Google च्या AI सर्चमुळे SEO संपणार? की नवीन युगाची सुरुवात होणार?

Google च्या नवीन सर्चमुळे SEO संपणार का? जाणून घ्या नेमकं काय घडतंय!

 Google AI Search मुळे SEO मरतंय? की अजून काही सोप होतंय ?

सध्या Google ने आपल्या सर्च इंजिनमध्ये AI (Artificial Intelligence) समाविष्ट केल्यामुळे थोडे बदल झालेले दिसून येत आहेत ,त्यामुळे अनेक वेबसाइट व डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट्स चिंता व्यक्त करत आहेत.
प्रश्न असा निर्माण होतोय की, “AI Search मुळे SEO मागे पडत चाललंय व थोड्याच दिवसात पूर्णपणे संपेल ? ” पण निल पटेल यांच्या एका अलीकडील व्हिडीओतून समजतं की, गूगलचं प्रमुख उद्दिष्ट पैसे कमावणं आहे, ना की SEO ला संपवणं! त्यामुळे ब्लॉगिंग करणाऱ्या साठी ही एक दिलासादायक बातमी आहे

Google किती पैसे कमावतो?

Neil Patel यांच्या माहितीनुसार, Google दरवर्षी $162 अब्ज (भारतीय रुपयात अंदाजे 13 लाख कोटी रुपये) केवळ Google सर्चमधील पेड अ‍ॅड्स (paid ads) मधून कमावतो.
त्याचप्रमाणे, AdSense नेटवर्क, जिथे वेबसाइट्सवर Google चे अ‍ॅड्स दिसतात, तिथूनही $32 अब्ज चा महसूल Google दरवर्षी मिळवतो.

या वेबसाईट्स ट्रॅफिक कुठून मिळवतात?

आपण समजू शकता की, जर या वेबसाइट्सनी ट्रॅफिक पेड अ‍ॅड्समधून खरेदी केला असता, तर त्यांना आर्थिक तोटा झाला असता. पण असं होत नाही — या साइट्स ऑर्गेनिक सर्च आणि सोशल मीडिया द्वारे मोफत ट्रॅफिक मिळवतात.

 मग AI Search मुळे काय चांगला बदल होतोय?

AI वापरून Google आता वापरकर्त्यांना अधिक अचूक व जलद उत्तरं देतो आहे उदाहरणार्थ,
“5 kilometar प्रवासासाठी उत्तम सायकल कोणती?”
अशा सर्चसाठी Google AI वापरून उत्तम सायकलींची माहिती देतो आणि त्याचबरोबर

  • वरच्या भागात ऑर्गेनिक (SEO आधारित) वेबसाईट्सची यादी देतो
  • त्यासोबतच स्पॉन्सर्ड अ‍ॅड्स सुद्धा दाखवतो

अशा प्रकारे, Google आपल्या यूजर्स ना चांगला अनुभव देतो आणि त्याचवेळी आपल्या अ‍ॅड रेव्हेन्यूचे मॉडेलही चालू ठेवतो.

निष्कर्ष: SEO अजूनही जिवंत आहे

AI सर्चमुळे SEO पूर्णपणे संपणार नाही. उलट, चांगली माहिती व उपयोगी कंटेंट देणाऱ्या वेबसाईट्सना अजूनही ट्रॅफिक मिळणार आहे. Google AI केवळ सर्च अनुभव सुधारत आहे, त्यामुळे ज्यांनी SEO नीट शिकून योग्य रीतीने वेबसाईट ऑप्टिमाइझ केली आहे, त्यांच्यासाठी संधी अजूनही आहे.


 मूळ स्रोत: Neil Patel यांचा व्हिडीओ


google-seo-2025
google-seo-2025

 

AI सर्च आणि SEO – नेहमी विचारले जाणारे प्रश्न(FAQ)

Q1. Google च्या AI सर्चमुळे SEO बंद होणार आहे का?
नाही, SEO अजूनही चालणार आहे. Google फक्त यूजर्सचा अनुभव अजून चांगला करत आहे.

Q2. Google ची कमाई कशी होते?
जास्तकरून पेड अ‍ॅड्स (Search Ads) व AdSense नेटवर्कमधून. 2025 मध्ये हे दोन पर्याय मिळून Google ला $194 अब्ज पेक्षा जास्त उत्पन्न मिळालं.

Q3. वेबसाईट्स आपला ट्रॅफिक कुठून आणतात?
बहुतांश ट्रॅफिक ऑर्गेनिक सर्च (Organic Search) व सोशल मीडिया द्वारे येतो. पेड अ‍ॅड्सचा वापर केल्यास त्यांना खर्च जास्त होतो.

Q4. AI सर्चचा फायदा कसा आहे?
वापरकर्त्यांना फास्ट , योग्य व त्यांच्या कामाची उत्तरं मिळतात आणि SEO व अ‍ॅड्स दोन्हीचं संतुलन राखलं जातं.

👉 तुम्ही जर SEO किंवा वेबसाईट चालवणारे असाल, तर घाबरू नका — योग्य स्ट्रॅटेजी वापरून अजूनही तुम्हाला ऑर्गेनिक ट्रॅफिक मिळवता येईल.


हे सुध्दा वाचा – सायबर क्राईम “Caller Tune” चा कंटाळा आलाय ? जाणून घ्या कशी होऊ शकते


 

आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये आजच सामील व्हा आणि मिळवा:

  • ताज्या अपडेट्स
  • स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन
  • महत्वाचे link आणि सूचना

 आताच क्लिक करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मुडीत दाणीच्या लग्नात अंबानी कुटुंबाची उपस्थिती मीडियावर चर्चेचा विषय मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी