पुणे वाहतूक कोंडी: दिवाळीनंतरचा सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम | Pune Traffic Jam Updateपुण्यात दिवाळीनंतर आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक कोंडी

Pune’s biggest traffic jam after Diwali

पुण्यात दिवाळीनंतर आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक कोंडी

पुणे : पुण्यातिला वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे , या वर्षी दिवाळीनंतर पुण्यातील वाहतूक कोंडीने तर सर्व रेकॉर्ड मोडले. पुण्यातील हायवे NH-48, NH-50, आणि NH-65 या हायवे वर रविवारी संध्याकाळी १२ किमीपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या . पुणे वाहतूक नियंत्रण यांनी आधीच वाहतूक अलर्ट दिला होता.

दिवाळीच्या सुट्टीत बाहेरचे नोकरदार व विध्यार्थी सुट्टीला आप आपल्या गावी गेले होते , सुट्टी संपल्यानंतर ते परत पुण्याकडे निघाले त्यामुळे शहरातील आणि आसपासच्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि या वर्षी या कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

नोकरी व शिक्षणासाठी परतणाऱ्या नागरिकांमुळे पुण्याकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.
NH-48 वर कोल्हापूर ते मुंबई दिशेने, NH-50 वर नाशिक ते चाकणपर्यंत, तसेच NH-65 वर सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या ५ ते १० किमीपर्यंत रांगा लागल्या.

बेंगळुरू-मुंबई (NH-48)- नवले ब्रिज ट्रॅफिक जॅम
बेंगळुरू-मुंबई (NH-48)- नवले ब्रिज ट्रॅफिक जॅम

Google Mapsच्या मदतीने पुण्यातील वाहतूक कोंडी ओळखा आणि प्रवासाचा योग्य निर्णय घ्या

पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा अंदाज घेण्यासाठी Google Maps हे एक अत्यंत उपयुक्त साधन ठरले आहे. नागरिक आणि प्रवासी Google Maps उघडून रस्त्यावरील रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स पाहू शकतात.

या नकाशावर हिरवा, पिवळा आणि लाल रंग रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण दर्शवतात — हिरवा म्हणजे वाहतूक सुरळीत, पिवळा म्हणजे मध्यम गर्दी, आणि लाल रंग म्हणजे तीव्र वाहतूक कोंडी. यावरून नागरिकांनी पर्यायी मार्ग (alternate routes) निवडावे, प्रवासाचा वेळ बदलावा, किंवा शक्य असल्यास प्रवास टाळावा याने आपलाच वेळ वाचेल .

यामुळे अनावश्यक वेळ वाया न घालवता प्रवास अधिक नियोजित आणि सुलभ करता येतो. पुण्यातील रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही या डिजिटल साधनांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

 

पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन

शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेसह वाहतूक विभागाने गेल्या काही दिवसांत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपायांमुळे काही प्रमाणात वाहतुकीचा वेग सुधारला असून, प्रमुख चौकांवरील ट्रॅफिक जाम कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक नियंत्रकांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, स्मार्ट सिग्नल सिस्टम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम केले जात आहे. मात्र, शहरात दररोज वाढणाऱ्या खासगी वाहनांमुळे काही भागांमध्ये अजूनही ताण जाणवत आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, कारपूल आणि सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले असून, शहरातील कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन आणखी काही नवे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

 

❓ FAQ 

1. पुण्यात दिवाळीनंतर वाहतूक कोंडी का वाढली?
दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या संख्येने पुण्याकडे परतल्याने महामार्गांवर वाहनांची गर्दी वाढली.

2. कोणते महामार्ग सर्वाधिक प्रभावित झाले?
NH-48 (कोल्हापूर–मुंबई मार्ग), NH-50 (नाशिक–चाकण मार्ग) आणि NH-65 (सोलापूर–पुणे मार्ग) या तीन प्रमुख महामार्गांवर सर्वाधिक कोंडी झाली.

3. Google Mapsने ट्रॅफिक कशी ओळखावी?
Google Maps उघडल्यावर हिरवा, पिवळा आणि लाल रंग ट्रॅफिकची स्थिती दाखवतात. लाल रंग दिसत असल्यास तो भाग टाळावा.

4. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक काय करू शकतात?
पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रवासाची वेळ बदलावी आणि सार्वजनिक वाहतूक वापरावी.

5. प्रशासनाकडून कोणते उपाय सुरू आहेत?
स्मार्ट सिग्नल, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे आणि नागरिकांना कारपूल वापरासाठी प्रोत्साहन देणे हे उपाय राबवले जात आहेत.

 

“या खालील व्हिडिओमध्ये SAM TV News ने पुण्यात दिवाळीनंतर निर्माण झालेल्या महाघनी वाहतूक कोंडीचे वास्तवदृश्य दाखवले आहे — व्हिडिओ येथे पाहा

 

Leave a Comment