डिप्लोमा नंतर RTO ऑफिसर बनण्याची संधी – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)

डिप्लोमा नंतर RTO ऑफिसर होण्याची उत्तम संधी – जाणून घ्या ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ पदासाठी पात्रता

जर तुम्ही 3 वर्षांचा डिप्लोमा (Diploma) पूर्ण केलेला असेल आणि सरकारी नोकरीत अधिकारी बनण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत भरती होणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकता.

डिप्लोमा नंतर अधिकारी बनण्याची संधी – MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)

 

कोण पात्र आहे? (Eligibility Criteria)

वयाची अट:

  • किमान वय – 19 वर्षे
  • कमाल वय – 38 वर्षे (General Category)

आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट:

  1. SC/ST/ओबीसी/अनाथ उमेदवार – 43 वर्षांपर्यंत
  2. माजी सैनिक – 43 + सेवा वर्षे + 3 वर्षे
  3. खेळाडू – 43 वर्षे

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

तुमच्याकडे खालील पैकी कोणताही 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे:

  • Automobile Engineering
  • Mechanical Engineering

किंवा यासारखाच डिप्लोमा जसे की:

  1. Diploma in Production Engineering / Technology
  2. Diploma in Fabrication Technology
  3. Diploma in Plant Engineering
  4. Diploma in Metallurgy
  5. BE (Mech / Auto / Production / Industrial)  उत्तीर्ण उमेदवार सुद्धा पात्र

राष्ट्रीयत्व (Nationality):

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे.

अनुभव (Experience)

या पदासाठी उमेदवाराकडे हलक्या किंवा जड वाहनांच्या देखभाल (maintenance) आणि दुरुस्ती (repair) करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव सरकारी संस्था, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था, किंवा केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त कंपन्यांमध्ये मिळालेला असावा.

तथापि, अशा उमेदवारांना देखील संधी दिली जाते, ज्यांच्याकडे सध्या अनुभव नाही. अशा उमेदवारांनी जर परीक्षेत यश मिळवले आणि निवड झाली, तर त्यांना नियुक्तीनंतरच्या प्रोबेशन कालावधीत (प्रशिक्षण कालावधी) हा 1 वर्षाचा अनुभव अनिवार्यपणे पूर्ण करावा लागेल. म्हणजेच अनुभव नसल्यासही अर्ज करता येईल, परंतु नियुक्तीनंतर अनुभव घेणे बंधनकारक असेल.

शारीरिक पात्रता (Physical Measurements)

या पदासाठी उमेदवाराची शारीरिक क्षमता देखील तपासली जाते. खालील शारीरिक निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे:

👨‍🔧 पुरुष उमेदवारांसाठी:

  • किमान उंची: 163 सेंटीमीटर
  • छातीचा माप: 79 सेंटीमीटर (नैसर्गिक), आणि फुगवल्यावर किमान 5 सेंटीमीटरने वाढ अपेक्षित म्हणजे 84 सेंटीमीटरपर्यंत फुगवटा होणे आवश्यक आहे.

👩‍🔧 महिला उमेदवारांसाठी:

  • किमान उंची: 155 सेंटीमीटर
  • किमान वजन: 45 किलो

ही शारीरिक पात्रता उमेदवाराच्या कार्यक्षमता व फील्डमध्ये काम करण्याची क्षमता यावर आधारित आहे. उदा. वाहन तपासणी, रस्त्यावरील वाहन तपासणी मोहीम इत्यादी कामांसाठी आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचणीदरम्यान (Medical Test) उमेदवारांना या निकषांवर पात्र ठरावे लागेल.

वाहनचालक परवाना (Driving License)

  • उमेदवाराकडे खालील वाहन प्रकारांचे वैध परवाने असणे आवश्यक आहे:
  1. Motorcycle with Gear
  2. Light Motor Vehicle (LMV)
  3. Transport Vehicles (Heavy Passenger आणि Heavy Goods Vehicles)

जर उमेदवाराकडे जड वाहनांचे परवाने नसतील, तर प्रोबेशन कालावधीत ते मिळवणे आवश्यक आहे.

प्रयत्नांची मर्यादा (Number of Attempts):

  • प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही, परंतु कमाल वयोमर्यादेपर्यंतच अर्ज करता येईल.

मराठी भाषेचे ज्ञान:

  • उमेदवारास मराठी भाषा वाचन, लेखन आणि बोलणे आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना:

  • MPSC द्वारे 2024 ची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना डाउनलोड करून सर्व तपशील तपासावेत.
  • पात्रता नसल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

 निष्कर्ष:

  • तुमच्याकडे जर 3 वर्षांचा डिप्लोमा असेल आणि RTO विभागात अधिकारी बनण्याची इच्छा असेल, तर ही संधी सोडू नका. योग्य तयारीसाठी आता पासूनच अभ्यास सुरु करा. ही सरकारी नोकरी फक्त नोकरी न राहता एक गौरवशाली अधिकारी पद आहे – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून.
  • वरील ही माहिती मागील वर्षाच्या भरतीवर आधारित आहे. अधिकृत सूचने नंतर अंतिम पात्रता निकष ठरतील. त्यामुळे नियमितपणे संबंधित वेबसाइटवर लक्ष ठेवा.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)


1.AMVI म्हणजे काय? (AMVI Full Form in Marathi and English)

उत्तर: AMVI चा फुलफॉर्म आहे Assistant Motor Vehicle Inspector (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) असा आहे , परिवहन (RTO) विभागात कार्यरत असतो.

2.AMVI च्या जबाबदाऱ्या (Duties of AMVI) कोणत्या आहेत?

उत्तर: AMVI च्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये वाहनांची तपासणी, प्रदूषण नियंत्रणाची तपासणी, वाहतूक नियमांचे पालन होतोय का हे पाहणे, फिटनेस सर्टिफिकेट देणे, आणि अपघात तपासणी यांचा समावेश होतो.

3.AMVI परीक्षा किती टप्प्यांची असते?

उत्तर: तुम्हाला तीन टप्प्यातून जावे लागते – पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर शारीरिक चाचणी/ड्रायविंग टेस्ट.

4.AMVI साठी कोचिंग आवश्यक आहे का?

उत्तर: तुम्ही जर स्व-अभ्यास करू शकत असाल तर कोचिंग आवश्यक बिलकुल नसते . पण स्पर्धा खूप असल्यामुळे, बरेच विद्यार्थी कोचिंग क्लासेसची मदत घेतात

5.सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाचा पगार किती असतो? (AMVI Salary in Maharashtra)

उत्तर: AMVI पदासाठी सुरुवातीचा पगार Level S-15 (रु. 38,600 ) इतका असतो अंदाजे . याशिवाय, महागाई भत्ता, वाहन भत्ता, आणि इतर शासनमान्य भत्ते मिळतात.

 

READ MORE 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स