पुण्यात हादरवणारा अपघात: नवले ब्रिजवर कंटेनरला आग, ८ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प!

नवले ब्रिजवरील मोठा अपघात – कंटेनरला आग लागून वाहतूक ठप्प!

पुणे | दिनांक : 13 नोव्हेंबर 2025, सायंकाळी 6.00 वा.

पुण्यातील नवले ब्रिज परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातानंतर कंटेनरमधून CNG गळती होऊन मोठा स्फोट झाला आणि काही वाहनांना आग लागली. या आगीत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना रुग्णालयात हलविण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, तपास सुरू आहे. या अपघातामुळे सातारा रोडवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज पर्यंतचा तीव्र उतार हा आतापर्यंत झालेल्या सर्व अपघातांचं कारण आहे

नवले ब्रिजवर कंटेनरचा अपघात
नवले ब्रिजवर कंटेनरचा अपघात

 

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, वाहने हटविण्याचे काम सुरू असून त्यासाठी काही वेळ लागेल. त्यामुळे पुढील दोन तास या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा ते मुंबई या मार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांनी जुना कात्रज बोगदा घाटमार्ग वापरावा, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

वाहतूक उपआयुक्त कार्यालय, पुणे यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत –

  1. नवले ब्रिज परिसरातील मार्गावर दोन तासांसाठी प्रवास टाळावा.
  2. अत्यावश्यक असल्यासच या मार्गाचा वापर करावा.
  3. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
  4. पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी.

अचानक झालेल्या या घटनेमुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले असून, पोलिसांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

navale-bridge-accident
navale-bridge-accident

 

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

“आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात मदत करावी,” असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

नवले ब्रिजवरील अपघातामुळे सातारा कडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद असून, पर्यायी मार्ग म्हणून कात्रज घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी कार्यरत आहेत.

हे सुद्धा वाचा –  रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार ₹1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार ‘कॅशलेस उपचार योजना सुरू

विडिओ पाहण्यासाठी – Navale Bridge Accident Detail Report : पुणे नवले ब्रीज अपघाताची A to Z कहाणी : ABP Majha

Leave a Comment