काय सांगावं! दारूच्या नशेत वाघाला पेग पाजणारा माणूस? गावात गोंधळ, पण खरी गोष्ट वेगळीच!
नागपूर | नोव्हेंबर २०२५
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ फिरतोय. त्या व्हिडिओमध्ये, एक माणूस रस्त्याच्या कडेला बसलेल्या वाघाला दारू पाजतोय आणि त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवतोय, असं दिसतंय. दृश्य बघून लोक थक्क झालेत, काहींना तर विश्वासच बसत नाहीये की हे खरं असू शकतं का!
माहितीनुसार, हा प्रकार मध्य प्रदेशातील पेंच टायगर रिझर्व्हजवळ घडल्याचा दावा करण्यात आलाय. व्हिडिओसोबत लिहिलंय की ५२ वर्षांचा राजू पटेल नावाचा मजूर, पत्ते खेळून परतताना दारूच्या नशेत त्या वाघाला मांजर समजला आणि त्याला पेग देऊ लागला. ऐकूनच लोक हादरले, आणि गावात भीतीचं वातावरण तयार झालं.
काही सोशल मीडिया पोस्ट्सनुसार, वन विभागानं त्या वाघाला बेहोश करून पकडलं, असंही सांगितलं जातंय. मात्र, लोकांमध्ये चर्चा गरम झालीय — हे धाडस होतं की अगदीच मूर्खपणा?

पण खरी गोष्ट काय? संपूर्ण व्हिडिओ बनावट! हि तर AI ची करामत !
परंतु हे सगळं निघाल फेक आता,याची खरी बाजू ऐका हा सगळा प्रकारच बनावट आहे. म्हणजेच, व्हिडिओत दाखवलेला ना वाघ खरा, ना तो माणूस ! हा विडिओ मध्यप्रदेश चा असल्याचा दावा केला जात तो पण ना का मध्यप्रदेश चा आहे ना नागपूर चा, नागपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितलंय की हा व्हिडिओ पूर्णपणे एआयने तयार केलेला आहे.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी “@aikalaakari” नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकण्यात आला होता. तपासात लक्षात आलं की सगळं दृश्य कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलं गेलं आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम युजर ज्याने हा विडिओ पहिल्या वेळेस अपलोड केला त्याला नोटीस पाठवली आहे . ही छोटीशी सहा सेकंदांची विडिओ क्लिप सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाली आणि लोकांनी तो पेंच टायगर रिझर्व्हचा आहे असं समजून गोंधळ माजवला.
पोलिसांनी सांगितलं की या व्हिडिओमुळे चुकीचा संदेश गेला आणि अभयारण्याची प्रतिमा बिघडण्याचा धोका निर्माण झाला. आता तो व्हिडिओ काढून टाकण्यात आलाय आणि पोलिसांनी लोकांना इशारा दिलाय की अशा खोट्या गोष्टी पसरवू नका..
म्हणूनच, पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हसके यांनी या प्रकरणात मुंबईतील त्या इन्स्टाग्राम अकाऊंट धारकाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ६८ अंतर्गत नोटीस बजावली आहे.
नेहमी लक्षात ठेवा सध्याच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्ट च्या युगात सोशल मीडियावर जे काही दिसतं, ते सगळं खरं नसतं. ए.आय. मुळे आता बनावट आणि वास्तव यातली रेषा इतकी पुसट झालीय की कधी कधी खोटं पण खरं वाटतं!





