कोविड काळात नाव मिळवलेले IAS नवल किशोर राम पुण्याचे नवीन आयुक्त झाले
पुणे, 1 जून 2025: आता पुण्याचे नवीन आयुक्त असणार नवल किशोर राम, यांनी शनिवार 31मे ला पुणे महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी सांगितले की माझा मुख्य उद्देश नागरिक केंद्रित प्रकल्पांची अंमलबजावणी आणि पुणेकरांची जीवनमान उंचावणे हा असेल त्याचबरोबर जे काही प्रलंबित प्रकल्प आहेत, त्यांचा अभ्यास करून त्या प्रकल्पांना नव्याने गती देण्यात येईल.
यापूर्वी राजेंद्र भोसले यांच्याकडे पुणे महानगरपालिकेचा पदभार होता ,भोसले यांनी मार्च 2024 मध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त पद स्वीकारले होते आणि त्यांच्या कार्यकाळात विविध नागरी सेवा सुधारणा व पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला होता
नवल किशोर राम हे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हा अधिकारी म्हणून कोविड काळात प्रभावी नेतृत्व केले होते त्यानंतर त्यांनी ही पंतप्रधान कार्यालयात उपसंचालक म्हणून ही काम पाहिले
राम यांनी शनिवारी पदभार स्वीकारला आणि हा दिवस सुट्टीचा असूनही महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले व त्यानंतर नगरसेवक व अधिकाऱ्यांची ओळख बैठक झाली.
महापालिकेची आगामी आव्हाने आणि जबाबदाऱ्या
- पुणे शहरासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास प्रकल्प, नागरी गरजा आणि नियोजनात्मक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
- पुणे मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण, नदीकाठ विकास योजना, संतुलित जलवाटप, तसेच नदी पुनर्जीवन प्रकल्प यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी ही महापालिकेपुढील प्रमुख आव्हान ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, योग्य नियोजन आणि कार्यक्षम अंमलबजावणी आवश्यक आहे.
- यावर्षी पावसाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाल्यामुळे पुरनियंत्रण, नाले सफाई, जलतरण व्यवस्था, आणि आपत्ती व्यवस्थापन या बाबींसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुण्यातील अनेक भाग जलमय होतात. त्यामुळे या वेळेस महापालिकेने आधीच दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.
- गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे अनेक प्रभागांतील स्थानिक विकासकामे रखडली आहेत. विविध प्रभागांतील रस्ते, गटारे, उद्याने, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी कामांमध्ये प्रगती झाली नाही, कारण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अभाव होता. त्यामुळे प्रशासकीय जबाबदारी एकट्याच आयुक्तांवर येऊन पडली आहे. आयुक्तांनी ही वाढलेली जबाबदारी अतिशय कौशल्याने पार पाडावी लागणार आहे.
महापालिकेच्या पुढील कारभारात नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर नव्या लोकप्रतिनिधींसमोर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
नवल किशोर राम हे 2008 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी असून, सध्या पुणे महानगरपालिकेचे (PMC) आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 31 मे 2025 रोजी राजेंद्र भोसले यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारलाआहे.
राम यांची शैक्षणिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी
राम यांचा जन्म बिहार राज्यात पूर्व चंपारण जिल्ह्यात मोतीहारी गावात झाला. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात नांदेड जिल्ह्यात केली व यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे त्यानंतर ते बीड आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते
पुणे जिल्हाधिकारी पद आणि covid-19 काळ
राम एप्रिल 2018 ते ऑगस्ट 2020 या काळात पुणे जिल्हा अधिकारी म्हणून काम पाहत होते , अशा कठीण काळात त्यांनी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या आयोजनासह 2019 ला आलेल्या महापुरात आपत्ती व्यवस्थापनात बरीच महत्त्वाची कामे पूर्ण केली . कोबीच्या काळात त्यांनी पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासचा ग्रामीण इलाका या ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबवल्या या काळात रुग्ण बरे होण्याचा दर वाढवण्याकडे आणि मृत्यू दर कमी करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा पुण्यात रुग्ण बरे होण्याचा दर जास्त होता
पुणे महानगरपालिका आयुक्तपद
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी नागरिक-केंद्रित प्रकल्पांना गती देणे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीत गती आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
राम मालमत्ता कर विभागाचा आढावा घेणार आहेत कारण कर महसूल कमी होणे, तांत्रिक अडचणी आणि नागरिकांच्या तक्रारी मधे सुद्धा वाढ झाली आहे . तसेच, प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी ते उपाय योजना करतील
नवल किशोर राम यांचा प्रशासकीय अनुभव, विशेषतः शहरी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्य, पुणे शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली, पुणे महानगरपालिका नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून कार्य करेल, अशी अपेक्षा आहे.
READ MORE
- मान्सून 2025:पावसाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम पुण्यात मे महिन्यातच मान्सूनची दमदार हजेरी
- 10वी नंतर प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये उत्तम करिअरची संधी: CIPET औरंगाबादमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू २०२५
- सुझलॉन एनर्जी शेअर नवीन व्यवस्थापन, कर्जमुक्ती योजना आणि FII,DII होल्डिंग वाढत आहे