पुण्यात HSRP नंबर प्लेट 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत

पुण्यात 2025 मध्ये High Security Number Plate (HSRP) साठी अर्ज कसा करावा?

पुणे | मे 2025 –पुणे हे महाराष्ट्रातील मुंबई नंतर एक महत्वाचे आणि वर्दळीचं शहर बनले आहे. झपाट्याने लोकसंख्येच्या मोठ्या वाढीमुळे वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहन चोरीसारख्या घटना वाढत चालल्या आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून भारत सरकारने High Security Registration Plate (HSRP) अनिवार्य केली आहे.

पुण्या मधे जवळ जवळ प्रत्येक घरा मधे फोर व्हीलर किन्वा टू व्हीलर तर नक्की असेलच त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे , या लेखामध्ये आपण HSRP म्हणजे काय, याचे फायदे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हे HSRP म्हणजे काय?

HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली विशेष सुरक्षा क्रमांक प्लेट आहे, जी वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेला अधिक सुरक्षित बनवते. या प्लेटमध्ये लेझर एच कोड, वाहनाचा इंजिन आणि चेसिस नंबर, बारकोड, स्नॅप लॉक आणि एक अद्वितीय ओळख क्रमांक असतो. हे सर्व घटक मिळून नंबर प्लेट टॅम्परिंग, बनावट नंबर प्लेट तयार करणे आणि वाहन चोरी रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

What is HSRP Number Plate
What is HSRP Number Plate

 

पुण्यात HSRP अनिवार्य का आहे?

पुण्यात HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) लावणे आता सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. 2019 पासून लागू झालेल्या या नियमाचे पालन न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जातो. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनाही सुद्धा आपली जूनी नंबर प्लेट बदलून ही नवीन नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.

कोण अर्ज करू शकतो?

HSRP (High Security Registration Plate) साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अधिकार पुण्यात नोंदणीकृत कोणत्याही वाहनधारकाला आहे. म्हणजेच, ज्यांच्या नावावर वाहन नोंदलेले आहे किंवा ज्यांच्या ताब्यात पुण्यात नोंदणीकृत वाहन आहे, अशी कोणतीही व्यक्ती HSRP साठी ऑनलाईन अर्ज करू शकते.

हा नियम सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू आहे. यात दोन चाकी (बाईक, स्कूटर), तीन चाकी (ऑटो रिक्षा), चार चाकी (कार, जीप), तसेच व्यावसायिक वाहनं जसे की ट्रक, टेम्पो, बस, ट्रॅक्टर, क्रेन इत्यादींचा समावेश होतो.

वाहनाचा वापर खाजगी, व्यवसायिक, शैक्षणिक, सरकारी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असला, तरीही त्या वाहनासाठी HSRP नंबर प्लेट घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, पुण्यातील सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनाची माहिती तपासून घेऊन वेळेत HSRP साठी अर्ज करणे आवश्यक आहे, अन्यथा वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते.

हे HSRP म्हणजे काय
हे HSRP म्हणजे काय

 

ऑनलाईन अर्ज कसा करणार ?

नवीन नंबर प्लेट (HSRP) साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे

स्टेप 1 – अधिकृत Book My HSRP या संकेतस्थळावर जा
स्टेप 2 – ‘High Security Registration Plate with Colour Sticker’ या पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3 – राज्य म्हणून ‘महाराष्ट्र’ निवडा व वाहनाची माहिती भरा
स्टेप 4 – आपला सोयीचा तारीख व वेळ निवडा
स्टेप 5 -ऑनलाईन पेमेंट करून पावती घ्या
तुम्हाला दिलेल्या तारखेला तुमच्या नजीकच्या केंद्रावर जाऊन प्लेट बसवून घ्या

कागदपत्रे कोणती लागतात?

  •  रहत्या ठिकाणीचा पत्ता पुरावा – लाइट बिल , भाड्याने रहात असाल तर रेंट अग्ग्रिमेंट – (अ‍ॅड्रेस प्रूफ)
  • ओळखपत्र – आधार कार्ड, लायसन्स, पॅन कार्ड ( फोटो प्रूफ )
  • वाहन खरेदी केल्याचे मूळ व नक्कल नोंदणी प्रमाणपत्र (RC बुक )
HSRP ची फी किती आहे?
  • पुण्यात दोनचाकी आणि ऑटोसाठी HSRP फी ₹1230 ते ₹1640 दरम्यान आहे.
  • चारचाकी वाहनांसाठी HSRP फी ₹1975 ते ₹2050 इतकी आहे.
  • रंग कोड स्टिकरसाठी फी ₹100 आहे.
  • ट्रक, बस आणि HMV वाहनांसाठी HSRP फी ₹1345 ते ₹1975 पर्यंत असते.

 

HSRP ची स्थिती कशी तपासावी?

  1. Book My HSRP वेबसाइटवर जा
  2. ‘Track Your Order’ वर क्लिक करा
  3. आपला वाहन क्रमांक व ऑर्डर नंबर टाका
  4. कॅप्चा भरून ‘Search’ क्लिक करा

डुप्लिकेट HSRP कसा मागवावा?
जर HSRP हरवला किंवा खराब झाला असेल, तर ‘Replacement Booking’ पर्याय वापरून नवीन प्लेट मागवता येते.

ऑर्डर रद्द व परतावा प्रक्रिया

  • Book My HSRP वेबसाइटवर जा
  • ‘Cancel HSRP’ टॅब निवडा
  • ऑर्डर नंबर व वाहन क्रमांक टाका
  • 4 तासांच्या आत रद्द केल्यास 6-8 दिवसांत पैसे परत येतात

महत्वाची सूचना:   HSRP बसविणे ही कायदेशीर जबाबदारी असून त्याचे पालन न केल्यास दंड होऊ शकतो.वाहन सुरक्षिततेसाठी HSRP नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाची आहे. पुण्यातील सर्व वाहनचालकांनी वेळेवर ही प्लेट बसवून कायद्यानुसार योगदान द्यावे, हीच विनंती.

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.पुण्यात 2025 मध्ये जुन्या वाहनासाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य आहे का?
होय , हे सर्व जुन्या व नव्या वाहनासाठी गरजेचे आहे .

2.HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो?
तुम्ही Book My HSRP या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

3.HSRP साठी किती फी लागते पुण्यात दुचाकी व चारचाकी वाहनासाठी?
दुचाकी वाहनासाठी – ₹1230 to ₹1640 व चार चाकी वाहनासाठी – ₹1975 to ₹2050

4.Book My HSRP वेबसाईटवर स्लॉट बुक करताना कोणती माहिती लागते?
तुमची ओळखपत्र व वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC)

5.HSRP नंबर प्लेट नसेल तर पुण्यात किती दंड होतो?
तुम्ही अर्ज केला नसेल तरच दंड होईल , (₹५०० )

6.HSRP रद्द करून पैसे परत मिळू शकतात का?
हो HSRP रद्द करून पैसे परत मिळू शकतात

7.HSRP नंबर प्लेटचे फायदे काय आहेत पारंपरिक प्लेटच्या तुलनेत?
वाहन चोरीसारख्या घटना घडल्यावर तपास करणे सोपे जाते

8.पुण्यात वाहन विकत घेतल्यावर किती दिवसात HSRP लावणे गरजेचे आहे?
वाहन विकत घेतल्यावर लगेच लावणे गरजेचे आहे

READ MORE 

  1. तयार राहा महाराष्ट्रात शालेय शिक्षणात होतोय ऐतिहासिक बदल: आता 10+2 च्या ऐवजी 5+3+3+4 रचना लागू
  2. 12वी नंतर भारतीय लष्करात अधिकारी पदासाठी सुवर्णसंधी 2025
  3. मान्सून 2025:पावसाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम पुण्यात मे महिन्यातच मान्सूनची दमदार हजेरी

Leave a Comment

शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी महाराष्ट्र सरकारने केली पूर्णतः माफ शिक्षण विभागाचा निर्णय शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी मान्सून 2025: पावसाने मोडला 35 वर्षांचा विक्रम, पुण्यात दमदार हजेरी फास्टॅग वार्षिक पास योजना 2025: फक्त ₹3000 मध्ये 200 टोल ट्रिप्स