उत्तर जपान भूकंप : 6.7 तीव्रतेचा, सुनामीचा इशारा- बाबा वंगांच्या भाकीतीकडे पुन्हा लक्ष

Iwate Prefecture च्या किनाऱ्यावर आलेल्या भूकंपानंतर समुद्रात उसळल्या लाटा

उत्तर जपानमध्ये शनिवारी सायंकाळी स्थानिक वेळेनुसार सुमारे ५ वाजता अचानक जमिनीने हलकं थरथर कापलं. Iwate Prefectureच्या किनाऱ्याजवळ आलेल्या या भूकंपाची तीव्रता सुमारे ६.७ इतकी नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र “सानरिकू” खाडीच्या सुमारे १० किलोमीटर खोल समुद्राखाली असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

उत्तर जपान भूकंपा नंतर जपानच्या हवामान खात्याने किनाऱ्यावरील जिल्ह्यांसाठी “सुनामी सल्ला” जारी केला. काही ठिकाणी १ मीटरपर्यंत उंचीच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता.

प्रत्यक्षात मात्र लाटांची उंची तुलनेने कमी होती. Kuji शहरात सुमारे २० सेंटीमीटर उंचीची लाट पाहायला मिळाली, ज्यामुळे स्थानिकांना थोडीशीच भीती वाटली.

सद्यस्थितीत मोठ्या जीवितहानीची किंवा गंभीर नुकसानाची कोणतीही नोंद झालेली नाही. तरीही प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहण्याचं आणि पश्चात् कंपनांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जपान हा पृथ्वीवरील सर्वाधिक भूकंपीय सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे. या भागात वारंवार भूकंप होणं ही काही नवीन गोष्ट नाही, असं ते सांगतात.

बाबा वंगा यांची भविष्य वाणी बरोबर होईल का ?

या घटनेनंतर पुन्हा एकदा बाबा वंगा या बल्गेरियन भविष्याचे भाकीत करणारे गुरु यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या भाकीत केलेल्या २०२५ सालासाठीच्या भविष्यवाण्यांमध्ये प्राकृतिक आपत्तींचा उल्लेख होता ,  त्यांनी जापान साठी भूकंप आणि ज्वालामुखींचे उद्रेक यावर विशेष वक्त्यव्य केल होत. उत्तर जपानमधील या भूकंपानंतर लोक त्या भाकीतींकडे लक्ष देत आहेत.

इतिहासात त्यांच्या भाकीतांमध्ये दुसरे महायुद्ध, चेर्नोबिल दुर्घटना, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि ११ सप्टेंबरचा हल्ला यांचा समावेश असल्याचा दावा त्यांच्या अनुयायांचा आहे. जरी याबाबत ठोस पुरावे मिळाले नाहीत, तरी त्यांच्या अनेक भाकीती जागतिक घटनांशी जुळल्याचं म्हटलं जातं. या गोष्टी किती खऱ्या आहेत हे माहित नाही पण घडलेल्या घटनांशी जुळून आल्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे

जगावर येणार आर्थिक मंदीचे सावट?

त्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षात जागतिक आर्थिक मंदीचे सावट ही दिसणार आहे. सध्या विविध देशांतील बाजारातील अस्थिरता आणि राजकीय तणाव पाहता, हे भाकीतही काही प्रमाणात खरे ठरत असल्याची चर्चा रंगली आहे. याचबरोबर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर राजकारण यांतील संघर्षाचाही उल्लेख त्यांच्या २०२५ च्या भाकीतीत होता.

FAQ

प्रश्न 1:
उत्तर जपानमध्ये आलेल्या या भूकंपाचा परिणाम किती गंभीर होता?
भूकंपाची तीव्रता ६.७ इतकी होती आणि केंद्र समुद्राखाली सुमारे १० किलोमीटर खोल होते. नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. प्रशासनाने मात्र नागरिकांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

प्रश्न 2:
बाबा वंगांच्या भाकीतांचा या घटनेशी काय संबंध आहे?
बाबा वंगांनी २०२५ साली अनेक प्राकृतिक आपत्ती घडतील असं म्हटलं होतं, त्यात भूकंप आणि ज्वालामुखींचा समावेश होता. उत्तर जपानमधील अलीकडचा भूकंप या भाकीतीशी काही प्रमाणात जुळतोय असं अनेकांना वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

Leave a Comment