महाराष्ट्रात पुन्हा ऑरेंज अलर्ट: मुसळधार पाऊसाचे संकेत – जाणून घ्या संपूर्ण अपडेट

🌧️ महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय – कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’, उर्वरित भागात ‘येलो अलर्ट’

मे महिन्याच्या शेवटीच राज्यात मान्सूनने वेळेआधी हजेरी लावली होती. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.IMD ने परत एकदा  16 जून पर्यंत  महाराष्ट्रात पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे

यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर उर्वरित महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

 ‘ऑरेंज अलर्ट’ – कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका

भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. येत्या काही दिवसांत या भागांमध्ये हवामान अति अस्थिर राहण्याची शक्यता.

अतिवृष्टी आणि प्रचंड वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

संभाव्य परिणाम:

  • मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस: सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढू शकते.
  • प्रचंड वादळ व विजांचा गडगडाट: विजांच्या कडकडाटामुळे उघड्यावर जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
  • वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी/तास: झाडे उन्मळण्याचा आणि विजेच्या तारांवर धोका निर्माण होण्याची शक्यता.
  • घाटमाथ्यावर भूस्खलन: विशेषतः सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका आहे.

हवामान खात्याने नागरिकांना घाटमाथ्यांवर किंवा डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

 

भारताच्या वर ढगांची निर्मिती दर्शवणारी उपग्रह प्रतिमा सौजन्य - IMD
भारताच्या वर ढगांची निर्मिती दर्शवणारी उपग्रह प्रतिमा सौजन्य – IMD

 

🟡 ‘येलो अलर्ट’ – महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश शहरी व ग्रामीण भागांमध्ये ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात खालील विभागांचा समावेश आहे:

1. उत्तर महाराष्ट्र व मुंबई महानगर क्षेत्र (MMR)

  • पालघर, ठाणे, मुंबई: येथे घनदाट लोकवस्ती असून पावसामुळे वाहतूक व दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
  • धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर (औरंगाबाद): कृषी भागांवर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता.

2. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा

  • पुणे, सोलापूर: या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज.
  • मराठवाड्यातील जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव – येथे विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता.

3. विदर्भ विभाग

  • नागपूर विभाग: नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया – अडथळ्यांची शक्यता.
  • अमरावती विभाग: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ – शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.

अपेक्षित हवामान:

  • मध्यम ते जोरदार पाऊस
  • विजांसह वादळ
  • जोरदार वारे (40-50 किमी/तास)
  • शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता

 

 मान्सून चा पुढील प्रवास दोन टप्प्यांमध्ये

IMD पुणेचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या मते, पुढील दोन टप्प्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 पहिला टप्पा: 12 ते 14 जून

  1. या कालावधीत कोकण किनारपट्टी व पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे प्रमाण अधिक असू शकते.
  2. या भागांतील घाटरस्ते जलद भरून जातात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धुकं, पावसाचे झडे व दरड कोसळण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो.
  3. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी व गरजेअशिवाय प्रवास टाळावा.

 दुसरा टप्पा: 16 ते 19 जून

  1. या दुसऱ्या पावसाळी लाटेचा परिणाम प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांवर होणार आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
  2. या भागांमध्ये प्रचंड वादळासह विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यातील नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
  3. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी

 

आपत्कालीन सूचना व खबरदारी (Emergency Advisory):

🌄 घाटमाथ्यांवर किंवा डोंगराळ रस्त्यांवर प्रवास शक्यतो टाळा, कारण भूस्खलन व पावसामुळे रस्ते बंद होण्याची शक्यता आहे.
⚡ वीजांच्या कडकडाटादरम्यान घरात सुरक्षित राहा आणि खिडक्या-दारे बंद ठेवा.
📱 हवामानाची ताजी माहिती मिळवण्यासाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – mausam.imd.gov.in

निष्कर्ष: राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्यांनुसार वागणे आवश्यक आहे. विशेषतः घाटमाथ्यांचे, नदीकाठचे आणि शहरी भाग सतर्क राहावेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

सतर्क रहा, सुरक्षित रहा.

READ MORE 

लाडकी बहीण योजना आणि सरकारची कारवाई 2025

पुण्यात HSRP नंबर प्लेट 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत

50 रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार पुण्यातील शिवसृष्टी

 

ताज्या हवामान अपडेट्स, जिल्हानिहाय अलर्ट आणि आपत्कालीन सूचनांसाठी
आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि रहा सतर्क!

 येथे क्लिक करा आणि लगेचच सामील व्हा:

🌧️ हवामान बदलतेय – तुम्ही अपडेट आहात का?
📲 आमच्यासोबत रहा आणि मिळवा प्रत्येक अपडेट वेळेत!

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स