पुन्हा बनावट एआय व्हिडिओचा गोंधळ! ‘वाघाच्या हल्ल्याचा’ खोटा व्हिडिओ व्हायरल
एआय व्हिडिओंनी वाढवलं गोंधळाचं प्रमाण
महाराष्ट्र वनविभाग अधिकारी यांच्या अनुसार, सोशल मीडिया इंस्टाग्राम वर ए.आय. (Artificial Intelligence) ने बनवलेले वन्यजीवांचे व्हिडिओ जे अगदी खरे वाटतात अशे विडिओ झपाट्याने पसरत आहेत यामध्ये चुकीचे असे आहे की असल्या बनावट क्लिप्स मुळे लोकांच्या मनात वन्य प्राण्यांच्या वर्तना विषयी चुकीचा समज निर्माण होतो .
असाच बनावट विडिओ, नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्राम , एक्स वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्या मध्ये वाघाने एका माणसावर हल्ला केल्याचं दाखवलं गेलं आहे . आणि मुद्दामून व्हिडिओमध्ये “ब्रह्मपुरी गेस्ट हाऊस” चंद्रपूर जिल्हा असा मुद्दामून उल्लेख केला गेला आहे . CCTV फुटेज वर ३१ ऑक्टोबर २०२५, सकाळी ६:४२ असा टाइम सुद्धा बनावट आहे, पण ज्यामुळे लोकांनी तो व्हिडिओ खरा वाटला .
व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स (Twitter) सारख्या प्लॅटफॉर्मवर हा क्लिप काही वेळातच हजारो लोकांनी बघितला . या विडिओ ला आतापर्यंत ५८,००० हून अधिक व्यूज मिळाले असून, प्रतिक्रियांमध्ये एकीकडे आश्चर्य आणि भीती तर दुसरीकडे शंका आणि विश्लेषण दिसून येतंय.
एका हुशार युजरने कमेंट केलाय की , “हा व्हिडिओ पूर्णपणे एआयने बनवला आहे . सध्या असे खोटे व्हिडिओ सगळीकडे पसरत आहेत
पण काही लोकांना हा विडिओ खरा देखील वाटला , व अश्या लोकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला, “वाघ कितीही शांत दिसले तरी त्यांचा स्वभाव क्रूर असतो.
पण ज्यांना ऐ. आई. ने विडिओ कसा बनवता ते माहित आहे त्या लोकांना हे लगेच समजते अशा अफवा पसरवणे किती चुकीचे आहे जे प्राणी आपल्या घरात म्हणजे जंगलात राहतात ते कधीच दुसर्यांना विनाकारण त्रास देत नाहीत एकदा अपवाद असू शकतो .

वनविभागाने सुद्धा यावर आपलं मत मांडलं
अफवा खुप वाढल्या मुळे यावर पडदा टाकत ब्रह्मपुरीचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सचिन नारद यांनी स्पष्ट केलं, “हा व्हिडिओ आमच्या विभागाशी संबंधित नाही. कुठे शूट करण्यात आला हे अजून कळलेलं नाही.” त्यांनी हेही सांगितलं की, तो क्लिप बहुधा डिजिटल पद्धतीने म्हणजेच एआयने तयार केलेला असावा.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अशा बनावट व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती पसरते, विशेषतः ज्या भागात मानव-वन्यजीव संपर्क जास्त असतो, जसं की ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्ह परिसरात.
“एआयच्या युगात शंका ठेवणं गरजेचं”
वन्यजीव संवर्धनाशी संबंधित विषयांवर कोणतीही गोष्ट शेअर करण्याआधी तिची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, “एआयच्या काळात वास्तव आणि बनावट यामधली फरक ओळखणे सहज किंवा सोपे नाही . त्यामुळे प्रत्येकाने कोणतीही घाबरवणारी पोस्ट किंवा विडिओ शेअर करण्याआधी तो खरा आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे कारण ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.





