Arattai App ची चर्चा का होत आहे ? WhatsApp ला Made in India पर्याय

Arattai App: Made in India Messaging App, WhatsApp ला देतोय स्पर्धा

अरत्ताई चा अर्थ काय होतो ?

Arattai App हे Zoho Corporation (चेन्नई आधारित Software Company) या कंपनी ने बनवले आहे , हे एक आधुनिक Instant Messaging Platform आहे.
“अरत्ताई” चा मराठीत अर्थ कॅज्युअल चॅट असा होतो . या अ‍ॅपमध्ये WhatsApp सारखे फीचर्स आहेत जसे की Text Chat, Voice Notes, Audio/Video Calls, Media Sharing, public Groups, Channel या सारखे पर्याय इथे उपलब्ध आहेत.

हे आप्लिकेशन पूर्णपणे मेड इन इंडिया Messaging App आहे, या मध्ये Data Privacy, Local Hosting, आणि Regional Language Support यावर जास्त फोकस केला गेला आहे आहे.

अरत्ताई ची भारतात लोकप्रियता का वाढत आहे?

WhatsApp आणि Telegram सारख्या जग प्रसिद्ध अ‍ॅप्स साठी पर्याय म्हणून अरत्ताई आप्लिकेशन कडे बघितले जाते आहे .

  • डेटा प्रायव्हसीवर साठी वाढलेली जागरूकता
  • सरकारी संस्था व मीडिया कव्हरेज
  • दररोज वाढणारे downloads .

यामुळे व हे अ‍ॅप भारतीय कंपनी ने बनवले असल्यामुळे ,भारतीय वापर कर्त्यांमध्ये WhatsApp ला Alternative म्हणून व स्वदेशी अ‍ॅप म्हणून ओळख मिळवत आहे. हे अँप चार वर्ष पूर्वी बनवले होते पण ते सध्या चर्चेत आले आहे .

अरत्ताई चे फीचर्स कोणते आहेत ?

  • मेसेजिंग व कॉलिंग – टेक्स्ट, व्हॉईस नोट्स, फोटो, डॉक्युमेंट्स शेअर करण्यासोबतच ऑडिओ/व्हिडिओ कॉल्सची सुविधा.
  • मीटिंग्स – शालेय मित्रांची भेट, बर्थडे पार्टी किंवा ऑनलाइन मीटिंग, यात 250 लोकांना सामावून घेता येते तसेच रेकॉर्डिंगची सोयही उपलब्ध.
  • ग्रुप्स – एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 1000 मेंबर्स तर 50 पर्यंत अ‍ॅडमिन्स ठेवता येतात. ओनरकडे पूर्ण अधिकार असतात व त्याला कोणीही काढू शकत नाही.
  • चॅनेल्स – मोठ्या प्रमाणावर माहिती किंवा कंटेंट शेअर करण्यासाठी खास. यात केवळ अ‍ॅडमिन मेसेज टाकू शकतो, तर ग्रुप्स छोटे सर्कल्स जसे मित्र व कुटुंबासाठी योग्य.
  • स्टोरीज – फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट 24 तासांसाठी पोस्ट करण्याची सुविधा.

सिक्युरिटी आणि प्रायव्हसी 

Zoho ला Collaboration & Security Software मध्ये 10+ वर्षांचा अनुभव आहे. अरत्ताई अ‍ॅपमध्ये:

  • किमान डेटा कलेक्शन
  • Local Servers वापरणे
  • भारतीय कायद्यांनुसार प्रायव्हसी नियम

या अ‍ॅप मध्ये वापरकर्त्यांचा डेटा जास्त सुरक्षित आहे असे मानले जात आहे.

 

 अरत्ताई vs WhatsApp तुलना

Origin – कुठून आले हे अ‍ॅप?

  • अरत्ताई हा Zoho या भारतीय कंपनी ने विकसित केलेला स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप आहे.
  • WhatsApp मात्र Meta, USA चे उत्पादन असून जागतिक स्तरावर वापरले जाते आहे .

Messaging Features – मेसेजिंग सुविधा

तुम्ही दोन्ही अ‍ॅप्समध्ये Text Messaging, Voice Notes, Documents Sharing सारख्या बेसिक गोष्टी करू शकता . म्हणजेच रोजच्या चॅटिंगसाठी दोन्ही जवळपास सारखेच अनुभव देतात.

Calling – ऑडिओ/व्हिडिओ कॉलिंग

  • अरत्ताईमध्ये Audio/Video Calls Secure आहेत आणि झोहोच्या डेटा सिक्युरिटीवर आधारित आहेत.
  • WhatsApp मध्ये सर्व कॉल्स आणि मेसेजेस End-to-End Encrypted (E2EE) आहेत, जे त्याची खासियत आहे.

 Groups & Admin Control

  • अरत्ताईमध्ये 1000 Members पर्यंत ग्रुप बनवता येतो आणि 50 Admins ठेवता येतात.
  • WhatsApp मध्ये थोडी जास्त सुविधा आहे – 1024 Members पर्यंत ग्रुप सपोर्ट आहे.

Unique Features – खास वैशिष्ट्ये

  • अरत्ताई ची खासियत म्हणजे त्यांची Pocket (Private Notes storage) हे फीचर आणि अंगभूत Meetings सुविधा, ज्या मध्ये ऑनलाइन मीटिंग्स रेकॉर्डिंगसह घेता येतात.
  • WhatsApp ने या साठी वेगळे व व्यवसायांसाठी खास Business API दिले आहे.

 Data Privacy & Security

  • अरत्ताई डेटा प्रायव्हसीसाठी Local Hosting वापरते, म्हणजे भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातच सुरक्षित राहतो.
  • WhatsApp मध्ये डेटा Meta Servers वर स्टोअर केला जातो.

 Backup Options

  • अरत्ताईमध्ये Local Backup + Zoho Cloud सपोर्ट मिळतो.
  • WhatsApp मध्ये वापरकर्ते Google Drive किंवा iCloud वर डेटा बॅकअप करू शकतात.

 

🌟 भारतीय वापरकर्त्यां कोणते फायदे आहेत ?

  • Local Language Friendly UI – मराठीसह भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व प्रादेशिक भाषा सपोर्ट आहे .
  • Made in India चा विस्वास – स्वदेशी उत्पादन असल्यामुळे याचा फायदा आपल्या देशाला होणार आहे व स्वदेशी वापरण्याचा अभिमान मिळेल .
  • Zoho Ecosystem Integration – बिझनेस आणि Enterprise वापरकर्त्यांसाठी लाभदायक.
  • Data Privacy Assurance – कमी डेटा कलेक्शन व लोकल स्टोरेज.

मर्यादा

  • Network Effect – WhatsApp आधीच सर्वत्र वापरले जाते, त्यामुळे switch करणे कठीण.
  • Encryption Gap – WhatsApp मध्ये End-to-End Encryption पूर्ण आहे, तर अरत्ताई अजून सुधारणा करत आहे.
  • Maturity – WhatsApp कडे जास्त अनुभव व बिझनेस टूल्स.
 निष्कर्ष

जर तुम्ही भारतीय वापरकर्ता असाल आणि Made in India App वापरण्याला प्राधान्य देत असाल, किंवा डेटा प्रायव्हसी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर अरत्ताई हा मजबूत पर्याय आहे. विशेषतः Zoho Products वापरणाऱ्या कंपन्यांसाठी हा अ‍ॅप खूप उपयुक्त ठरू शकतो.

कुठे मिळेल?

  • Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध.
  • डाउनलोडसाठी अधिकृत वेबसाईट : www.arattai.in
  • सपोर्ट ईमेल : support@arattai.in

 

1. अरत्ताई अ‍ॅप म्हणजे काय आणि कोणत्या कंपनीने बनवले आहे?

उत्तर: अरत्ताई हे Zoho Corporation (चेन्नईस्थित भारतीय सॉफ्टवेअर कंपनी) यांनी बनवलेले एक Made in India Instant Messaging App आहे. यात तुम्ही Text Chat, Voice Notes, Audio/Video Calls, Files Sharing आणि Groups तयार करू शकता.


2. अरत्ताई अ‍ॅप सुरक्षित आहे का?

उत्तर: होय, अरत्ताई अ‍ॅप डेटा प्रायव्हसीला प्राधान्य देते. यात Local Hosting (भारतामध्येच सर्व्हर स्टोरेज) वापरले जाते आणि किमान डेटा कलेक्शन केले जाते. त्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा भारतीय कायद्यांनुसार सुरक्षित राहतो.


3. अरत्ताई आणि WhatsApp मध्ये मुख्य फरक काय आहे?

उत्तर: अरत्ताई हा भारतीय कंपनीचा स्वदेशी अ‍ॅप आहे, तर WhatsApp हे Meta, USA चे उत्पादन आहे. अरत्ताईमध्ये Zoho Cloud Backup, Local Data Storage, आणि Meetings Feature आहेत; तर WhatsApp मध्ये End-to-End Encryption आणि Business API सारख्या सुविधा आहेत.


4. अरत्ताई अ‍ॅप मध्ये कोणत्या भाषा उपलब्ध आहेत?

उत्तर: अरत्ताई अ‍ॅप मध्ये मराठीसह अनेक भारतीय प्रादेशिक भाषा (जसे हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड इ.) उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थानिक वापरकर्त्यांना आपल्या भाषेत सहज चॅट करता येते.


5. अरत्ताई अ‍ॅप कोठून डाउनलोड करू शकतो?

उत्तर: अरत्ताई अ‍ॅप Android (Google Play Store) आणि iOS (App Store) दोन्हीवर मोफत उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी www.arattai.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

 

 

 



Leave a Comment