दिवा-कोपर स्थानकदरम्यान लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू – मुंबई लोकलमधील गर्दीने घेतले बळी

“मुंबई लोकलमध्ये भीषण दुर्घटना! समोरासमोर ट्रेन – आणि अचानक प्रवासी रुळावर!”

ठाणे: सोमवारी 9 june 2025 सकाळी ९.३० वाजता मध्य रेल्वेच्या दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान एक भीषण अपघात घडला ,हा अपघात लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या लोकांबरोबर दिवा आणि कोपर स्थानकादरम्यान झाला,दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या शेजारून जात होत्या ,

अत्यंत गर्दी असल्यामुळे काही प्रवाशी दरवाज्या च्या बाहेर लटकून उभे होते ही अवस्था दोन्हीं लोकल ट्रेन मध्ये होती,अचानक प्रवाशांचा एकमेकाला धक्का लागल्यामुळे लोकल ट्रेन मधून आठ प्रवासी खाली पडले

त्यातील पाच प्रवासी चालू ट्रेन मधून खाली पडल्यामुळे मृत्युमुखी पडले असून उर्वरित जखमींवर कालवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण आठ जणांना अपघातानंतर रुळांवरून उचलण्यात आलया चे समोर आले आहे .

मुंबई लोकल ट्रेन मध्ये गर्दी वाढत आहे पण त्यावर नवीन पर्याय निघत नाहीत याचाच परिणाम म्हणजे हा अपघात आहे

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या गर्दीच्या वेळेत एका लोकल ट्रेन कासारा दिशेने निघाली होती , तर दुसरी लोकल सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) कडे जात होती. नेहमी प्रमाणे गर्दी असल्यामुळे दोन्ही ट्रेन मधील अनेकजण दरवाजांवर उभे होते.

ट्रेन शेजारून गेल्यामुळे प्रवाशाचा एकमेकाला धक्का बसला आणी ट्रेनमधील काही प्रवासी रुळावर फेकले गेले. हा धक्कादायक प्रकार पाहून इतर प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली आणि लगेचच मदतकार्य सुरू करण्यात आले.

अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे वय ३०-३५ दरम्यान
सर्व मृतक प्रवाशांचे वय ३० ते ३५ वर्षांदरम्यान असल्याचे सांगण्यात येते आहे , हे प्रवासी सकाळच्या ऑफिस वेळेनुसार कामावर जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्घटना केवळ अपघात नसून, मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या भयानक गर्दीचे आणि प्रवासी सुरक्षेच्या कमतरतेचे प्रत्यक्ष चित्र आहे.

  • या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना सांगितले की, “ही घटना मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील अतिगर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारी गंभीर आठवण आहे.”
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर लक्ष दिले असून त्यांनी सांगितले की, “रेल्वे प्रशासन या घटनेची सखोल चौकशी करत आहे आणि दोषींवर कारवाई केली जाईल.”

 

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) स्वप्नील नीळ यांनी जखमींची हॉस्पिटल भेट घेतली आणी त्यांची विचारपूस केली व असे सांगितले की, “अपघाताच्या ठिकाणी आठ प्रवासी रुळांवर आढळले.

यातील एक जखमी प्रवाशाने माहिती दिली की दोन समोरासमोर येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवासी दरवाजांवर उभे होते. दोन्ही ट्रेन मधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून काही जण खाली पडले.”

प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईची लोकल म्हणजे लाखो प्रवाशांची जीवन वाहिनी आहे. मात्र दरवर्षी अशा अनेक अपघातांमुळे बऱ्याच निरपराध प्रवाशांचे प्राण जातात. रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

या घटने नंतर रेल्वे प्रशासनाकडून उपाय अपेक्षित आहेत 

  • गर्दीच्या वेळेत अतिरिक्त लोकल गाड्यांची व्यवस्था
  • दरवाजांवर उभे राहण्यावर नियंत्रण
  • सीसीटीव्हीद्वारे देखरेख
  • जनजागृती मोहीम
  • लवकरात लवकर नवीन लोकल गाड्या आणि कोच वाढवणे

निष्कर्ष
दिवा आणि कोपर स्थानकादरम्यान घडलेला हा अपघात केवळ एक घटना नसून, ती मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेतील त्रुटींचा एक आरसा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर आहे, आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

 

READ MORE

हिन्जवडी आयटी पार्कमध्ये पावसाअगोदरच पूरस्थिती: MIDC च्या अपूर्ण पुलामुळे वाहतूक ठप्प

बारावी नंतर कॉमर्स विभागातील विविध करिअर संधी- उच्च शिक्षणाच्या संधी

रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार ₹1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार ‘कॅशलेस उपचार योजना सुरू

 

ताज्या मराठी बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर! राजकारण, हवामान, लोकल अपडेट्स, आणि ब्रेकिंग न्यूज – सर्व काही एका क्लिकवर!

📲 आता लगेच आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा:
🟢 मराठी बातम्या २४/७ – तुमच्यासाठी, तुमच्या भाषेत!

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स