10वी आणि 12वी नंतर क्रीडा क्षेत्रात करिअर – अभ्यासक्रम, पात्रता आणि संस्था 2025

इयत्ता १०वी आणि १२वी नंतर क्रीडा क्षेत्रातील करिअर — संपूर्ण मार्गदर्शक

10वी किंवा 12वी नंतर क्रीडा क्षेत्रात करिअर

( Career in sports after 10th or 12th) 

क्रीडा (Sports) ही आता केवळ खेळाडू म्हणून पुढे जाण्याचीच संधी देणारी नाही, तर कोचिंग, व्यवस्थापन, विज्ञान, पोषणतज्ज्ञ, स्पोर्ट्स मेडिसिन, फिजिओथेरपी आणि इतर अनेक शाखांमध्ये करिअर घडवणारी एक विशाल आणि वेगाने वाढणारी इंडस्ट्री बनली आहे. या लेखात आपण १०वी व १२वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांविषयी, त्यासाठी लागणारी पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि महत्त्वाच्या संस्थांविषयी माहिती घेणार आहोत.

कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 10वी किंवा 12वी नंतर क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी खालील प्रमाणपत्र व डिप्लोमा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात:

10वी नंतर क्रीडा क्षेत्रहातील करिअर संधी

 

1. Diploma in Sports Medicine

  • कालावधी: 6 महिने
  • पात्रता: 12वी उत्तीर्ण
  • कोर्स वैशिष्ट्ये: हा कोर्स क्रीडा वैद्यकशास्त्रातील मूलभूत ज्ञान प्रदान करतो, ज्यामध्ये क्रीडापटूंच्या दुखापतींचे व्यवस्थापन, पुनर्वसन, आणि पोषण यांचा समावेश आहे.

 2. Diploma in Sports Coaching

  • कालावधी: 1 वर्ष
  • पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि क्रीडा क्षेत्रातील ठराविक कामगिरी (उदा. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग)
  • कोर्स वैशिष्ट्ये: या कोर्समध्ये विविध क्रीडा प्रकारांतील प्रशिक्षण तंत्र, क्रीडाशास्त्र, आणि प्रशिक्षक म्हणून आवश्यक कौशल्ये शिकवली जातात.

 3. Diploma in Sports Management

  • कालावधी: 6 महिने ते 1 वर्ष
  • पात्रता: 10वी किंवा 12वी उत्तीर्ण (काही संस्थांमध्ये 10वी नंतर प्रवेश उपलब्ध)
  • कोर्स वैशिष्ट्ये: हा कोर्स क्रीडा संघटन, इव्हेंट मॅनेजमेंट, प्रायोजकत्व, आणि क्रीडा विपणन यासारख्या विषयांवर केंद्रित आहे.

 4. Diploma in Sports Science & Nutrition

  • कालावधी: 1 वर्ष
  • पात्रता: 12वी उत्तीर्ण
  • कोर्स वैशिष्ट्ये: या कोर्समध्ये क्रीडापटूंच्या पोषण, व्यायामशास्त्र, आणि फिटनेस यांचे सखोल ज्ञान दिले जाते, जे क्रीडापटूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यास मदत करते.

कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी वरील कोर्सेसचा विचार करावा. या कोर्सेसद्वारे व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून, क्रीडा क्षेत्रात विविध संधी मिळवता येऊ शकतात.

 

 विद्यार्थ्यांसाठी १२वी नंतर क्रीडा क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम

कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी १२वी नंतर क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी खालील पदवी अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात

1. B.Sc in Physical Education, Health Education and Sports Sciences

  • कालावधी: ३ वर्षे
  • पात्रता: १२वी उत्तीर्ण, काही संस्थांमध्ये ५०% गुण आवश्यक
  • प्रवेश प्रक्रिया: काही विद्यापीठांमध्ये शारीरिक कार्यक्षमतेची चाचणी (Physical Efficiency Test) आवश्यक असते

2. Bachelor of Physical Education (B.P.Ed)

  • कालावधी: १-२ वर्षे (पूर्वीची पदवी आवश्यक)
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर, किमान ५०% गुण आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग
  • प्रवेश प्रक्रिया: शारीरिक कार्यक्षमतेची चाचणी आणि मुलाखत

3. B.A in Sports Management

  • कालावधी: ३ वर्षे
  • पात्रता: १२वी उत्तीर्ण, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत
  • प्रमुख संस्था: Tata Institute of Social Sciences (TISS)

4. B.Sc (Hons) in Sports Science

  • कालावधी: ३-४ वर्षे
  • पात्रता: १२वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: काही संस्थांमध्ये शारीरिक कार्यक्षमतेची चाचणी आवश्यक

5. B.Sc in Sports and Recreation Management

  • कालावधी: ३ वर्षे
  • पात्रता: १२वी उत्तीर्ण, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत

 6. Bachelor of Sports Management (BSM)

  • कालावधी: ३ वर्षे
  • पात्रता: १२वी उत्तीर्ण, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत

7. BBA in Sports Management

  • कालावधी: ३ वर्षे
  • पात्रता: १२वी उत्तीर्ण, किमान ४५-५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत

कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी वरील कोर्सेसचा विचार करावा. या कोर्सेसद्वारे व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून, क्रीडा क्षेत्रात विविध संधी मिळवता येऊ शकतात.

कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम

( Postgraduate courses in sports for arts students)

कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पदवी झाल्यानंतर मास्टर डिग्री घेण्यासाठीचे क्रीडा क्षेत्रात करिअर पर्याय

1. Master of Physical Education (M.P.Ed)

  • कालावधी: २ वर्षे
  • पात्रता: B.P.Ed किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमतेची चाचणी आवश्यक
  • प्रमुख संस्था: मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ

 2. M.Sc in Sports Coaching

  • कालावधी: २ वर्षे
  • पात्रता: क्रीडा क्षेत्रातील पदवी आणि संबंधित डिप्लोमा
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 3. Post Graduate Diploma in Sports Medicine

  • कालावधी: २ वर्षे
  • पात्रता: MBBS पदवी
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 4. Post Graduate Diploma in Sports Management

  • कालावधी: १ वर्ष
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 5. Post Graduate Diploma in Sports Business

  • कालावधी: ६ महिने ते १ वर्ष
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 6. MBA in Sports Management

  • कालावधी: २ वर्षे
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, किमान ५०% गुण
  • प्रवेश प्रक्रिया: CAT, MAT, XAT किंवा संस्थात्मक प्रवेश परीक्षा

 7. Master of Sports Management (MSM)

  • कालावधी: १ ते २ वर्षे
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 8. M.Sc in Sports Science

  • कालावधी: २ वर्षे
  • पात्रता: B.Sc किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी
  • प्रवेश प्रक्रिया: प्रवेश परीक्षा आणि मुलाखत

 

 प्रवेश प्रक्रिया (Entrance Exams) – कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी (क्रीडा शिक्षण क्षेत्र)

1. SMAT (Sports Management Admission Test):
ही परीक्षा IISM मुंबईतर्फे घेतली जाते. क्रीडा व्यवस्थापनातील डिप्लोमा, पदवी (BSM), आणि मास्टर कोर्सेससाठी आवश्यक. परीक्षा ऑनलाइन असून, यामध्ये लॉजिकल रिझनिंग, क्रीडा जागरूकता, आणि इंग्रजी यावर प्रश्न येतात. पात्रता: १२वी उत्तीर्ण, किमान ५०% गुण.
👉 https://iismworld.com/smat

2. LNIPE PGD (Sports Coaching) Entrance Exam:
LNIPE (ग्वालियर) संस्थेतून Post Graduate Diploma in Sports Coaching साठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमतेची चाचणी, आणि मुलाखत घेतली जाते. पात्रता: संबंधित क्रीडा क्षेत्रातील पदवी आणि राष्ट्रीय/विद्यापीठीय स्पर्धेतील सहभाग.
👉 https://www.lnipe.edu.in

3. इतर संस्था प्रवेश चाचण्या:
काही संस्था (जसे की Symbiosis School of Sports Sciences, NASM) स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. यात सामान्यतः लेखी चाचणी, मुलाखत, व शारीरिक क्षमता तपासली जाते.

परीक्षांची वेळ, पात्रता व प्रक्रिया संस्थेनुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

भारतातील सर्वोत्तम व प्रसिद्ध क्रीड शिक्षण संस्था आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइट्स

1. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (NSNIS), पटियाला

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) अंतर्गत कार्यरत, ही आशियातील सर्वात मोठी क्रीडा संस्था आहे. येथे विविध क्रीडा कोचिंग आणि स्पोर्ट्स सायन्स संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
🔗 https://nsnis.org


 2. महाराष्ट्र स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, बालेवाडी, पुणे

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात स्थित, ही महाराष्ट्रातील पहिली राज्य प्रायोजित क्रीडा विद्यापीठ आहे. येथे BBA आणि B.Sc इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
🔗 https://sports.maharashtra.gov.in


 3. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्सेस (IGIPESS), नवी दिल्ली

दिल्ली विद्यापीठाशी संलग्न, ही संस्था B.Sc (फिजिकल एज्युकेशन), B.P.Ed., आणि M.P.Ed. यासारखे अभ्यासक्रम प्रदान करते.
🔗 https://igipess.du.ac.in


🎓 4. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन (LNIPE), ग्वाल्हेर

ही संस्था B.P.Ed., M.P.Ed., आणि M.Sc इन स्पोर्ट्स सायन्स यासारखे अभ्यासक्रम प्रदान करते.
🔗 https://www.lnipe.edu.in


5. टाटा फुटबॉल अकॅडमी (TFA), जमशेदपूर

TFA ही भारतातील एक प्रमुख फुटबॉल प्रशिक्षण संस्था आहे जी युवा फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण प्रदान करते.
🔗 https://www.fcjamshedpur.com/academy

6. नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA), बंगलोर

BCCI अंतर्गत कार्यरत, NCA ही संस्था युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आणि पुनर्वसन सेवा प्रदान करते.
🔗 https://nationalcricketsacademy.com

7. दिल्ली विद्यापीठ – शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विज्ञान विभाग

दिल्ली विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विज्ञान विभागात B.P.Ed. आणि M.P.Ed. यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
🔗 https://www.du.ac.in/index.php?page=department-of-physical-education-sports-sciences

8 . ISST – Institute of Sports Science & Technology, पुणे

ISST Pune ही भारतातील एक अग्रगण्य क्रीडा संस्था आहे जी स्पोर्ट्स मॅनेजमेंट, कोचिंग, फिटनेस आणि स्पोर्ट्स सायन्स यामध्ये डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट व पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रम देते. ISST ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
🔗 https://www.isstpune.com


 9. Symbiosis School of Sports Sciences (SSSS), पुणे

SSSS पुणे ही सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) अंतर्गत चालणारी संस्था असून येथे MBA in Sports Management सारखा उच्चस्तरीय अभ्यासक्रम दिला जातो. या संस्थेचे इंडस्ट्री कनेक्शन आणि प्लेसमेंट्स उत्कृष्ट आहेत.
🔗 https://www.ssss.edu.in

वरील संस्था क्रीडा शिक्षण, व्यवस्थापन, आणि प्रशिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रानुसार योग्य संस्था आणि अभ्यासक्रम निवडून उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल उचलावे.

भारतातील क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी

• स्पोर्ट्स कोच
• फिटनेस ट्रेनर / पर्सनल ट्रेनर
• स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट
• स्पोर्ट्स अ‍ॅनालिस्ट
• स्पोर्ट्स मॅनेजर
• इव्हेंट मॅनेजर
• स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट
• स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट
• स्पोर्ट्स जर्नलिस्ट

 उपयुक्त टिप:

• योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतल्यास सरकारी तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध
• भारतात खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण व प्रोत्साहन मिळते
• आधुनिक युगात स्पोर्ट्स आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी आहे

 

READ MORE 

  1. Arts Students साठी दहावी आणि बारावीनंतरचे टॉप करिअर पर्याय 2025
  2. पुण्याच्या रावी ने शिकवणी शिवाय दहावीत मिळवले 100 % मार्क्स
  3. पावसाळा वेळेपेक्षा आधी येतोय IMD ने दिला महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ट

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स