विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा मुलगा सापडला

एअर इंडिया विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा मुलगा आर्यन सापडला

अहमदाबाद, १४ जून २०२५ – एअर इंडिया (Air India) च्या अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या बोईंग विमानाचा उड्डाणानंतर काहीच मिनिटांत झालेला भीषण अपघात सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून, तो नेमका कोणी रेकॉर्ड केला आणि त्यावेळी कॅमेरा इतक्या अचूक वेळी कसा सुरू झाला, यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या अपघातात विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला. हा भीषण प्रसंग एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याने तो वेगाने व्हायरल झाला.

मात्र, एवढ्या कमी वेळात व्हिडिओ कसा रेकॉर्ड केला गेला, ही बाब अच्चर्यकारक वाटते या मागील तथ्य जाणून घेण्यासाठी गुजरात पोलिसांनी एअर इंडिया विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा युवकाला तात्काळ कारवाई करत ताब्यात  घेतले आहे ,

आर्यन नावाच्या युवकाला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आर्यन याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची कबुली दिली असून, त्याने आधीच कॅमेरा ऑन का केला होता, याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.

हा व्हिडिओ दाखवतो की विमान अत्यंत कमी उंचीवरून रहिवासी वस्तीच्या जवळून जात होते आणि काही सेकंदांतच कोसळले. यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले, ज्यामध्ये धुराचे मोठे लोट, आगीचा धूर आणि विमानाचे तुटलेले भाग दिसून येत होते.

मात्र, विमान कोसळतानाचा स्पष्ट व्हिडिओ केवळ आर्यनकडेच होता. यामुळे या घटनेमागे कोणती पूर्वनियोजित शक्यता आहे का, यावरही चौकशी केली जात आहे.

दुर्घटनेनंतर शोध आणि बचाव कार्य सुरू असताना आज अजून एका मृतदेहाचा शोध लागला आहे, ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता २७५ वर पोहोचला आहे. अपघातातील हे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत, जेणेकरून या दुर्घटनेचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते.

विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा युवक -आर्यन
विमान अपघाताचा व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा युवक -आर्यन

 

महिलेने सांगितले की, त्या दिवशी विमानाची आवाज नेहमीसारखा नव्हता.

ज्या घराच्या छतावरून एअर इंडियाचे विमान AI 171 अगदी जवळून गेले, त्या घरात राहणाऱ्या महिलेने सांगितले की, त्या दिवशी विमानाची आवाज नेहमीसारखा नव्हता. तिची मुले तिला बोलली कि , “हे विमान खूपच जवळून जात आहे, पण यातून काहीच आवाज येत नाही.” मुले छतावरच होती .

त्याच वेळी आर्यन देखील तिथेच होता. त्याने आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी विमानाचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्याचा हेतू इतकाच होता की, मित्रांना दाखवावे की विमान किती जवळून जात होते. पण काही क्षणांतच विमान कोसळले आणि सगळीकडे धुराचे लोट पसरले.

त्याने सांगितले की, “मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर केवळ २४ सेकंदात अपघात झाला.” आर्यन म्हणाला की, “जे काही मी पाहिले, त्याने मी खूप घाबरलो .” त्याने सर्वात आधी हा विडिओ आपल्या बहिणीला दाखवला आर्यनची बहिण सुद्धा पाहून घाबरली आणि तिने त्याच्या वडिलांना संपूर्ण माहिती दिली.

आर्यन म्हणतो की, त्याला कल्पनाही नव्हती की विमान कोसळेल. त्याची बहिण सांगते की, तो त्यावेळेस खूप घाबरलेला होता ,अपघात इतका भयानक होता की आर्यनला नीट बोलता देखील येत नव्हते असे त्याच्या बहिणीने सांगितले आर्यन १७ वर्षांचाआहे सध्या तो बारावीमध्ये शिकत आहे,

एकमेव बचावलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची धक्कादायक कहाणी

या संपूर्ण दुर्घटनेत एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे – या अपघातातून एकमेव प्रवासी बचावला आहे. त्यांचे नाव विश्वास कुमार रमेश, वय ४० वर्षे, असून ते मूळचे भारताचे असून ब्रिटनमध्ये व्यवसाय करत होते.

त्यांचे विमानात स्थान सीट ११ए, ही आपत्कालीन दरवाजाजवळ होती. रमेश यांनी सांगितले की, अपघाताच्या क्षणी विमानाचा डाव्या बाजूचा दरवाजा तुटलेला दिसल्यावर त्यांनी एक क्षणही न गमावता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  ते म्हणाले, “त्या क्षणी फक्त एवढंच वाटलं की अजून काही क्षण थांबलो तर मीही मरेल. मी उडी मारली आणि बाहेर पडलो.”

विमान अपघाता- बचावलेला एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश
विमान अपघाता- बचावलेला एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश

 

विश्वास कुमार रमेश  पुढे म्हणाले की, “मी जिथे बसलो होतो तिथे थोडीशी जागा होती. म्हणून मी वाचलो. माझ्या डाव्या हाताला भाजल्यासारखं झालं आहे. पण माझं आयुष्य वाचलं यावर अजूनही विश्वास बसत नाही.”

त्यांनी सांगितले की, बऱ्याच प्रवाशांची जागा वस्तीगृहाच्या भिंतीलगत होती आणि त्यामुळे त्यांना हलताच आले नाही. अनेक प्रवासी बाहेर पडू शकले असते पण भिंतीमुळे मार्ग अडवला गेला. मात्र, रमेश यांच्या जागेभोवती थोडी मोकळी जागा होती, जी त्यांच्या जीवदानासाठी कारणीभूत ठरली.

अपघाताची सखोल चौकशी सध्या सुरू असून, विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले की इतर काही कारण होते, याचा तपास एअर इंडिया आणि नागरी विमान प्राधिकरण करत आहेत. तसेच, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाबाबतही अधिक माहिती आणि पार्श्वभूमी तपासली जात आहे.

या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या संवेदनांमध्ये सहभागी होत सर्व स्तरांवरून या घटनेची चौकशी लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

कुमार रमेश  सध्या अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोघांमध्ये सुमारे १० मिनिटे संवाद झाला.

 

READ MORE 

  1. मुख्य पायलट सुमित सबरवाल यांच्या निर्णयाला मानाचा मुजरा
  2. मुंबईत भीषण विमान अपघात – चाचणी उड्डाणादरम्यान विमान कोसळले
  3. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केली एअर इंडियावर जोरदार टीका

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स