मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यांवर आदळणार – Severe Cyclonic Storm

Cyclone Montha: आंध्र प्रदेश व ओडिशा मध्ये लँडफॉलची शक्यता – Red Alert

बंगालच्या उपसागरात तयार झालेले Cyclone Montha (मोंथा चक्रीवादळ) हे उष्ण दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार झाले आहे आणी हे खुप धोकादायक मानले जात आहे .

सुरुवातीला हा सखल दाबाचा पट्टा (Low Pressure Area) होता, जो आता Cyclonic Storm मध्ये विकसित झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी लगतच्या भागाला अतिताक्षतेचा इशारा दिला आहे

भारत हवामान विभागाने (IMD) या प्रणालीला “Severe Cyclonic Storm” होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यांवर जास्त धोका 

  • हा चक्रवात आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यांवर येत्या मंगळवारी (28 ऑक्टोबर 2025) संध्याकाळी किंवा रात्री जमिनीवर धडकणार आहे.
  • सध्या वाऱ्याचा वेग ८८ किमी प्रतितास असून, जमिनीला स्पर्श करताना ११० किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो.
  • काकीनाडा (Kakinada) व परिसरात सर्वाधिक परिणाम अपेक्षित आहे.

हवामान अंदाज आणि पर्जन्य चेतावणी

  • भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अतिजोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
  • आणि या चक्रीवादळामुळे भारतातील विविध भागात पुढील पाच दिवस हवामानातील मोठा बदल बघायला मिळणार आहेत.
  • अरब सागरात तयार होणारे दुसरे दबाव क्षेत्र आणि उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) यामुळे पावसाचा व्याप अधिक वाढणार आहे.

अलर्ट आणि प्रशासनिक तयारी

  • IMD ने आंध्र प्रदेश आणि ओडिशा साठी Red Alert जारी केला आहे.
    किनारपट्टी भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे, ५०,००० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
  • शाळा आणि महाविद्यालये अनेक जिल्ह्यांत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच मच्छीमारांना २९ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मासेमारी साठी बिलकुल न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • शेती मधील पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे , जास्तकरून धान्य आणि भाजीपाला सारख्या शेतीवर जास्त नुकसानाचा अंदाज वर्तवला आहे.
Cyclone Montha
Cyclone Montha

 केंद्र सरकारचे काय म्हणणे आहे ?

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासन सतर्क ठेवण्यात आले आहे.

अंदाजे ५०,००० लोकांहून अधिक आजपर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे

शाळा-महाविद्यालये अनेक जिल्ह्यांमध्ये बंद ठेवण्यात आली आहेत आणि सरकारी कर्मचारी व बचाव दल सतर्क ठेवले गेले आहेत.

किनाऱ्या लगतच्या लोकांसाठी प्रशासनाकडून अती महत्वाच्या सूचना

  • तटवर्ती भागातील नागरिकांनी घरातील वीज, पाण्याची व्यवस्था, आपत्कालीन किट तसेच आवश्यक औषधे तयार ठेवावी.
  • दरवाजे-खिडक्या सुरक्षितरित्या बंद कराव्यात, बाहेर पडणे टाळावे.
  • जलस्तर वाढू शकतो; नदीपात्र, लो-lying क्षेत्रात वेगाने पाणी येण्याची शक्यता असल्याने सतर्क राहावे.
  • हवामान विभागाचा पुढील अद्ययावत माहिती आणि स्थानिक प्रशासनाचे सूचनांचे पालन करावे.

 

Cyclone Montha -FAQ 

Q1. Cyclone Montha म्हणजे काय आणि कुठे तयार झाला आहे?
➡️ Cyclone Montha हा बंगालच्या उपसागराच्या उत्तर-मध्य भागात तयार झालेला उष्णकटिबंधीय चक्रवात आहे. भारत हवामान विभागाने (IMD) त्याला “Montha” असे नाव दिले असून तो आता तीव्र चक्रवातात (Severe Cyclonic Storm) परिवर्तित होत आहे.

Q2. Cyclone Montha केव्हा आणि कुठे जमिनीला (Landfall) स्पर्श करणार आहे?
➡️ IMD च्या अंदाजानुसार, हा चक्रवात २८ ऑक्टोबरच्या सायंकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनाऱ्याजवळ जमिनीला स्पर्श करेल अशी शक्यता आहे.

Q3. या चक्रवाताचा वाऱ्याचा वेग किती असेल आणि कोणकोणत्या राज्यांवर परिणाम होईल?
➡️ जमिनीला स्पर्श झाल्यानंतर वाऱ्याचा वेग ९० ते ११० किमी प्रतितास इतका असू शकतो. याचा परिणाम प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तमिळनाडूच्या तटीय भागांवर होणार आहे.

Q4. सरकार आणि प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली आहे?
➡️ आंध्र प्रदेशातील १३ तटीय जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला असून मच्छीमारीवर बंदी लागू केली आहे.
प्रशासनाने किनाऱ्याजवळील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले असून बचाव दल सतर्क ठेवले आहेत.

 

 

 



Leave a Comment