2025 मध्ये पुण्यात वाहनासाठी HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची? 

संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

HSRP म्हणजे काय?

HSRP म्हणजे High Security Registration Plate जी वाहनांची चोरी, फसवणूक आणि नंबर प्लेट टॅम्परिंग रोखते.

HSRP पुण्यात कधी सुरु झाले?

पुण्यात एप्रिल 1, 2019 पासून सर्व नविन वाहनांसाठी HSRP अनिवार्य आहे.

HSRP बंधनकारक आहे का?

होय, कोणतेही वाहन 2019 पूर्वीचे असो वा नंतरचे, HSRP नंबर प्लेट अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी पात्रता कोणासाठी?

सर्व पुण्यातील वाहनधारकांना HSRP साठी अर्ज करणे आवश्यक आहे.

HSRP साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

Book My HSRP वेबसाईटवर जाऊन स्टेट सिलेक्ट करा, माहिती भरा, पेमेंट करा व स्लॉट बुक करा.

HSRP साठी लागणारी कागदपत्रे

नंबर प्लेट मिळवण्यासाठी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वाहनाचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ही  कागदपत्रे गरजेची आहेत .

HSRP साठी फी किती आहे?

दुचाकी साठी – ₹1230 ते ₹1640, चारचाकी साठी – ₹1975 ते ₹2050, व स्टिकर्स साठी – ₹100 द्यावे लागतील

HSRP स्टेटस कसा तपासायचा?

Book My HSRP वर “Track Your Order” पर्याय वापरून तुम्ही आपला स्टेटस तपासू  शकता

डुप्लिकेट HSRP किंवा रिफंड कसा मिळवायचा?

“Replacement Booking” किंवा “Cancel HSRP” पर्याय वापरून प्रक्रिया करा.