महाराष्ट्रात 11वी चे ऍडमिशन सुरू फॉर्म कसा भरायचा – संपूर्ण माहिती | कॉमर्स,आर्ट,सायन्स ११ वी च्या ऍडमीशन ची प्रोसेस- कशी करणार ?

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्याची सुरुवात पूर्वीच्या 21 मेच्या ऐवजी आता 26 मेपासून होणार आहे. या नवीन वेळापत्रकानुसार, विद्यार्थी 26 मेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतील.

अकरावी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रात पुढे ढकलली, अर्ज भरणे 26 मेपासून सुरू होणार

शिक्षण मंडळाने तांत्रिक अडचणींवर त्वरित दखल घेऊन त्या दूर केल्या असून, प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत व्हाट्सअप चॅनलही सुरू करण्यात आला आहे.        ( https://whatsapp.com/channel/0029vBZ76DBaEtT0dyi0C ) या चॅनलद्वारे प्रवेश संबंधित सर्व माहिती व सूचना विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यात येतील.

प्रवेश प्रक्रियेचे पुढील टप्पे अशी आहेत:

  • 26 मे ते 3 जूनपर्यंत विद्यार्थी नोंदणी व महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निश्चित करू शकतील.
  • 5 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • 6 व 7 जून या दोन दिवसांत यादीविषयी हरकत असल्यास ती नोंदवता येईल.
  • अंतिम गुणवत्ता यादी 8 जूनला जाहीर होईल आणि निवड झालेल्या महाविद्यालयांची माहिती विद्यार्थ्यांना कळवली जाईल.
  • 11 जून ते 18 जून दरम्यान प्रवेश घेणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, तसेच प्रवेश नाकारण्याची किंवा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सुलभता मिळेल अशी अपेक्षा आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने पार पडते ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया सोपी पारदर्शक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ होते विद्यार्थी आपले आवडीचे कॉलेज निवडू शकतात आणि आवश्यक कागदपत्रे देखील ऑनलाईन अपलोड करू शकतात

यावर्षी महाराष्ट्रात अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी जवळजवळ 20 lakh  पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत, आणि महाराष्ट्रात एकूण 9281 जुनिअर कॉलेजेस जुनियर कॉलेज आहेत.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ची संपूर्ण माहिती

 

अकरावी कला , वाणिज्य , विज्ञान ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खाली दिलेली माहिती, व्यवस्तीत वाचून तुम्ही आपला ऍडमिशन फॉर्म भरू शकता .

  स्टेप वन-  विद्यार्थी नोंदणी ( Student Resistration) 

ऑनलाईन ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांना खालील माहिती वेबसाइट वर अचूक भरणे गरजेचे आहे . त्यामुळे घाई न करता शांतपणे माहिती पूर्ण करावी

  • स्वतःचे पूर्ण नाव
  •  जन्मतारीख – जी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असेल
  •  विध्यार्त्याचा संपर्क क्रमांक व ईमेल आयडी – ( ईमेल आयडी नसेल तर तो बनवणे गरजेचे आहे )
  •  पालकांची माहिती
  •  शाळेचा तपशील

 ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्रे

डॉक्युमेंट्स स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करावे लागतात,  त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस सुरू करण्या आधी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये एका फोल्डर मध्ये ठेवावी.

  • दहावीची मार्कशीट – ( शाळेतून मिळालेली – ऑनलाईन प्रिंट काढलेली नाही )
  •  शाळा सोडल्याचा दाखला-  ज्या शाळेत तुम्ही दहावीला शिकत होता
  •  जात प्रमाणपत्र –  जर विध्यार्थी OBC , ST / SC किंवा NT कास्ट मध्ये मोडत असेल तर
  •  नॅशनॅलिटी सर्टिफिकेट –
  •  आधार कार्ड किंवा लाईट बिल –  ज्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता असणे गरजेचे आहे
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •   कोऱ्या पेपर वरती स्वतःची स्वाक्षरी-  अपलोड करण्यासाठी
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र – (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र – (लागू असल्यास)
  • ईडब्ल्यूएस (EWS – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रमाणपत्र   – (लागू असल्यास)

   वरील माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते

 

सेकंड स्टेप  –  कॉलेज सिलेक्शन आणि प्रवेश अर्ज कसा भरावा ?

 

  कॉलेज पसंती फॉर्म ( Option Form Filling) 

 डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेतील दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉलेज पसंती फॉर्म भरणे आहे यामध्ये विद्यार्थी आपल्याला हवे असलेले कॉलेज आणि शाखा निवडू शकतो. 

  कॉलेज पसंती फॉर्म भरण्याची प्रक्रिया–  या वेबसाईटवर  विद्यार्थी लॉगिन करावे आणि ऑप्शन फ्रॉम पार्ट टू वर्क क्लिक करावे

 तुम्हाला हवे असलेले कॉलेज व शाखा निवडावी

  •  तुम्ही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेज निवडू शकता,  निवडलेले कॉलेज योग्य प्राधान्य क्रमाने निवडले पाहिजेत म्हणजेच पहिल्यांदा सर्वाधिक आवडीचे कॉलेज व त्यानंतर बाकी इतर कॉलेज
  • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित  री चेक करा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा , सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवणे गरजेचे आहे

 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  •  कॉलेज पसंती फॉर्म हा तुम्हाला एकदाच भरता येईल त्यामुळे व्यवस्थित घाई न करता आणि पालकांचा सल्ला घेऊन हा फॉर्म भरला पाहिजे
  • जर तुमचा पहिल्या फेरीत म्हणजेच फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नंबर आला तर संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन रिपोर्टिंग करून प्रवेशाची खात्री करून घ्यावी

CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांसाठी कागदपत्र पडताळणी सूचना

CBSE व ICSE मंडळाच्या विद्यार्थ्यांना DigiLocker वरून गुणपत्रिका मिळवण्यात अडचणी येत असल्यामुळे, संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्वतः जाऊन मूळ कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागेल.
शिक्षण विभाग प्रत्येक विभागातील एकूण अर्जदारांपैकी ५% विद्यार्थ्यांची यादृच्छिक निवड करून त्यांच्या कागदपत्रांची खातरजमा करणार आहे, जेणेकरून अर्जांची प्रामाणिकता सुनिश्चित करता येईल.

एफ वाय जे सी प्रवेश प्रक्रिया 2025 महत्त्वाच्या तारखा

 ऑनलाईन नोंदणी 21 मे 2025 पासून सुरू होणार आहे आणि नोंदणीची शेवटची तारीख 28 मे 2025 आहे पहिली गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट ही जून 2025 मध्ये जाहीर होईल ,तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटवर कळवू. 

सहाय्य आणि मार्गदर्शन

ऍडमिशन करताना किंवा प्रवेश प्रक्रिया पार पडताना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही अडचणी आल्यास किंवा सहायता हवी असल्यास, अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे किंवा जिल्हा स्तरीय हेल्पलाईन नंबर किंवा मार्गदर्शक शाळांशी संपर्क साधावा.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही अडचणी आल्यास, खालील संपर्क माध्यमांचा वापर करून मदत घेता येईल:

विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे निश्चित मुदतीत ऑनलाइन अपलोड करावीत, जेणेकरून त्यांचा प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.

 

READ MORE 

 

 

 

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स