महापालिकेने शेअर बाजारात काय जारी केले आहे?
→ महापालिकेने ‘हरित कर्जरोखे’ (Green Bonds) जारी केले आहेत.
2. या कर्जरोखांमधून किती निधी उभारण्यात आला आहे?
→ सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
3. हा निधी कुठल्या प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे?
→ निगडीतील हरित सेतू आणि गवळी माता ते इंद्रायणी नगर चौकादरम्यानचा टेल पुरस्कार विकास प्रकल्पासाठी.
READ MORE
- विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात चौकशी साठी
- महाराष्ट्रात पुन्हा ऑरेंज अलर्ट: मुसळधार पाऊसाचे संकेत – जाणून घ्या संपूर्ण अपडेट
- FIFA World Cup 2026 ची तयारी कुठं पर्यंत आली आहे? जाणून घ्या संपूर्ण अपडेट
✅ ट्रेंडिंग आर्थिक बातम्या, शेअर बाजार अपडेट्स आणि महत्त्वाच्या शहरविकास घडामोडी थेट आपल्या मोबाईलवर पाहायच्या आहेत का?
🟢 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला आजच जॉइन करा!
📲 महत्त्वाच्या बातम्यांची त्वरित माहिती मिळवा आणि चर्चेत रहा.
👉 ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा: [🟩 WhatsApp ग्रुप लिंक]