JEE Advanced 2025 निकाल जाहीर: AIR 1 मिळवणारा राजित गुप्ता, IIT सीट्स व टॉपर्स यादी
IIT म्हणजे Indian Institute of Technology, हे भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे नेटवर्क आहे. यामध्ये 23 IITs आहेत जिथे दर्जेदार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासाचे शिक्षण दिले जाते.
देशभरात नावाजलेल्या आयआयटी अभियांत्रिकी प्रवेशासाठी JEE ॲडव्हान्स ही एंट्रन्स परीक्षा असते या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. JEE Advanced 2025 चा निकाल IIT कानपूर यांनी 2 जून 2025 (सोमवार) रोजी अधिकृतपणे जाहीर केला. लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
सर्वर डाऊन मुळे रिझल्ट पाहता आला नाही
आज ऑनलाईन रिझल्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी रिझल्ट पाहण्यासाठी साईट ओपन करण्याचा प्रयत्न केला परंतु एकाच वेळी हजारो डिवाइस वर साईट ओपन होत असल्यामुळे सर्वर लोड येऊन बऱ्याच ठिकाणी साईट ओपन झाली नाही ,त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही उद्यापर्यंत बहुतांश मुलांना निकाल पाहता येईल.
All India Rank 1: कोटा चा ‘राजित गुप्ता’ ठरला टॉपर
दिल्ली आयआयटी झोनचा विद्यार्थी राजीव गुप्ता याला All India Rank 1 (AIR 1) ३६० पैकी 332 गुण मिळवत इतिहास घडवला आणि तो भारतामध्ये पहिला आला तर मुंबई आयआयटी झोन मध्ये माजिद मुजाहिदिन सेंड याने 330 गुण घेत मुंबई झोन मध्ये पहिला क्रमांक मिळवला
पुण्यातील शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही या परीक्षेत चांगले यश मिळाले, राजित गुप्ता हा राजस्थानमधील कोटा येथील महावीर नगर भागातील आहे आणि तो IIT दिल्ली झोन मधून परीक्षा देणारा विद्यार्थी होता. राजितने याआधी JEE Main 2025 च्या दोन्ही सत्रात 100 टक्के टाइल स्कोअर प्राप्त केला होता.
इतिहासातील सर्वोच्च स्कोअरधारक – 2017 मध्ये कल्पित वीरवाल याने JEE Main मध्ये 360 पैकी 360 गुण मिळवले होते. तो आजही इतिहासात एकमेव परिपूर्ण स्कोअरधारक आहे. त्याचे 7 तासांच्या अभ्यासाचे तंत्र अजूनही चर्चेत असते.
IIT कॉलेजेस मध्ये 2025 साली जागांची वाढ
IIT मध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष अधिक संधी घेऊन आले आहे. यंदा एकूण 18,160 B.Tech जागा उपलब्ध असून मागील वर्षाच्या तुलनेत जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ पुढीलप्रमाणे आहे:
- 2023: एकूण 17,385 जागा
- 2024: एकूण 17,760 जागा
- 2025: एकूण 18,160 जागा
यावर्षी 400 नव्या जागांची वाढ झाली आहे. त्यामुळे IIT मध्ये प्रवेश घेण्याची संधी अधिक विद्यार्थ्यांना मिळू शकते. ही वाढ विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल मानली जात असून, लोकप्रिय ब्रँचेससाठी स्पर्धा कमी होण्यास मदत होऊ शकते.
चांगला स्कोअर किती असावा? – 220 पेक्षा जास्त गुण मिळवणं हे JEE Advanced 2025 मध्ये “चांगला स्कोअर” मानला जातो. हा स्कोअर टॉप 500 रँकमध्ये स्थान मिळवण्यास उपयुक्त ठरतो.
कट-ऑफ आणि टॉप ब्रांचेससाठी स्पर्धा – JEE Advanced 2025 कट-ऑफ यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. Computer Science, Electronics, Mechanical सारख्या टॉप ब्रांचेससाठी AIR 1000 पेक्षा आत रँक लागतो.
JEE Advanced 2025 पात्रता (Eligibility)
JEE Advanced 2025 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष स्पष्टपणे ठरवले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 2023 किंवा 2024 मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा जे विद्यार्थी 2025 मध्ये 12 वीची परीक्षा देत आहेत,
ते सर्व या परीक्षेसाठी पात्र आहेत. मात्र, 2022 किंवा त्याआधी 12 वी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना JEE Advanced 2025 साठी पात्रता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली पात्रता तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.
IIT मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
राजित गुप्ता याचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरू शकते. त्याने JEE Advanced 2025 मध्ये 360 पैकी 332 गुण मिळवत AIR 1 मिळवला. यापूर्वी त्याने JEE Main च्या दोन्ही सत्रांमध्ये 100 टक्के स्कोअर मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
राजित दररोज 7 ते 8 तास नियमित अभ्यास करत असे, आणि त्याचा मुख्य भर NCERT पुस्तके आणि टेस्ट सिरीजवर होता. त्याच्या या शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीमुळे त्याने हे यश संपादन केले असून, हे सर्व IIT प्रवेशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते.
जेईई 2025 मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी
जेईई 2025 च्या परीक्षेत पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत शहराचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे हे फळ आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुशल थरानी, सोहन चिलेकर, अनुज पगार, ऋत्विक एन, आयुष, अनिश धांदल, अपूर्व बी, प्रणव जाजू, आदित्य मिश्रा, अर्चित सिंगल, अतीन गुप्ता, आदित्य विश्वास, सुचित राव, प्रजु अग्रवाल, आदित्य म्हेत्रे, सिद्धेश मांडे, जीत देसाई, कृतज्ञ जैन, एकांश अहुजा, अमन किशोर, देवेंद्र डी, सविर संदलिया, विहान मिश्रा, आरुष दिवसारी, राहुल पाटील आणि अथर्व कुडले यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी जेईईसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून भविष्यातील अभियंते, संशोधक आणि तंत्रज्ञ बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुण्याच्या शैक्षणिक वातावरणात घडलेल्या या विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्या या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
JEE Advanced 2025: टॉप 10 कॅंडिडेट्स (CRL)
- राजित गुप्ता – 332 गुण – IIT दिल्ली झोन
- सक्षम जिंदल – 332 गुण – IIT दिल्ली झोन
- माजिद मुजाहिद हुसैन – 330 गुण – IIT बॉम्बे झोन
- पार्थ मंदर वार्तक – 327 गुण – IIT बॉम्बे झोन
- उज्जवल केसरी – 324 गुण – IIT दिल्ली झोन
- अक्षत कुमार चौरसिया – 321 गुण – IIT कानपूर झोन
- साहिल मुकेशन डियो – 321 गुण – IIT बॉम्बे झोन
- देवेश पंकज भैया – 319 गुण – IIT दिल्ली झोन
- अर्नव सिंह – 319 गुण – IIT हैदराबाद झोन
- वडलामुडी लोकेशन – 317 गुण – IIT हैदराबाद झोन
ही यादी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे, ज्यांनी कठोर परिश्रम करून ही यशाची शिखरे गाठली आहेत.
IIT कॉलेजविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. IIT म्हणजे काय?
उत्तर: IIT म्हणजे Indian Institute of Technology, हे भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे नेटवर्क आहे. यामध्ये 23 IITs आहेत जिथे दर्जेदार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासाचे शिक्षण दिले जाते.
Q2. IIT मध्ये प्रवेश कसा मिळतो?
उत्तर: IIT मध्ये प्रवेशासाठी सर्वप्रथम JEE Main परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर JEE Main मध्ये पात्र ठरल्यास, JEE Advanced परीक्षा दिली जाते. JEE Advanced मध्ये चांगले रँक मिळवून विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळतो.
Q3. IIT मध्ये एकूण किती कॉलेज आहेत?
उत्तर: सध्या भारतात एकूण 23 IIT कॉलेज आहेत, जसे की IIT Bombay, IIT Delhi, IIT Madras, IIT Kanpur, IIT Kharagpur इत्यादी.
Q4. IIT मध्ये किती B.Tech सीट्स आहेत?
उत्तर: 2025 मध्ये IIT मध्ये एकूण 18,160 B.Tech जागा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 400 जागांची वाढ झाली आहे.
Q5. IIT मध्ये प्रवेशासाठी किती मार्क लागतात?
उत्तर: JEE Advanced मध्ये 220 पेक्षा अधिक गुण मिळवणं हे चांगलं मानलं जातं. असे गुण मिळाल्यास टॉप IIT मध्ये प्रवेश घेण्याची संधी वाढते.
Q6. IIT टॉपर किती गुण मिळवतो?
उत्तर: 2025 मध्ये राजित गुप्ता याने 360 पैकी 332 गुण मिळवून AIR 1 मिळवला. तो IIT Delhi Zone मधून होता.
Q7. IIT मध्ये कोणकोणते कोर्सेस शिकवले जातात?
उत्तर: IIT मध्ये मुख्यतः B.Tech, M.Tech, Dual Degree, PhD अशा कोर्सेस शिकवले जातात. Computer Science, Electrical, Mechanical, Civil, Chemical, Aerospace अशा विविध शाखांमध्ये शिक्षण उपलब्ध आहे.
Q8. IIT मध्ये मुलींसाठी किती रिझर्वेशन आहे?
उत्तर: IIT मध्ये Women Supernumerary Quota अंतर्गत मुलींसाठी काही अतिरिक्त जागा राखीव ठेवण्यात आलेल्या असतात, जेणेकरून मुलींचा सहभाग वाढावा.
Q9. IIT नंतर प्लेसमेंट कशा असतात?
उत्तर: IIT मधून पदवीधर झाल्यावर उत्कृष्ट प्लेसमेंट संधी मिळतात. अनेक विद्यार्थी कोट्यवधींचे पॅकेज मिळवतात. Google, Microsoft, Amazon, Apple, Goldman Sachs यांसारख्या मोठ्या कंपन्या IIT मधून भरती करतात.
READ MORE
महाराष्ट्रात ऐतिहासिक बदल नवीन शिक्षण रचना –10+2 बदलून नवी रचना
डिप्लोमा नंतर RTO ऑफिसर बनण्याची संधी – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)