पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन 2025 – इतिहास, बक्षीस रक्कम, रूट, नोंदणी आणि निकालांची संपूर्ण माहिती
Pune International Marathon 2025
पुणेकरांसाठी अभिमानास्पद मानली जाणारी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन यावर्षी आपल्या 39 व्या वर्षात प्रवेश करत आहे. आरोग्य, फिटनेस आणि क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी 1983 मध्ये सुरू झालेली ही मॅरेथॉन आज आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. देशभरातील तसेच जगभरातील व्यावसायिक धावपटू, हौशी रनर्स, संरक्षण दलातील जवान, पोलीस, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी या भव्य स्पर्धेत दरवर्षी सहभागी होतात.
पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन यंदा 7 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या (PMC) सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत हजारो धावपटू सहभागी होणार आहेत.यंदाचा विशेष “Run For Environment” हा थीम पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीवर लक्ष केंद्रित करणारा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सहभागामुळे ही स्पर्धा महाराष्ट्रातील तसेच देशातील प्रमुख मॅरेथॉन्सपैकी एक ठरली आहे.

बक्षीस रक्कम (Prize Money) –
2025 साठी एकूण ₹35 लाखांचे आकर्षक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
- Full Marathon (Open) – पहिला क्रमांक ₹2,75,000
- Half Marathon (Open) – पहिला क्रमांक ₹1,50,000
- 10 km, 5 km व Wheelchair categories साठीही वेगवेगळी बक्षीस रक्कम निश्चित.
2025 मॅरेथॉनचा रूट (Route)
सुरुवात: हॉटेल कल्पना–विश्व चौक, S P College Ground (Sanas Ground)
मुख्य पॉइंट्स:
सणस ग्राउंड – बाजीराव रोड – लक्ष्मी रोड – शनिवार वाडा – JM रोड – डेक्कन – कारवे रोड – सिंहगड रोड – राजाराम ब्रिज – नांदेड सिटी मुख्य प्रवेशद्वार, त्याच मार्गाने परत सणस ग्राउंडवर समाप्ती.
नोंदणी (Registration) – 2025
- नोंदणी सध्या www.marathonpune.com वर सुरू आहे.
- Registration Last Date: 28 नोव्हेंबर 2025
Entry Fee:
- Full Marathon – ₹2,000
- Half Marathon – ₹1,500
- 10 km – ₹1,200
- 5 km – ₹1,000
- Wheelchair – ₹100
धावण्याचे वेळापत्रक
- फुल मॅरेथॉन (42.195 km) – पहाटे 3.00 वाजता
- हाफ मॅरेथॉन (21.095 km) – 3.30 वाजता
- 10 km Run – 6.15 वाजता
- 5 km Run – 7.15 वाजता
- Wheelchair 3 km – 7.30 वाजता
उशीरा रात्री वाढलेल्या वाहतुकीमुळे यावर्षी फुल व हाफ मॅरेथॉनच्या वेळा पुढे आणल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
टायमिंग सर्टिफिकेट (Timing Certificate)
स्पर्धेनंतर सर्व फिनिशर्सना ChronoTrack timing system वर आधारित e-certificate डाउनलोड करता येते. साधारणतः 10–15 दिवसांत निकाल व प्रमाणपत्रे उपलब्ध होतात.
निकाल (Results)
स्पर्धेचे सर्व निकाल व वर्षानुसार विजेते Pune International Marathon – Past Winners या पेजवर उपलब्ध असतात. 2025 चे निकालही रेसनंतर वेबसाइटवर अपलोड केले जातील.
विशेष आकर्षण
भारतीय सेना, रेल्वे, पोलीस, ASI, NDA तसेच विविध संस्थांचे धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लडाख आणि कारगिल मॅरेथॉनचे विजेतेही यंदा पुण्यात धावणार असल्यामुळे स्पर्धेला अधिक रंगत येणार आहे.
FAQ
1: Pune International Marathon 2025 साठी नोंदणी कधीपर्यंत करता येईल?
Pune International Marathon 2025 साठी नोंदणी 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येईल. नोंदणी फक्त अधिकृत वेबसाइटवर—www.marathonpune.com आहे.
2: Timing Certificate कसे मिळेल?
रेस पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागी धावपटूंना e-Timing Certificate ऑनलाइन उपलब्ध होते. रेसनंतर 10–15 दिवसांच्या आत Pune Marathon Results विभागातून हे प्रमाणपत्र डाउनलोड करता येते.
3: Pune Marathon 2025 चा रूट कसा आहे?
स्पर्धेची सुरुवात Sanas Ground (Kalpana-Vishwa Chowk) येथून होते. पुढे रूटमध्ये Bajirao Road, Laxmi Road, Shaniwar Wada, JM Road, Deccan, Karve Road, Sinhagad Road, Rajaram Bridge ते Nanded City Main Gate असा प्रवास होतो. त्याच मार्गाने परत येत सणस ग्राउंडवर समाप्ती होते.





