सीआयपीईटी औरंगाबादतर्फे २०२५ सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू – १०वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या रसायन व पेट्रोकेमिकल्स मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET), औरंगाबाद केंद्रामार्फत २०२५ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, विविध डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) अभ्यासक्रमांची माहिती
१. डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (DPT)
- पात्रता: १०वी उत्तीर्ण
- कालावधी: ३ वर्षे
- प्लास्टिक क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि प्रक्रिया यांवर आधारित कोर्स.
२. डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (DPMT)
- पात्रता: १०वी उत्तीर्ण
- कालावधी: ३ वर्षे
- मोल्डिंग, डिझाइनिंग आणि टूल मॅन्युफॅक्चरिंग संबंधित शिक्षण.
३. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक्स प्रोसेसिंग अँड टेस्टिंग (PGD-PPT)
- पात्रता: विज्ञान शाखेतील पदवी (रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र)
- कालावधी: २ वर्षे
- प्रोसेसिंग व चाचणी क्षेत्रात कौशल्य विकसित करणारा कोर्स.
४. पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाईन विथ कॅड/कॅम (PD-PMD with CAD/CAM)
- पात्रता: मेकॅनिकल / प्लास्टिक्स / पॉलिमर / टूल / प्रॉडक्शन / मॅक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / टूल अँड डाई मेकिंग / प्रॉडक्शन इंजिनिअरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन / टेक्नॉलॉजी किंवा डिप्लोमा पूर्ण असलेले विद्यार्थी पात्र.
- कालावधी: १.५ वर्षे
- विशेष नोंद: अंतिम वर्षात असलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
- शेवटची अर्ज करण्याची तारीख: २९ मे २०२५
- प्रवेश परीक्षा (CIPET CAT 2025): ८ जून २०२५
- विद्यार्थ्यांनी https://cipet25.onlineregistrationform.org/CIPET/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.
सीआयपीईटी (CIPT) म्हणजे काय?
CIPET ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोकेमिकल्स विभागाअंतर्गत चालवली जाणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ही संस्था प्लास्टिक आणि पॉलिमर तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा देते. CIPET चे अनेक केंद्रे भारतभर आहेत आणि औरंगाबाद येथील केंद्र हे प्रमुख प्रशिक्षण व संशोधन केंद्र आहे. सर्व अभ्यासक्रम AICTE मान्यताप्राप्त असून उद्योग क्षेत्रात त्यांना मोठी मागणी आहे.
CIPET – भारत सरकारची प्लास्टिक व पॉलिमर तंत्रज्ञानातील प्रमुख संस्था
स्थापना: CIPET ची स्थापना 1968 मध्ये चेन्नई येथे भारत सरकारच्या पुढाकाराने व UNDP च्या सहकार्याने झाली.
उद्दिष्ट: प्लास्टिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शासकीय संस्था: ही संस्था रसायन व खत मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असून प्लास्टिक व पॉलिमर क्षेत्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासात अग्रगण्य आहे.
मुख्य कार्यक्षेत्र:
- प्लास्टिक डिझाईन
- CAD/CAM/CAE
- मोल्ड व टूलिंग निर्मिती
- प्लास्टिक प्रक्रिया
- चाचणी व गुणवत्ता नियंत्रण
- कौशल्य प्रशिक्षण
- राष्ट्रीय विस्तार: CIPET चे भारतातील २२ राज्यांमध्ये सुमारे ४० केंद्रे कार्यरत आहेत आणि अजून काही उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.
- अत्याधुनिक सुविधा: सर्व केंद्रांमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री, संगणकीय डिझाईन सुविधा, मोल्डिंग युनिट्स आणि चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.
- उद्योगांसोबत सहकार्य: संस्था विविध खासगी, सार्वजनिक व सरकारी उद्योगांना तांत्रिक सहाय्य, सल्ला व सेवा पुरवते. CIPET ने देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित कंपन्यांबरोबर यशस्वी काम केले आहे.
- संशोधन व मान्यता: संस्थेला पॉलिमर विज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
- रोजगार व उद्योजकता: CIPET बेरोजगार व अल्पशिक्षित युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते आणि उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देते.
- पर्यावरणपूरक दृष्टिकोन: प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पर्यावरण जाणीव व शाश्वत विकासासाठी CIPET महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
प्लास्टिक व मोल्डिंग क्षेत्रातील संधी
आजच्या औद्योगिक युगात प्लास्टिक, मोल्डिंग, कॅड/कॅम डिझाईन यासारख्या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. अशा प्रकारचे कौशल्ययुक्त शिक्षण घेतल्यास विविध उत्पादन कंपन्या, ऑटोमोबाईल उद्योग, डिझाईन क्षेत्र व प्लास्टिक प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
- मोबाइल: ९३७३६८७९१५, ९३२५६८७९०२, ९७६३३१०९४५
- फोन: (०२४०) २४७८३२२, २४७८३०२
- ई-मेल: aurangabad@cipet.gov.in
शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणाऱ्या या कोर्सेससाठी विद्यार्थी, पालकांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करावेत.
READ MORE