जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा जागतिक टॉप १० शाळांमध्ये – World’s Best School Prize 2025

जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेचा जागतिक यशाचा टप्पा! ‘World’s Best School Prize 2025’ मध्ये भारतातील पहिली सरकारी शाळा म्हणून टॉप-10 मध्ये स्थान. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा जागतिक टॉप १० शाळांमध्ये – भारताचा अभिमान

भारतातील सरकारी शाळेची जागतिक ओळख

जालिंदरनगर (पुणे जिल्हा) आणी खेड तालुका येथील जिल्हा परिषद शाळा ही ‘टी फोर एज्युकेशन’ (T4 Education) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या World’s Best School Prize 2025 या स्पर्धेत ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या प्रकारात या शाळेने भाग घेतला होता आणी या प्रकारात आपली शाळा  ,जगातील टॉप १० शाळांमध्ये निवडली गेली आहे.

या स्पर्धेत जगभरातून लाखो शाळानी भाग घेतला होता ,आणी त्यामधून आपली शाळा पहिल्या 10 मध्ये आल्याचा स्पर्धा घेणाऱ्या संस्थे कडून मागच्या आठवड्यात ई-मेल आला , आज झालेल्या लाईव्ह कार्यक्रमात वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत शाळेची निवड झाल्याचे वारे गुरुजी यांनी माहिती दिली , माहिती मिळताच शाळेतील स्टाफ , विध्यार्थी आणी गावातील लोकांनी जल्लोष केला

आदर्श शिक्षक वरे गुरुजींचे नेतृत्व

या यशाचे श्रेय श्री. दत्तात्रय वरे (गुरुजी) यांना जाते. त्यांनी ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या संकल्पनेवर आधारित अभिनव उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वात शाळेचा विकास, डिजिटल शिक्षण, पालक सहभाग, आणि समुदाय जोडणी यावर विशेष भर दिला गेला.

 भारताची पहिली सरकारी शाळा – जागतिक यादीत

  • ही भारताची पहिली सरकारी शाळा आहे जी जागतिक स्तरावर निवडली गेली.
  • स्पर्धेमध्ये लाखो शाळांनी भाग घेतला होता, परंतु जालिंदरनगर पुणे ZP शाळा टॉप १० मध्ये आली.
  • ही स्पर्धा ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या श्रेणीत होती.

 महत्वाचे मुद्दे

  •  शिक्षणामध्ये डिजिटल साधनांचा वापर
  •  विद्यार्थी-पालक संवादासाठी उपक्रम
  •  शाळेतील स्थानिक सहभाग वाढवणे
  •  पूर्णपणे सरकारी अनुदानित शाळा
  •  महाराष्ट्रातील व भारतातील एकमेव निवडलेली शाळा

 पुढील टप्प्यात पब्लिक व्होटिंग

या स्पर्धेचा अंतिम टप्पा आता सुरू झाला असून, टॉप-१० शाळांमधून विजेता पब्लिक व्होटिंगद्वारे निवडला जाणार आहे.  विजेता शाळेला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

शाळेसाठी मतदान करण्यासाठी लवकरच लिंक जाहीर केली जाणार आहे.
(👉 लिंक आल्यानंतर येथे अपडेट होईल.)


 भारतातील सरकारी शाळांसाठी प्रेरणा

या शाळेच्या यशामुळे देशभरातील सरकारी शाळांना नवी दिशा मिळणार आहे.
👉 “सरकारी शाळाही जागतिक स्तरावर परफॉर्म करू शकतात” हे सिद्ध झाले आहे.
👉 यामुळे शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलास चालना मिळेल.

 दत्तात्रय वरे गुरुजींचे आवाहन “हा केवळ एक पुरस्कार नाही, तर संपूर्ण सरकारी शिक्षण व्यवस्थेसाठी सन्मान आहे. आपल्या शाळेसाठी व्होटिंगमध्ये भाग घेणे ही देशसेवा ठरेल.”

तुम्हालाही वाटतोय अभिमान? लवकरच येणाऱ्या व्होटिंग लिंकमध्ये भाग घ्या आणि आपल्या शाळेचे यश निश्चित करा!

 ही माहिती शेअर करा आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्या!


हे सुद्धा वाचा 


 

World’s Best School Prize 2025 – Marathi FAQ

World’s Best School Prize 2025 काय आहे?

उत्तर: World’s Best School Prize हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक काम करणाऱ्या शाळांना दिला जातो. 2025 मध्ये जगभरातील टॉप 10 शाळांमध्ये भारतातील जालंधरमधील जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे.


Jalandhar ZP School ने कोणते जागतिक यश मिळवले आहे?

उत्तर: जालिंदरनगर पुणे जिल्ह्यातील ZP शाळा World’s Best School Prize 2025 च्या टॉप 10 यादीत समाविष्ट झाली आहे. हे भारतातील सरकारी शाळेसाठी अभिमानाचे यश आहे.


भारतातील सरकारी शाळेला जागतिक पुरस्कार मिळणे किती दुर्मिळ आहे?

उत्तर:
सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळणे फार दुर्मिळ असते, पण जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेने स्थानिक लोकसहभाग, गुणवत्ता शिक्षण व अभिनव प्रयोगांच्या जोरावर हे यश मिळवले आहे.


Government School World Award म्हणजे काय?

उत्तर: Government School World Award हे सरकारी शाळांच्या गुणवत्तापूर्ण कार्यासाठी दिले जाणारे एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं मानांकन किंवा पुरस्कार आहे, जे T4 Education द्वारे दिलं जातं.


दत्तात्रय वरे गुरुजी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान काय आहे?

उत्तर: दत्तात्रय वरे गुरुजी हे शिक्षक असून त्यांनी लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास, तंत्रज्ञानाचा वापर, व नवोन्मेषी उपक्रमांनी शाळा परिवर्तन घडवले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने जागतिक पुरस्कार मिळवला.


लोकसहभागातून शाळा विकास कसा साधला जातो?

उत्तर: शाळा व्यवस्थापन समित्या, पालक, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि शिक्षक यांच्या सहभागातून शाळेतील पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, वर्धापन कार्यक्रम यामध्ये सुधारणा घडवून शाळा उत्कर्ष साधते.


T4 Education संस्था म्हणजे काय?

उत्तर: T4 Education ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जगभरातील शाळांना सन्मानित करते आणि शिक्षकांच्या नवोन्मेषी कार्याचे प्रदर्शन करते.


Best Zilha Parishad School India कोणती आहे?

उत्तर: 2025 मध्ये जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने Best Zilha Parishad School म्हणून जागतिक पातळीवर ओळख मिळवली आहे. हे भारतातील ZP शाळांसाठी प्रेरणादायी आहे.


World’s Best School Prize मध्ये भारतीय शाळांचा सहभाग का महत्त्वाचा आहे?

उत्तर: भारतीय शाळांनी जागतिक मंचावर यश मिळवणे हे भारतातील सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचं प्रमाण आहे. हे इतर शाळांना देखील प्रेरणा देते.

 

 

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स