नवले ब्रीज अपघातानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली तातडीची बैठक

नवले ब्रीजवरील अपघातानंतर – वेगमर्यादा निम्मी केली वेगमर्यादा 60 वरून थेट 30 किमी

नवले ब्रीजवर झालेल्या भयानक अपघातानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. वाढत्या दुर्घटनांना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने जड वाहनांची वेगमर्यादा 60 किमी/ता वरून 30 किमी/ता करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

यासोबतच रस्त्यावर वाहतूक नियंत्रण सुधारण्यासाठी नवी ३ स्पीड गन बसवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वाहने वेगमर्यादा ओलांडल्यास थेट कॅमेराद्वारे दंड आकारला जाणार आहे. मंत्री मोहोळ यांनी सांगितले – “स्पीड 60 वरून 30 करणे हा सध्या एकमेव पर्याय आहे.”

गेल्या 10 वर्षांत 100 मृत्यू ; स्थानिकांचा प्रशासनावर संताप

नवले ब्रीज परिसर गेल्या दहा वर्षांत 100 अपघाती मृत्यूंसाठी कुप्रसिद्ध ठरला आहे. रोज अप-डाउन करणाऱ्या एका प्रवाशाने स्पष्ट सांगितले:

“मी 18 वर्षांपासून या रस्त्यावरून जातो. आत्तापर्यंत 100+ लोकांना इथे मरताना पाहिलं… पण प्रशासन काहीच शिकत नाही.” नवले ब्रीज हा पुण्यातील सर्वात धोकादायक अपघात-प्रवण रस्ता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 नागरिकांचा संताप – “कंटेनर चालक उजवीकडूनच गाडी चालवतात!”

अपघातानंतर यूट्यूब कमेंटने मोठी चर्चा -: “सगळे कंटेनर वाले उजवीकडून गाडी चालवतात… सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे.” उजव्या बाजूने वेगाने धावणाऱ्या जड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना धोका वाढतो. सिग्नल, वेगमर्यादा आणि लेन डिसिप्लिन येथे पूर्णपणे मोडीत निघतात.

कात्रज बोगदा ते नवले ब्रीज : तीव्र उतार – अपघाताचे मूळ कारण?

स्थानिक आणि वाहतूक तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे:

  • कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीज हा तीव्र उतार जड वाहनांसाठी अत्यंत धोकादायक
  • कंटेनरची ब्रेक फेल समस्या कायम
  • रस्त्याची रचना बदलणे, उतार कमी करणे हा दीर्घकालीन आणि योग्य उपाय

“उतार कमी करणे हा एकमेव खरा उपाय. आत्तापर्यंत खूप अपघात झाले, आता तरी प्रशासनाने जागे व्हावे.” तातडीने उपाययोजना सुरू – पण कायमस्वरूपी उपायांची मागणी वाढली-

नवीन वेगमर्यादा, स्पीड गन आणि तपासणी मोहिमेने अपघात काही प्रमाणात नियंत्रनात येतील अशी आशा आहे , 

  • तीव्र उताराची पुनरचना
  • जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
  • 24×7 सतर्कता
  • तांत्रिक तपासणीत कठोरता

परंतु  नवले ब्रीज हा पुण्याच्या वाहतुकीचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला असून आता कायमस्वरूपी उपायांशिवाय मृत्यू थांबणार नाहीत, असे लोकांचे स्पष्ट मत आहे.

मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे म्हणणे अपघातांवर कायमस्वरूपी उपाय – Pune Ring Road 

1️⃣ जांभूळवाडी–वारजे रिंग रोड (Ring Road)

PMRDA मार्फत तयार होत असलेला रिंग रोडचा DPR (Detailed Project Report) आता फास्ट-ट्रॅकवर नेण्यात येणार आहे.
रिंग रोड पूर्ण झाल्यावर जड वाहने शहरात येणार नाहीत, त्यामुळे नवले ब्रीजवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे असे मोहोळ यांनी सांगितले.

 

Leave a Comment