दिवाळी 2025: सणाचा अर्थ, परंपरा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या | Diwali 2025 Marathi Guide

Diwali 2025 Marathi Guide

दरवर्षी प्रमाणे यावेळेस सुद्धा दिवाळी चा सण हा पाच दिवसा असणार आहे , या सगळ्यात मोठ्या सणाचा अर्थ, परंपरा व शुभ मुहूर्त यावर आधारित लेख आहे.

आली दिवाळी तयार व्हा रोषणाई, आतेषबाजी, फटाके, रांगोळी, दिवे, फराळ करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी

दिवाळी सणाचा पाचदिवसीय प्रवास

यंदा दिवाळीचे मुख्य दिवस खालीलप्रमाणे आहेत:

  1. 18 ऑक्टोबर – धनत्रयोदशी (Dhanteras)
  2. 20 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी (Choti Diwali)
  3. 21 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजन (Lakshmi Puja / मुख्य दिवाळी)
  4. 22 ऑक्टोबर –दीपावली पाडवा , बलिप्रतिपदा
  5. 23 ऑक्टोबर – भाऊबीज (Bhau Bej / Bhai Doou)

या वर्षी सुद्धा आपण अशी पाच दिवसांमध्ये दिवाळी साजरी करणार आहोत , प्रत्येक दिवसाची वेगळी परंपरा , कथा आहे ती जाणून घेणे आपल्या साठी महत्वाचे आहे .

धनत्रयोदशीच्या दिवशी आनंदित स्मित


१) धनत्रयोदशी – संपत्ती, आरोग्य व नवीन सुरुवात

💰 धनत्रयोदशी – संपत्ती, आरोग्य आणि नवीन सुरुवात

18 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि ‘त्रयोदशी’ म्हणजे कृष्णपक्षातील तेरावा दिवस. या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकलशासह समुद्रमंथनातून प्रकट झाल्याने हा दिवस आयुर्वेद दिन म्हणूनही ओळखला जातो. आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरी पूजन केले जाते. तसेच कुबेर देव यांच्या कृपेने संपत्ती प्राप्त होते, म्हणून या दिवशी सोनं, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. घर स्वच्छ करून दिवे, रंगोली व सजावट करून शुभ ऊर्जा आणि लक्ष्मीचे आगमन घरात होते.

टीप: आर्थिक योजनांसाठी हे कालावधीही योग्य आहे — नवीन खरेदी, गुंतवणूक किंवा देणं–घेणं यावेळी केली तर शुभ मानली जाते.


२) नरक चतुर्दशी – अंधकारावर प्रकाशाचा विजय

  • 20 ऑक्टोबर हा दिवाळी चा दुसरा दिवस असतो , या दिवशी नरक चतुर्दशी असते . हा दिवस अंधकार, अज्ञान व पीडा यांच्यावर विजय मिळाल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
  • या दिवसाची पौराणिक कथा अशी आहे कि कृष्ण व सत्यभामा यांनी नरकासुर या राक्षसावर विजय मिळविला, त्यामुळे हा दिवस एक नकारात्मकते वर मात करण्याचा आणी व प्रकाशाचा दिवस बनला.
  • दिवाळी च्या या दिवशी लोक सकाळी लवकर उठून उटणं आणी तेल लावून स्नान करतात, संपूर्ण घर स्वच्छ करतात, घरात व अंगणात दिवे लावतात तसेच सुरेख रंगांची रांगोळी काढतात . या दिवसाला “छोटी दिवाळी” असेही बोलले जाते .

३) लक्ष्मी पूजा – मोठी दिवाळी

21 ऑक्टोबर हा दिवाळी चा सर्वात महतवाचा आणी मानाचा दिवस या दिवशी लक्ष्मी पूजन असते . सर्वांच्या घरी मोठ्या उत्साहाने दिवे, लाईट च्या माळा ,आकाश कंदील , दिवे लावून घर व अंगनातं आकर्षक सजावट व पूजा केली जाते.

लक्ष्मीदेवी च्या ,प्रतिमे ची या दिवशी विशेष पूजा केली जाते व स्तुती केली जाते.

दिवाळी चा हा दिवस घरातील अंधकार दूर करण्याचा, प्रकाश व आनंद वाढवण्याचा आहे.

या दिवशी मुख्य मुहूर्त सायंकाळी दिवा लागणी च्या वेळी असतो


४) गोवर्धन पूजा – निसर्गाचे, मातृभूमीचे आभार

  • 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा साजारी केली जाते. हा दिवस नवरा बायकोसाठी अत्यंत खास मानला जातो. या दिवसाला बलिप्रतिपदा, गोवधर्न पूजा असे देखील म्हटले जाते संपूर्ण महाराष्ट्रात या दिवशी गृहप्रवेश, नवीन वर्षउद्घाटन अशा कार्यक्रमही ठेवले जातात.
  • दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा या दिवशी रांगोळी ने बळी ची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडा ,पीडा टळो आणि बळी चे राज्य येवो अशी देवा चरणी पार्थना केली जाते.

५) भाऊबीज – भाइ-बहिणीचा स्नेह व प्रेम

23 ऑक्टोबर हा दिवाळी च्या महत्वाच्या पाच दिवसातला शेवटचा दिवस असतो , या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. प्रथे प्रमाणे या दिवशी बहिणा आपल्या भावाला ओवाळते करते व त्याच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना करते. भाउ बहिणी ला या निमित्ताने भेटवस्तू देतो .

हा दिवस मराठीत किंवा महाराष्ट्रात “भाऊबीज” या नावाने लोकप्रिय आहे.
सणाचा समारोप हा दिवशी होतो – प्रकाश, प्रेम, आनंद व सुख यांचा संदेश या दिवशी साकार होतो.


कशी केली जाते या सणाची तयारी
  • सुरवात घर स्वच्छता करण्यापासून होते व त्यानंतर घराची सजावट कोणत्याही सणाच्या अगोदर घर स्वच्छ करणे व दिवे, रांगोळी ने सजवणे शुभ मानले जाते.
  • आर्थिक व्यवहाराचा विचार: धनत्रयोदशीच्या दिवशी एखादी छोटी खरेदी (उदा. सोनं-चांदी किंवा भांडी) शुभ मानली जाते. सुरक्षा व आरोग्य: आतंरिक व बाह्य वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी दिवे लावणे, अभ्यंग स्नान, शुभेच्छा ची देवाणघेवाण यांचा समावेश होतो .

निष्कर्ष

या पाच दिवसांचा प्रवास केवळ प्रकाश व फटाक्यांचा नाही; त्यामध्ये “संपत्ती”, “स्वच्छता”, “प्रकाश”, “निसर्ग” आणि “बंध” या मूल्यांचा समावेश आहे.

प्रत्येक दिवसाला आपली वेगळी कहाणी, आपली वेगळी परंपरा असून ती आपल्या जीवनात आनंद, शांती आणि एकात्मता वाढवते.
या दिवाळीत आपल्या कुटुंबासह, मित्रमंडळींसह एकमेकांना शुभेच्छा देऊन, श्रद्धेने व सुखाने हे सण आनंदात साजरे करूयात.

शुभ दिवाळी! दीपावलीच्या या पाच दिवसीय उत्सवात सर्वांना भरभराट, आरोग्य, समृद्धी व सौहार्द मिळो.

Leave a Comment