१२वी नंतरचा निर्णय ठरवतो करिअरचा मार्ग – इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन येथे!
12 वी नंतर ज्या पालकांचं आणी मुलाचं इंजिनिरिंग ला जायचा ठरलं आहे , त्यांच्या साठी “12 वी नंतर इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया” या विषयावर सखोल माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे, १२ वी उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय ? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतो, कारण ही वेळ विध्यर्थ्यांच्या करिअर च्या द्रुष्टीने खूप महत्वाची आहे. इंजिनीअरिंग ही आजही एक प्रतिष्ठित व करिअर-घडवणारी शाखा आहे आणी कायम असणार आहे .
सध्या महाराष्ट्रात इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी MHT-CET ही एंट्रन्स परीक्षा सर्वात महत्त्वाची आहे. योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि वेळेत केलेली कृती यामुळे तुम्हाला उत्तम कॉलेज आणि हवी ती ब्रँच मिळू शकते.
या लेखात आपण 12 वी विज्ञान नंतरच्या इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेवर (Step-by-Step) सविस्तर माहिती बघणार आहोत, ज्यामुळे कोणताही गोंधळ न होता तुम्ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्तीत पार पाडू शकता .
12 वी नंतर इंजिनीअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया (MHT-CET व्दारे) – संपूर्ण मार्गदर्शन
तुम्ही १२वी (PCM/PCMB) उत्तीर्ण झाल्यावर इंजिनीअरिंग क्षेत्रात जायचा विचार करत आहात का? मग ही माहिती तुम्हासाठीच आहे!
या लेखात आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया – MHT-CET पासून कॉलेज allotment पर्यंत – अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
स्टेप 1: 12वी उत्तीर्ण (PCM / PCMB विषयांसह)
- विध्यार्थ्याला १२वी (HSC) मध्ये भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Maths) हे विषय असणे आवश्यक आहे, बायोलॉजि हा मेडिकल ला ऍडमिशन घेण्या साठी महत्वाचा विषय आहे .
- विध्यर्थ्याला १२वी साईन्स मध्ये किमान गुण : ओपन वर्गासाठी 45% , आरक्षित वर्गासाठी 40% असणे गरजेचे आहे .
स्टेप 2: MHT-CET परीक्षा अर्ज (Application for CET)
- महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी MHT-CET अर्ज भरावा लागतो.
- परीक्षा अर्ज करण्यासाठी वेबसाइट: https://cetcell.mahacet.org
- अर्जात आपले वैयक्तिक माहिती, शिक्षणाची माहिती व विषयांची निवड करावी लागते.
- CET ची परीक्षा साधारणतः मे महिन्यात होते.
स्टेप 3: MHT-CET परीक्षा (Exam Pattern)
- Subject Combination: PCM (Physics, Chemistry, Mathematics) – इंजिनीअरिंगसाठी पेपर पॅटर्न:
-
- Physics – 50 मार्क
- Chemistry – 50 मार्क
- Maths – 100 मार्क
एकूण: 200 मार्क ,परीक्षा CBT (Computer Based Test) स्वरूपात होते.
स्टेप 4: CET निकाल (CET Result)
- CET परीक्षेनंतर काही आठवड्यातच निकाल लागतो.
- निकालामध्ये मिळालेले गुण व Percentile दिले जातात.
- याच गुणांच्या आधारे पुढील प्रवेश प्रक्रियेत मेरिट ठरते.
स्टेप 5: CAP Process साठी ऑनलाईन नोंदणी
(Centralized Admission Process)
काय करावे लागते?
1.CAP Round साठी रजिस्ट्रेशन – CET Cell च्या वेबसाइटवर जाऊन “B.E./B.Tech Admission” विभागात फॉर्म भरणे.
2.डॉक्युमेंट अपलोड – खालील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत:
-
- 10वी व 12वी मार्कशीट
- CET स्कोअरकार्ड
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- जात प्रमाणपत्र (जर लागु असेल तर)
- इनकम सर्टिफिकेट (TFWS साठी)
- फोटो व सही
स्टेप 6: Document Verification
- नोंदणी केल्यानंतर डॉक्युमेंट्स तपासणी होते.
- Verification हे Online OR FC Center (Facilitation Center) वर जाऊन करता येते.
स्टेप 7: कॉलेज व ब्रांच प्राधान्य (Option Form Filling)
यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कॉलेज व ब्रांच निवडता.
-
- COEP Pune – Computer Engineering
- VJTI Mumbai – IT
- PICT Pune – E&TC
… आणि असे टॉप 25 पर्यंत देऊ शकता.
हीच निवड पुढील Round मध्ये allotment साठी महत्त्वाची ठरते.
स्टेप 8: CAP Round – कॉलेज Allotment
- CAP Round 1, 2, 3 असे तीन फेऱ्या घेतल्या जातात.
- तुमच्या CET गुणांनुसार व प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉट होते.
- कॉलेज मिळाल्यानंतर खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- Freeze: कॉलेज आवडले, प्रवेश निश्चित करा.
- Float: कॉलेज ठेवा पण वरच्या प्राधान्याच्या प्रतीक्षेत रहा.
- Slide: कॉलेज ठेवा पण त्याच कॉलेजमधील दुसऱ्या ब्रांचच्या प्रतीक्षेत रहा.
स्टेप 9: प्रवेश निश्चित करणे व फी भरपाई
- अलॉट झालेले कॉलेज स्वीकारल्यावर तिथे जाऊन ऑनलाईन/ऑफलाईन फी भरावी लागते.
- त्यानंतर तुमचा प्रवेश Confirm होतो.
- आवश्यक कागदपत्रांची हार्डकॉपी कॉलेजमध्ये जमा करावी लागते.
स्टेप 10: कॉलेजमध्ये प्रवेश पूर्ण व वर्ग सुरू
- एकदा प्रवेश कन्फर्म झाला की कॉलेजकडून वर्ग सुरू होण्याची नोटीस दिली जाते.
- सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केला जातो.
MHT-CET परीक्षेसाठी महत्वाच्या टिप
- CET Score जितका जास्त, तितका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाचा चान्स जास्त.
- MHT-CET हेच मुख्य Gateway आहे महाराष्ट्रातील इंजिनीअरिंगसाठी.
- COEP, VJTI, PICT, वॉलचंद हे टॉप कॉलेजेस आहेत.
- कॉलेज निवडताना Cutoff, लोकेशन, Infrastructure आणि प्लेसमेंट बघा.
आवश्यक कागदपत्रांची यादी (Documents List)
- १०वी व १२वी मार्कशीट
- CET स्कोअरकार्ड
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- जात प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- नॅशनलिटी प्रमाणपत्र
- इनकम सर्टिफिकेट (TFWS साठी)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट
- GAP Certificate (जर १२वी नंतर गॅप असेल तर)
महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनीअरिंग कॉलेजेस कोणते आहेत ?
खाली दिलेली माहिती बुलेट पॉइंट्समध्ये रूपांतरित केली आहे:
- COEP Tech – पुणे
- VJTI – मुंबई
- PICT – पुणे
- MIT-WPU – पुणे
- SPIT – मुंबई
- VIT (Vishwakarma Institute of Technology) – पुणे
- Walchand College of Engineering – सांगली
- Government College of Engineering – औरंगाबाद
- Government College of Engineering – अमरावती
- DY Patil College of Engineering – पुणे / नवी मुंबई
निष्कर्ष (Conclusion)
12वी नंतर इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक पार पाडल्यास उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो. MHT-CET हा प्रवेशासाठी मुख्य मार्ग आहे, त्यामुळे त्याची तयारी मन लावून करा.
READ MORE
- 12वी मध्ये कमी गुण मिळालेत? तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय
- बारावीनंतर करिअरसाठी काही वेगळ्या वाटा 2025
- महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांसाठी अकरावी प्रवेश ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु